बंद नाक होईल मोकळे! 'हे' आयुर्वेदिक उपाय करून तात्काळ मिळवा आराम
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात सतत काहींना काही बदल होत असतात. कधी ऊन तर कधी पाऊस पडत आहे. याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब इत्यादी अनेक समस्या वाढू लागल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा बाहेरील जंक फूडचे किंवा रस्त्यावरील स्टोलमध्ये ठेवलेले पदार्थ खाल्यामुळे पोट पूर्णपणे बिघडून जाते. हल्ली लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंतसगळेच सर्दी, खोकल्याच्या समस्येने त्रस्त आहेत. वारंवार खोकला आल्यामुळे मेंदूच्या नसांवर ताण येतो, ज्यामुळे डोकं दुखणे किंवा इतरही समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सर्दी, खोकल्यापासून कायमचा आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
नाक बंद होणे, सर्दी होणे, नाकातून पाणी येणे, घशात खवखव इत्यादी आरोग्यासंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचते. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यानंतर वारंवार थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे खोकला आणि सर्दीपासून आराम मिळवण्यासाठी वाफ घ्यावी. वाफ घेल्यामुळे छातीमध्ये सुकलेला कफ मोकळा होण्यास मदत होते. गरम पाण्यात ओवा, तमालपत्र, काळीमिरी पावडर टाकून पाणी गरम करा. गरम पाण्याची ५ ते १० मिनिट वाफ घेतल्यानंतर सर्दी कमी होण्यास मदत होईल. वाफ घेताना डोक्यावर टॉवेल ठेवून वाफ घ्यावी.
आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ओवा आणि काळीमिरी पावडर आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. यामध्ये असलेले गुणधर्म सर्दी खोकल्यापासून तात्काळ आराम मिळवून देतात. सर्दी खोकला वाढल्यानंतर बऱ्याचदा डॉक्टरांच्या गोळ्यांनी सर्दी लगेच सुकून जाते पण कफ छातीमध्ये तसाच साचून राहतो. ज्यामुळे छातीमध्ये वेदना होणे, छाती भरून आल्यासारखे वाटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.
सर्दी खोकला किंवा नाक बंद झाल्यानंतर घरगुती उपाय करावे. घरगुती उपाय आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. यासाठी तुळशीची पाने अतिशय गुणकारी ठरतील. गरम पाण्यात तुळशीची पाने, ओवा, काळे मीठ आणि यूकेलिप्टस ऑइल टाकून पाणी गरम करून घ्या. पाणी गरम झाल्यानंतर डोक्यावर टॉवेल ठेवून १० मिनिट पाण्याची वाफ घ्यावी. यामुळे सर्दी, खोकला आणि आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळेल.
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘हे’ ड्रिंक ठरेल प्रभावी, चरबीचे टायर होतील गायब
चेहऱ्यासाठी वाफ घेण्याचे फायदे:
वाफ त्वचेवरील छिद्र उघडते आणि त्वचेतील घाण, तेल आणि मृत पेशी काढून टाकते, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसते. वाफेमुळे त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचेला ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा चांगला होतो, असे एका आरोग्य वेबसाइटने म्हटले आहे.
सर्दी, खोकला आणि कफासाठी वाफ घेण्याचे फायदे:
गरम पाण्याची वाफ घेतल्याने श्वासनलिका मोकळी होते आणि सर्दी, खोकला आणि कफ कमी होतो. वाफेमुळे कफ पातळ होतो, ज्यामुळे तो शरीरातून बाहेर काढणे सोपे होते.
वाफ घेताना काय काळजी घ्यावी:
चेहऱ्याला जास्त जवळून वाफ घेऊ नये, कारण त्यामुळे त्वचेला इजा होऊ शकते. गरम पाण्याची वाफ घेताना डोळे बंद ठेवावेत.