या ठिकाणी चुकूनही जाऊ नका! सिंगापूरसह अनेक देशांनी जारी केली आपली Travel Advisory; सावधान व्हा
भारत-पाकिस्तानच्या युद्धाची ठिणगी आता देशातच नाही तर जगभर पसरू लागली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर आता परिस्थिती आणखीन बिकट होणार असल्याचा अंदाजा लावला जात आहे. याच पार्श्वभूमीवर, आता सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MFA) दिनांक 7 मे रोजी आपली एक नवीन ट्रॅव्हल ॲडव्हायजरी जारी केली आहे. यात, दक्षिण आशियातील काही भागांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे. हा इशारा प्रामुख्याने सुरक्षेच्या वाढत्या धोक्यांमुळे देण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या या भागांमध्ये उपस्थित असलेल्या सिंगापूरच्या नागरिकांना, MFA ने अधिक काळजी घेण्याचा, स्थानिक घडामोडींवर लक्ष ठेवण्याचा, गर्दीपासून दूर राहण्याचा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. MFA ने हे देखील स्पष्ट केले आहे की नागरिकांनी eRegister प्रणालीद्वारे आपल्या प्रवासाची नोंद करावी, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्याशी सहज संपर्क साधता येईल.
वाढत्या हालचाली आणि सतर्कता
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, “आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि परदेशातील आमच्या दूतावासांशी सातत्याने संपर्क साधत आहोत.” ही सूचना अशा वेळी आली आहे जेव्हा काही देशांमध्ये राजनैतिक व लष्करी हालचाली वेगाने वाढत आहेत. सीमावर्ती भागांमध्ये वाहतूक अडथळ्याला सामोरे जात असून, लष्करी हालचालींची नोंद झाली आहे. यामुळे तेथील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
इतर देशांचाही प्रवास सल्ला
यादरम्यानच, अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या अनेक देशांनीही त्यांच्या प्रवास सल्ल्यांमध्ये अद्ययावत माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या नागरिकांना दक्षिण आशियातील काही संवेदनशील भागांमध्ये प्रवास करताना सतर्क राहण्यास सांगितले आहे. काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी आपल्या उड्डाण मार्गांमध्ये बदल केले आहेत, जेणेकरून त्या संवेदनशील हवाई क्षेत्रांमधून जाणे टाळता येईल. सिंगापूर एअरलाइन्सने देखील काही मार्ग तात्पुरते बदलले आहेत.
पर्यटन क्षेत्रांवर होणार मोठा परिणाम
या ट्रॅव्हल ॲडव्हायजरीमु;ळे आता पर्यटन उद्योगावरही याचा मोठा परिणाम दिसून येईल. सिंगापूरमधील अनेक ट्रॅव्हल कंपन्यांनी या भागांमध्ये जाणारे टूर पॅकेजेस तात्पुरते स्थगित केले आहेत. तर आधीच आरक्षण केलेल्या प्रवाशांना पूर्ण पैसे परत केले जात आहेत किंवा पर्यायी प्रवास योजना सुचवली जात आहे. नागरिकांनी नवीन बुकिंग करणेही थांबवले आहे, कारण अनेक जण आता सुरक्षेच्या मुद्द्यांमुळे लोकांच्या योजना बदलत आहेत.
पाकिस्तानच्या ‘या’ मुख्य शहरात भारतीय लष्कराने केला हल्ला; इथे आहे दहशतवादी संघटनांचे हेडकॉर्टर
नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?
MFA ने नागरिकांना सल्ला दिला आहे की, जे नागरिक सध्या या संवेदनशील भागांमध्ये आहेत, त्यांनी अधिक सावधगिरी बाळगावी, निदर्शनांपासून दूर राहावे, आपत्कालीन संपर्क क्रमांक स्वतःकडे ठेवावेत आणि MFA च्या अधिकृत वेबसाइटसह स्थानिक दूतावासांकडून सातत्याने माहिती घेत राहावी. सिंगापूर सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि इतर देशांशी समन्वय साधत आहे. नागरिकांनी आपली सुरक्षा सर्वात आधी ठेवावी आणि गरज पडल्यास आपल्या प्रवास योजनांमध्ये बदल करावा.