Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुणींमध्ये वाढतेय स्तनातील गाठींचे प्रमाण! तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळीच करा उपचार, अन्यथा उद्भवेल गंभीर आजारांचा धोका

जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे, लठ्ठपणा, हार्मोन्समधील असंतुलन इत्यादी अनेक गोष्टींमुळे वयाच्या 20, 30 आणि 40 वर्षांच्या व्यायोगटातील महिलांमध्ये स्तनासंबंधित समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. स्तनांमध्ये गाठी झाल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 27, 2026 | 03:35 PM
तरुणींमध्ये वाढतेय स्तनातील गाठींचे प्रमाण! तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळीच करा उपचार, अन्यथा उद्भवेल गंभीर आजारांचा धोका

तरुणींमध्ये वाढतेय स्तनातील गाठींचे प्रमाण! तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळीच करा उपचार, अन्यथा उद्भवेल गंभीर आजारांचा धोका

Follow Us
Follow Us:

पुणे: अलीकडच्या काळात 20 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये स्तनातील गाठी (Breast Lumps) आढळण्याचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. जरी या गाठींपैकी बहुतांश गाठी कर्करोगाच्या नसल्या तरी स्तनात जाणवणाऱ्या कोणत्याही नव्या गाठीकडे दुर्लक्ष करू नये आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.(फोटो सौजन्य – istock)

जागतिक डोके व मान कर्करोग दिनानिमित्त HNCII ची जनजागृती मोहीम! वेळेत निदान केल्यास वाचू शकतो जीव

पूर्वी स्तनातील गाठींची समस्या प्रामुख्याने वयोवृद्ध महिलांमध्ये दिसून येत होती. मात्र, आता 20, 30 आणि 40 वर्षांच्या वयोगटातील महिला देखील स्तनाशी संबंधित तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे येत आहेत. बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, हार्मोन्समधील असंतुलन, उशिरा होणारी गर्भधारणा, कुटुंबातील स्तनाच्या कर्करोगाचा वैद्यकीय इतिहास तसेच महिलांमध्ये वाढलेली जागरूकता ही या वाढत्या प्रमाणामागील संभाव्य कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मदरहूड हॉस्पिटल, लुल्लानगर, पुणे येथील प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुजाता उदय राजपूत म्हणाल्या, दर आठवड्याला 25 ते 45 वयोगटातील सुमारे 10 पैकी 3 महिला स्वयं स्तन तपासणी करताना किंवा दैनंदिन काम करताना स्तनात गाठ जाणवल्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येतात. या गाठींपैकी अनेक गाठी फायब्रोअॅडेनोमा, सिस्ट, हार्मोन्समधील बदल किंवा संसर्गामुळे निर्माण झालेल्या आणि कर्करोगाशी संबंधित नसतात. मात्र, स्तनात सतत जाणवणारी गाठ, स्तनाच्या आकारात किंवा स्वरूपात बदल, स्तनाग्रातून स्त्राव होणे, त्वचेवर खड्डा पडणे, स्तनाग्र आतल्या दिशेने ओढले जाणे किंवा काखेत सूज येणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करणे आवश्यक आहे. योग्य वेळी वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक इमेजिंग चाचण्यांद्वारे गाठीचे कारण शोधता येते आणि गरज असल्यास वेळीच उपचार सुरू करता येतात.

त्या पुढे म्हणाल्या, अनेक तरुण महिलांना असे वाटते की या तरुण वयात आपल्याला स्तनाचा कर्करोग होऊच शकत नाही आणि हा एक गैरसमज असतो. त्यामुळे त्या डॉक्टरांकडे जाण्यास विलंब करतात. स्तनात जाणवलेली कोणतीही नवीन गाठ काही आठवडे कायम राहिल्यास तिच्याकडे दुर्लक्ष करू नये. स्तनांविषयी जागरूक राहणे, नियमित स्वयं स्तन तपासणी करणे, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे आणि ज्या महिलांना धोका अधिक आहे त्यांनी नियमित तपासणी करून घेणे, यामुळे स्तनाचा कर्करोग असल्यास तो सुरुवातीच्या टप्प्यात ओळखता येतो. वेळीच उपचार केल्यास महिलांचे आरोग्य आणि जीवनमान सुधारण्यास मदत होते.

पायांना सतत खाज येते? नायट्यापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, जळजळ होईल कमी

डॉ. राजपूत यांनी सांगितले की, स्तनांच्या आरोग्याबाबत जागरूकता हेच सर्वात प्रभावी शस्त्र आहे. दर आठवड्याला 25 ते 45 वयोगटातील सुमारे 10 पैकी 2 महिला गाठ आपोआप नाहीशी होईल किंवा ती गंभीर नसेल, या समजुतीमुळे डॉक्टरांचा सल्ला घेण्यास उशीर करतात. प्रत्येक महिलेने नियमित स्वयं स्तन तपासणी करावी, कोणताही असामान्य बदल जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, वजन नियंत्रणात ठेवावे, नियमित व्यायाम करावा आणि कुटुंबात स्तनाच्या कर्करोगाचा वैद्यकीय इतिहास असल्यास डॉक्टरांना त्याची माहिती द्यावी. प्रत्येक गाठ ही कर्करोगाचीच असते असे नाही, मात्र प्रत्येक गाठीची तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेत निदान झाल्यास गंभीर आजार टाळतात येतो, अनावश्यक भीती कमी होते आणि आवश्यक उपचार त्वरित सुरू करता येतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्तनात गाठ आढळल्यास ती नेहमी कर्करोगाचे लक्षण असते का?

    Ans: नाही. स्तनातील सर्व गाठी कर्करोगाच्या नसतात. काही गाठी फायब्रोअॅडेनोमा किंवा सिस्टसारख्या सौम्य (Benign) असू शकतात.

  • Que: तरुणींमध्ये स्तनातील गाठी का निर्माण होतात?

    Ans: हार्मोन्समधील बदल, फायब्रोअॅडेनोमा, सिस्ट, संसर्ग किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळे स्तनात गाठ तयार होऊ शकते. यामागील नेमके कारण जाणून घेण्यासाठी वैद्यकीय तपासणी गरजेची असते.

  • Que: स्तनातील गाठीची कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत?

    Ans: स्तनात नवीन गाठ जाणवणे, त्वचेत बदल दिसणे, स्तनाग्रातून असामान्य स्त्राव येणे, स्तनाचा आकार बदलणे किंवा सतत वेदना जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: Incidence of breast lumps is rising among young women seek timely treatment based on expert advice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • breast
  • Doctor advice
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

चमकदार त्वचेसाठी आजपासूनच प्या ‘हे’ नॅचरल ज्यूस, सुरकुत्या कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल गोल्डन ग्लो
1

चमकदार त्वचेसाठी आजपासूनच प्या ‘हे’ नॅचरल ज्यूस, सुरकुत्या कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल गोल्डन ग्लो

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अजिबात करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यासोबतच वाढेल अपचनाचा त्रास
2

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अजिबात करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यासोबतच वाढेल अपचनाचा त्रास

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने खा बडीशेप, महिनाभरात व्हाल स्लिम
3

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने खा बडीशेप, महिनाभरात व्हाल स्लिम

वातावरणातील बदलांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहे? मग नियमित प्या ‘हे’ आयुर्वेदिक काढे, आजारांपासून होईल बचाव
4

वातावरणातील बदलांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहे? मग नियमित प्या ‘हे’ आयुर्वेदिक काढे, आजारांपासून होईल बचाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.