फोटो सौजन्य - Social Media
वायू प्रदूषण इतके गंभीर आहे की याचा परिणाम नवशिंशुवर दिसून येत आहे. वाढत्या वायू प्रदूषणाचे प्रमाण फक्त श्वसनक्रिया नाही तर तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेवरदेखील परिणाम करत आहे आणि याची सुरुवात तुम्ही तुमच्या आईच्या गर्भात असल्यापासूनच सुरु होते. याचा शोध अमेरिकेत संशोधन कर्त्या काही वैज्ञानिकांनी घेतला आहे.
वैज्ञानिक त्यांचे म्हणणे आहे की जर गर्भवती स्त्री २.५ PM आकाराच्या कणांच्या संपर्कात येते. तेव्हा तिच्या गर्भातील शिशुवर त्याचा परिणाम होतो आणि हा परिणाम मस्तिष्कावर होतो. २.५ PM हे कण आकाराने इतके लहान असतात की त्याला मानवी डोळ्यांनी पाहणे शक्य नाही. आपल्या केसांच्या अगदी ३० पटीने लहान या कणांमध्ये आपल्या मेंदूची वाट लावण्याची ताकद असते कारण या कणांचा थेट परिणाम आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या नसांवर असतो आणि तो परिणाम झाला की आपल्या मेंदूचा उतार सुरु होतो.
विशेष असं की या कणांमध्ये काही असे पदार्थ आढळतात, जे आपल्या मेंदूच्या उत्तम कार्यशीलतेसाठी अतिशय महत्वाचे आहेत. तुम्हाला माहिती आहे का? हे कण कसे तर होतात? तर हे कण गाडी तसेच कारखानांमुळे तयार होतात. यामध्ये जे इंधन जाळले जाते, याचा थेट परिणाम या कणांच्या निर्मिती असा होतो.
आपण जेव्हा आपल्या आईच्या गर्भात असतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये मायलेशन नावाची महत्वाची प्रक्रिया सुरु असते आणि जेव्हा आपली आई प्रदूषणग्रस्त ठिकाणी असते, तेव्हा आपल्या मेंदूच्या या मायलेशन प्रक्रियेवर ताण येतो कारण मायलेशन ज्यामुळे आपल्या मेंदूच्या नसा एकमेकांच्या संपर्कात असतात, ते धीम्या गतीने काम करू लागते. संशोधन करताना १३७ नवशिशूंना तपासण्यात आले, प्रदूषणाच्या ठिकाणी राहणाऱ्या नवशिशूमध्ये मायलेशनवर एक प्रभाव दिसून आला होता.
मुळात, भ्रूण अवस्थेत असताना मेंदूचा नीट विकास झाला नाही तर भविष्यात मानसिक त्रास अनुभवण्याची दात शक्यता असते. याचा वाईट परिणाम मेंदूवर दिसून येतो.