Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nutrient Rich Ladoo: हिवाळ्यात कंबर आणि गुडघेदुखीच्या त्रासाने हैराण झाला आहात? मग रोज खा ‘हा’ पौष्टिक लाडू, हाडे होतील मजबूत

थंडीच्या दिवसांमध्ये हाडांच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात पौष्टिक लाडूचे सेवन करावे. या लाडूच्या सेवनामुळे आरोग्य सुधारण्यासोबतच हाडे मजबूत होतात आणि स्नायूंना ऊर्जा मिळते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 10, 2026 | 12:08 PM
हिवाळ्यात कंबर आणि गुडघेदुखीच्या त्रासाने हैराण झाला आहात? मग रोज खा 'हा' पौष्टिक लाडू, हाडे होतील मजबूत

हिवाळ्यात कंबर आणि गुडघेदुखीच्या त्रासाने हैराण झाला आहात? मग रोज खा 'हा' पौष्टिक लाडू, हाडे होतील मजबूत

Follow Us
Follow Us:

Nutrient Rich Ladoo: राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे थंड वारे वाहू लागले आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची जास्त काळजी घेण्याचा सल्ला कायमच दिला जातो. या दिवसांमध्ये हाडांमध्ये वेदना, कंबर दुखी, स्नायूंमध्ये वेदना इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. या दिवसांमध्ये शरीराला जास्त पोषणाची आवश्यकता असते त्यामुळे आहारात वेगवेगळ्या पौष्टिक आणि शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. कंबरदुखीसोबतच शरीरात थकवा आणि अशक्तपणा सुद्धा वाढू लागतो. शारीरिक आरोग्य बिघडल्यानंतर रोजच्या आयुष्यातील कामे करताना सुद्धा खूप जास्त थकल्यासारखे वाटते. त्यामुळे आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला थंडीच्या दिवसांमध्ये कंबरदुखी आणि गुडघेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या लाडूचे सेवन करावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

Firecracker Burn First Aid: दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजला आहे? घाबरून न जाता ‘हे’ घरगुती उपाय केल्यास तातडीने मिळेल आराम

थंडीच्या दिवसांमध्ये नियमित एक लाडू खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळेल. या लाडूचे सेवन केल्यामुळे शरीरातील हाडे मजबूत आणि ताकदवान होण्यास मदत होईल. सकाळच्या नाश्त्यात अनेकांना चहा बिस्कीट किंवा इतर तेलकट पदार्थ खाण्याची खूप जास्त सवय असते. पण त्याऐवजी नियमित एक लाडू खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळेल.

लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

काजू
बदाम
खसखस
तूप
मगज बी
अक्रोड
तीळ
भोपळ्याच्या बिया
सुक खोबर
खजूर
वेलची पावडर

लाडू बनवण्याची कृती:

पौष्टिक लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घ्या. भाजलेला खोबऱ्याचा किस थंड करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात काजू, बदाम, खसखस, भोपळ्याच्या बिया, अक्रोड, मगज बी वेगवेगळे भाजून घ्या. त्यानंतर कढईमध्ये तूप गरम करून त्यात खजूर घाला आणि मंद आचेवर मिक्स करा. खजूर पूर्णपणे विरघळून गेल्यानंतर मंद आचेवर ठेवून द्या. भाजून घेतलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या आणि खजूरच्या मिश्रणात टाका. त्यानंतर त्यात वेलची पावडर, खसखस आणि तीळ घाला. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हाताला तूप लावा आणि तुमच्या आवडीनुसार लाडू बनवा. तयार केलेले लाडू काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. जेणेकरून लाडू खराब होणार नाहीत.

लाडूमध्ये असलेले आळशी, तीळ आणि अक्रोड शरीराला ऊर्जा देतात. दैनंदिन आहारात लाडूसोबतच संतुलित आहार, भरपूर पाणी, शारीरिक हालचाल करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आहारात उष्ण पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्य चांगले राहते. अळशीच्या बियांमध्ये असलेले फॅटी ऍसिड मेंदूच्या आरोग्यासाठी गुणकारी ठरते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हिवाळ्यात पौष्टिक लाडू खाण्याचे काय फायदे आहेत?

    Ans: हिवाळ्यात पौष्टिक लाडू खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. त्यातील सुका मेवा, बिया आणि पौष्टिक घटकांमुळे शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळण्यास मदत होते.

  • Que: हिवाळ्यात दररोज किती पौष्टिक लाडू खावेत?

    Ans: लाडूंचे प्रमाण त्यातील साखर, गूळ, तूप आणि सुका मेवा यावर अवलंबून असते. साधारण एक छोटा लाडू मर्यादित प्रमाणात खाऊ शकता.

  • Que: हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियमसोबत कोणते पोषक घटक आवश्यक आहेत?

    Ans: कॅल्शियमसोबत व्हिटॅमिन D, प्रोटीन, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे घटकही हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.

Web Title: Nutrient rich ladoo are you troubled by lower back or knee pain during winter then eat this nutritious ladoo daily sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Healthy Foods
  • Winter Care

संबंधित बातम्या

Clove: नियमित लवंग खात असाल तर थांबा! अतिसेवन केल्यास आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम
1

Clove: नियमित लवंग खात असाल तर थांबा! अतिसेवन केल्यास आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम

कच्च्या भाज्यांचे सॅलड खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन का वाढते? संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ‘या’ पद्धतीने खा भाज्या
2

कच्च्या भाज्यांचे सॅलड खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन का वाढते? संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ‘या’ पद्धतीने खा भाज्या

Tea Side Effects: उपाशी पोटी चहासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांचे होईल गंभीर नुकसान
3

Tea Side Effects: उपाशी पोटी चहासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांचे होईल गंभीर नुकसान

Strong Bones: तरुण वयात गुडघे- कंबरेमध्ये वेदना होतात? मग दुधात मिक्स करून प्या ही पावडर, हाडे होतील बळकट
4

Strong Bones: तरुण वयात गुडघे- कंबरेमध्ये वेदना होतात? मग दुधात मिक्स करून प्या ही पावडर, हाडे होतील बळकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.