
रोजच्या आहारात नियमित करा 'या' चटणीचा समावेश! वाढत्या रक्तदाबाच्या त्रासापासून कायमची मिळेल सुटका
कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणे आणि कारणे?
जवस बिया खाण्याचे फायदे?
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काय खावे?
जीवनशैलीतील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव, शारीरिक हालचालींची कमतरता, सतत जंक फूडचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे संपूर्ण शरीराचे आरोग्य बिघडून जाते. बिघडलेल्या जीवनशैलीचा सगळ्यात जास्त परिणाम हृदयाच्या आरोग्यावर दिसून येतो. रक्तात वाढलेले उच्च कोलेस्ट्रॉल वेगवेगळ्या आजारांचे कारण बनते. शरीरात उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांना हानी पोहचते. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेला पिवळ्या रंगाचा चिकट थर संपूर्ण शरीराचे गंभीर नुकसान करतो. यामुळे रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. रक्तप्रवाहात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन पुरवठा होत नाही. यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. (फोटो सौजन्य – istock)
शरीरात वाढलेल्या उच्च कोलेस्टरॉलमुळे हृदयाचे आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे आहारात पौष्टिक आणि शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांच्या सेवनामुळे करावे. आज आम्ही तुम्हाला वाढत्या रक्तदाबाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या चटणीचे आहारात सेवन करावे? चटणी खाल्ल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. भारतीय स्वयंपाक घरात अनेक वेगवेगळे पदार्थ उपलब्ध असतात. त्यातील अतिशय पौष्टिक पदार्थ जवस. जवसाच्या चटणीचे नियमित सेवन केल्यास उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होईल. जवस खाल्ल्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते.
जवसाची पौष्टिक चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये जवस टाकून मंद आचेवर भाजा. जवस भाजून हलकेसे लाल झाल्यानंतर काढून थंड करा. त्यानंतर कढईमध्ये खोबऱ्याचा किस, जिरं भाजून घ्या. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यात लसूण भाजा. सर्व साहित्य पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक चटणी वाटून घ्या. चटणी वाटण्याआधी त्यात चवीनुसार मीठ, थोडस लाल तिखट आणि हळद घालून बारीक करून घ्यावी. यामुळे चटणीची चव चांगली लागते. तयार केलेली जवस चटणी जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहण्यासाठी काचेच्या डब्यात भरून ठेवावी. सकाळ संध्याकाळ भाकरी किंवा चपातीसोबत जवस चटणीचे सेवन करा.
जवस खाल्ल्यामुळे रक्तात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड, अल्फा-लिनोलेनिक ऍसिड हृदयाचे रक्षण करतात. याशिवाय रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवून हृदयविकाराचा झटका येण्यापासून शरीराला बचाव होतो. जवासामध्ये असलेल्या घटकांमुळे रक्तात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. जवस बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. फायबरयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे आतड्यांची हालचाल सुलभ राहते.
जवस बियांमध्ये आढळून येणारे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम शरीरातील सर्वच हाडे मजबूत ठेवण्यासाठी मदत करते. याशिवाय वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी जवस बियांचे पाणी किंवा जवस बियांपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होतात आणि आरोग्य सुधारते. फायबर युक्त जवस चटणीचे नियमित सेवन केल्यास शरीराला भरपूर फायदे होतील.
Ans: रक्तदाब म्हणजे हृदय पंप करताना आणि दोन ठोक्यांच्या दरम्यान धमन्यांमधील रक्ताचा दाब.
Ans: पुरुषांसाठी 120/80 ते 130/85 mmHg आणि महिलांसाठी 110/70 ते 120/80 mmHg पर्यंतची श्रेणी
Ans: जास्त मीठ खाणे, प्रक्रिया केलेले अन्न, जंक फूड.