धुळे शहरातील ऐतिहासिक बालाजी रथोत्सवाला पारंपरिक जल्लोषात सुरुवात झाली आहे. तब्बल 145 वर्षांची परंपरा असलेल्या या रथोत्सवाची सुरुवात बालाजी मंदिरात पूजा-अर्चा व आरती करून करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघणाऱ्या या रथाच्या मिरवणुकीसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, जिल्हाभरातून हजारो भक्त दर्शनासाठी दाखल झाले आहेत. तब्बल 24 तास चालणाऱ्या या मिरवणुकीत शहरासह ग्रामीण भागातील भाविक उत्साहाने सहभागी होत आहेत. नवरात्रीनिमित्त दरवर्षी 11 दिवस भगवान बालाजींची भव्य मिरवणूक विविध मार्गांवरून काढली जाते.