मेंदूच्या पेशी कायमच निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराला आवश्यक पोषक घटकांची आवश्यकता असते. शरीरातील विटामिन, प्रोटीन, जीवनसत्वे, कॅल्शियम योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. शरीरासोबतच मेंदूच्या आरोग्याची सुद्धा जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. मेंदू शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. मेंदूच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य थांबते. त्यामुळे मेंदूच्या कार्यात कोणतेही अडथळे येऊ नये म्हणून शरीराची जास्त काळजी घ्यावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मेंदूच्या पेशी कायमच निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे रणशक्ती वाढते, लक्ष केंद्रीत करण्यास मदत होते आणि वय वाढल्यानंतर सुद्धा मेंदू कायमच सक्रिय राहतो.(फोटो सौजन्य – istock)
आंबट गोड चवीची ब्लूबेरी सगळ्यांचं खूप जास्त आवडते. ब्लूबेरी खाल्यामुळे आरोग्य सुधारते. ब्लूबेरीमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटीऑक्सिडंट आढळून येतात. याशिवाय ब्लूबेरीचे सेवन तुम्ही नुसतेच सुद्धा करू शकता. ब्लूबेरी खाल्यामुळे मेंदूच्या कार्यात अडथळे निर्माण होत नाहीत. यासोबतच मेंदू कायम सक्रिय राहतो.
संत्री खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. वर्षाच्या बाराही महिने बाजारात संत्री उपलब्ध असतात. त्यामुळे संत्र्याचा रस किंवा संत्र तुम्ही खाऊ शकता. यामध्ये असलेले विटामिन सी मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. तसेच फ्री रॅडिकल्सपासून मेंदूचा बचाव करण्यासाठी नियमित एक संत्र खावे. मात्र सकाळी उपाशी पोटी संत्र्याचे सेवन करू नये.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असलेले अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. तसेच हळदीमध्ये असलेले क्यूमिन शरीरात वाढलेली जळजळ, सूज कमी करण्यासाठी मदत करते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी हळदीच्या पाण्याचे सेवन करावे. तसेच हळदीच्या दुधाचे सेवन करणे सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं डार्क चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. डार्क चॉकलेट खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. नियमित एक तुकडा डार्क चॉकलेट खायल्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते. यामध्ये असलेले फ्लेवोनॉइड्स आणि कॅफीन मूड सुधारण्यास मदत करतात.
मेंदूच्या आरोग्यासाठी काय चांगले आहे?
नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेसा आराम, आणि मानसिकदृष्ट्या सक्रिय राहणे मेंदूसाठी चांगले आहे. नियमितपणे नवीन गोष्टी शिकणे, आव्हानात्मक कामे करणे, आणि सामाजिकमध्ये सहभागी होणे मेंदूला उत्तेजित करते.
मेंदूच्या आरोग्यासाठी काय वाईट आहे?
धूम्रपान, अति मद्यपान, आणि अस्वास्थ्यकर आहार मेंदूसाठी हानिकारक आहेत. तसेच, जास्त ताण (stress), अपुरी झोप, आणि मानसिकदृष्ट्या निष्क्रिय राहणे देखील मेंदूसाठी हानिकारक आहे.
मेंदूच्या आरोग्यासाठी विशेष आहार?
संतुलित आणि पौष्टिक आहार मेंदूसाठी महत्त्वाचा आहे. फळे, भाज्या, मासे, आणि नट्स (nuts) यांसारख्या गोष्टी मेंदूसाठी फायदेशीर आहेत, असे एका आरोग्य संस्थेने नमूद केले आहे.