Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांस्कृतिक वारसा ते समुद्रकिनारे, ‘भारत पर्व 2026’मध्ये महाराष्ट्र पर्यटन दालनाला पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्लीतील ‘भारत पर्व 2026’ महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या दालनाने पर्यटकांचे विशेष लक्ष वेधले असून, राज्याच्या समृद्ध संस्कृती आणि पर्यटन वैभवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 31, 2026 | 03:30 PM
सांस्कृतिक वारसा ते समुद्रकिनारे, 'भारत पर्व 2026'मध्ये महाराष्ट्र पर्यटन दालनाला पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद

सांस्कृतिक वारसा ते समुद्रकिनारे, 'भारत पर्व 2026'मध्ये महाराष्ट्र पर्यटन दालनाला पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद

Follow Us
Close
Follow Us:
  • गड-किल्ले, समुद्रकिनारे, सांस्कृतिक वारसा आणि युनेस्को मान्यताप्राप्त स्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यात आली.
  • देश-विदेशातील पर्यटक आणि पर्यटन क्षेत्रातील भागधारकांनी दालनाला भेट देत महाराष्ट्र पर्यटनाबाबत विशेष उत्सुकता दाखवली.
  • या महोत्सवामुळे महाराष्ट्र पर्यटनाची जागतिक ओळख अधिक बळकट झाली असून, आर्थिक आणि पर्यटन वृद्धीसाठी नवे संधीद्वार खुले झाले आहेत.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लाल किल्ल्यासमोरील लॉन्स आणि ग्यानपथ, नवी दिल्ली येथे 26 ते 31 जानेवारी दरम्यान ‘भारत पर्व 2026’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सहा दिवसीय महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दालन उभारुन सहभाग घेतला होता. महोत्सवामधील पर्यटन विभागाच्या दालनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

या वर्षी चुकूनही बनवू नका हे देश फिरण्याचा प्लॅन… सुरक्षेच्या बाबतीत इथे आहे मोठा धोका

सदर महोत्सवामध्ये विविध राज्यांतील सांस्कृतिक विविधता, खाद्यपदार्थ, पोशाख, हस्तकला, लोककला आणि संगीताचे अनोखे दर्शन घडले. विविधतेमध्ये एकता असल्याचा संदेश या महोत्सवामधून देण्यात आला. ‘भारत पर्व 2026’मध्ये पर्यटन विभागाच्या दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दालनाद्वारे राज्यातील विविध पर्यटन क्षेत्र, पर्यटन स्थळी जाण्याची सोय, उपलब्ध सोयी-सुविधा इत्यादी माहिती उपलब्ध करुन देण्यात आली.

सांस्कृतिक वारसा, समुद्रकिनारे, युनेस्को मान्यताप्रात्प गडकिल्ले अशा पर्यटन विषयक वैशिष्ट्य असलेल्या स्थळांची माहिती या दालनाद्वारे पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात आली. राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती जगभरात पोहोचविणे हा या दालनामागचा मुख्य उद्देश होता.

विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील भागधारक तसेच अनेक पर्यटकांनी पर्यटन विभागाच्या दालनाला भेट दिली. पर्यटन क्षेत्रातील विविध स्तरांमधील घटकांनी महाराष्ट्र पर्यटन आणि सेवांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यात रुची दाखविली. दालनाच्या सर्जनशील सादरीकरणाबाबत तसेच महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती व विविध पर्यटन क्षमता वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे अनेकांनी कौतुक केले.

प्रधान सचिव संजय खंदारे म्हणाले की, “भारत पर्व ’ महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्थरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. राज्यातील गड-किल्ले, सांस्कृतिक वारसा, समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणे आदी पर्यटनविषयक वैशिष्ट्ये असलेल्या स्थळांची माहिती जगभरात पोहोचविण्यासाठी विशेष फायदा झाला. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील भागधारकांनी महाराष्ट्र पर्यटनाबाबत जाणून घेण्यास अधिक रुची दाखविली. याचा पर्यटन क्षेत्राला आर्थिक दृष्ट्या नक्कीच फायदा होईल”.

संचालक डॉ. बी.एन.पाटील, पर्यटन संचालनालय (भा.प्र.से.) म्हणाले की, “भारत पर्व ‘ महोत्सवामध्ये महाराष्ट्र पर्यटन विभागाने सहभाग घेऊन राज्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांची माहिती पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यात आली. महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या भागधारकांद्वारे पर्यटन सेवा-सुविधांची माहिती आदान प्रदान करण्यात आली. यामुळे विविध पर्यटन क्षेत्रातील भागधारकांना पर्यटन वाढीसाठी मदत मिळेल. तसेच सदर महोत्सवाच्या माध्यामातून महाराष्ट्र पर्यटन विभागाने पर्यटन क्षेत्रातील आपली ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे”.

National Tourism Day 2026: प्रवासात तणाव येतोय? फॉलो करा या 5 स्मार्ट टिप्स आणि सहलीला बनवा लाइफस्टाईल

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागची ३१ मे २००६ रोजी स्थापना झाली. राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्र अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या विभागाची स्थापना करण्यात आली. पर्यटन आणि संस्कृती यांची नाळ एकमेकांशी घट्ट जोडलेली आहे. कारण ऐतिहासिक स्मारके, लोककला आणि स्थानिक परंपरा या केवळ सांस्कृतिक ठेवा नसून पर्यटन आकर्षण म्हणूनही ओळखल्या जातात. हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणि या क्षेत्रांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ स्तरावरील विभाग स्थापन केला.

सदर विभाग महाराष्ट्रातील अद्वितीय कला प्रकार, परंपरा आणि ऐतिहासिक स्थळे जपण्यासाठी, त्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी कार्य करतो. तसेच, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवून, पर्यटन विकासाला चालना देऊन हा विभाग राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान देत आहे. सदर विभागाच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्य केवळ एक पर्यटन स्थळ म्हणूनच नव्हे, तर एक जिवंत संस्कृती आणि वारसा असलेले राज्य म्हणून अधिक समृद्ध आणि आकर्षक बनत आहे.

अधिकृत संसाधने:

  • सविस्तर माहितीसाठी maharashtratourism.gov.in ला भेट द्या.
  • बुकिंगसाठी www.mtdc.co ला भेट द्या.
  • तुमच्या सहलीचे नियोजन mahabooking.com वर करा.

Web Title: Maharashtra tourism pavilion received an enthusiastic response from tourists at bharat parv 2026 lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • lifestyle news
  • Maharashtra Tourism
  • New Delhi
  • travel news

संबंधित बातम्या

जगातील सर्वात रहस्यमयी गुफा जिथे आहेत ‘देवाचे डोळे’… साहस प्रेमींसाठी खास; अनेक चित्रपटांचीही शूटिंग झालीये इथे
1

जगातील सर्वात रहस्यमयी गुफा जिथे आहेत ‘देवाचे डोळे’… साहस प्रेमींसाठी खास; अनेक चित्रपटांचीही शूटिंग झालीये इथे

जुनी, काळी पडलेली सोन्याची ज्वेलरी नव्यासारखी चमवायची आहे? मग या होम ट्रिकचा वापर करा आणि घरीच दागिन्यांची शाईन वाढवा
2

जुनी, काळी पडलेली सोन्याची ज्वेलरी नव्यासारखी चमवायची आहे? मग या होम ट्रिकचा वापर करा आणि घरीच दागिन्यांची शाईन वाढवा

रेल्वेत नेहमी निळ्या रंगाच्या सीट्स का असतात? रंगामागचं हे तथ्य तुम्हाला माहिती आहे का?
3

रेल्वेत नेहमी निळ्या रंगाच्या सीट्स का असतात? रंगामागचं हे तथ्य तुम्हाला माहिती आहे का?

चेहरा टॅन होतोय? उन्हाळ्यात सनस्क्रिनचं काम करतील ही फळं, फक्त अशाप्रकारे करा वापर
4

चेहरा टॅन होतोय? उन्हाळ्यात सनस्क्रिनचं काम करतील ही फळं, फक्त अशाप्रकारे करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.