Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल एका झटक्यात होईल कमी! रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ फळांचे सेवन, हृदयाला होतील फायदे

शरीरात वाढलेले उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या फळांचे सेवन करावे. फळांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. जाणून घ्या कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय खावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 19, 2025 | 08:39 AM
रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल एका झटक्यात होईल कमी! रोजच्या आहारात नियमित करा 'या' फळांचे सेवन

रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल एका झटक्यात होईल कमी! रोजच्या आहारात नियमित करा 'या' फळांचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक तणाव, थकवा, अशक्तपणा इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची खूप जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेले उच्च कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय घटक ठरते. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात, ज्यामुळे हृदयाला ऑक्सिजन पुरवठा होत नाही. चुकीच्या सवयींमुळे शरीरात उच्च रक्तदाब वाढतो आणि हृदयावर आलेल्या तणावामुळे रक्तवाहिन्यांवर अधिक तणाव येतो. शरीरात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल बाहेर पडून न गेल्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो.(फोटो सौजन्य – istock)

हिवाळ्यात ‘या’ पदार्थांचे सेवन चुकूनही करू नका! आरोग्याचे वाजवाल तीन-तेरा

नियमित फळांचे सेवन केल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेला प्लेक बाहेर पडून जाण्यास मदत होते आणि रक्त पातळ होते. उच्च कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्याला हानी पोहचवते. त्यामुळे आहारात फायबर, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्व, खनिजांनी समृद्ध असलेल्या फळांचे नियमित सेवन करावे.यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांचे आहारात नियमित सेवन करावे.

सफरचंद:

सकाळी उठल्यानंतर नाश्त्यात नियमित एक सफरचंद खावे. सफरचंदमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी सफरचंद खावे. यामध्ये असलेल्या फायबरमुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. सफरचंदातील अँटिऑक्सिडंट्स धमन्यांमधील दाह कमी करून शरीरात वाढलेली जळजळ कमी करतात.त्यामुळे नियमित एक सफरचंद खावे.

संत्री:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आंबट फळे खायला खूप जास्त आवडतात. आंबट फळांमध्ये प्रामुख्याने संत्री किंवा मोसंबी खाल्ली जाते. यामध्ये असलेले विटामिन सी त्वचेवरील डाग, पिंपल्स कमी करण्यासाठी मदत करतात. संत्र्यात विटामिन सी आणि फ्लॅवोनॉइड्स मुबलक प्रमाणात आढळून येते. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि शरीराला अनेक फायदे होतात. रक्तवाहिन्यांमधील लवचिकता कायम टिकवून ठेवण्यासाठी संत्र्याचे सेवन करावे.

द्राक्ष:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं द्राक्ष खायला खूप जास्त आवडतात. आंबट गोड चवीची द्राक्ष नियमित खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतील. रक्तात वाढलेली खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नष्ट करण्यासाठी द्राक्ष खावीत. द्राक्षांमध्ये असलेले पॉलीफेनोल्स हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानले जाते. याशिवाय हाडे आणि मेंदूच्या आरोग्यासाठी द्राक्षांचे सेवन करावे.

वायू प्रदूषणाचा नवशिशूंवर परिणाम! रिसर्च म्हणतं “मेंदूचा विकास…”

डाळिंब:

लाल चुटुक डाळिंबाच्या दाण्यांच्या सेवन केल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये असलेले पॉलीफेनोल्स उच्च रक्तदाब नियमित ठेवण्यासाठी मदत करते. नियमित डाळिंब खाल्ल्यास हृदयविकार, स्ट्रोक आणि अँजाइना इत्यादी आजारांपासून शरीराची सुटका होते.

FAQs (संबंधित प्रश्न)

कोलेस्ट्रॉलची पातळी तपासणे:

रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी तपासण्यासाठी डॉक्टर लिपिड पॅनेलची शिफारस करू शकतात.यासाठी प्रयोगशाळेत रक्त तपासणी केली जाते. घरी तपासणी करण्यासाठी घरगुती किट उपलब्ध आहेत, ज्यामध्ये बोटातील रक्ताचा एक लहान नमुना वापरला जातो.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचे उपाय:

मार्जरीन, कुकीज, क्रॅकर्स आणि काही प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये असलेले ट्रान्स फॅट्स टाळा. भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि शेंगा यांसारखे फायबरयुक्त पदार्थ LDL कमी करण्यास मदत करतात.चालणे, धावणे, सायकलिंग किंवा पोहणे यासारखे नियमित व्यायाम केल्याने LDL कमी होते आणि HDL वाढते.

कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?

शरीराला आवश्यक असलेले मेणासारखे पदार्थ, जे रक्ताद्वारे वाहून नेले जातात. ‘चांगले’ (HDL) आणि ‘वाईट’ (LDL) असे दोन मुख्य प्रकार आहेत. जास्त ‘वाईट’ कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो, कारण त्यामुळे धमन्यांमध्ये ‘प्लाक’ तयार होतो, ज्यामुळे रक्त प्रवाह कमी होऊ शकतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Increased blood cholesterol will be reduced in a flash consume these fruits regularly in your daily diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 08:39 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Cholesterol home Remedy
  • cholesterol symptoms

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.