पौष्टिक अशा जवसची खमंग चटणी कशी करायची याची सविस्तर रेसिपी जाणून घ्या
साहित्यः
दिड वाटी जवस
अर्धा वाटी तिळ
कढीपत्ता
वाळलेल्या लाल मिरच्या चार ते पाच
जिरे
मीठ
लसूण
तेल
कृती
सर्वप्रथम एका लोखंडी कढईत थोडया तेलात लाल मिरच्या लसूण आणि कढीपत्ता तळून घ्यावा व बाजुला काढून ठेवावा.
त्याच तेलात नंतळ जवस परतून हलकीशी परतून घ्यावी. थोडा खमंग सुवास आला की त्यात तीळ घालून मंद आचेवर तीळ आणि जवस भाजून घ्यावे.
भाजलेले जवस आणि तीळ थोडे गार झाले की त्यात मीठ, जिरे व तळलेल्या मिरच्या, लसूण आणि कढीपत्ता घालून मिक्सरमधून फिरवून घेणे किंवा खलबत्त्यात चटणी कुटून घ्यावी.
अशा रितीने खमंग जवसाची चटणी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही हिवाळ्यात गरम गरम भाकरी किंवा पोळीसोबत खाऊ शकता. सोबतीला ओल्या कांद्याची पात असल्यास अजून मजा येईल.
Web Title: Include linseed chutney in your diet during winter days extremely useful for the body nrrd