(फोटो सौजन्य – iStock)
अनेकांना ट्रॅव्हलची फार आवड असते. कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढून आपण कुठे ना कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवतो. अलीकडे, आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा ट्रेंड वाढत चालला आहे. लोकांचा परदेशी फिरण्याचा कल सातत्याने वाढतच आहे. यातच थायलँड हे भारतीय पर्यटकांचे एक आवडीचे ठिकाण आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय थायलँडला भेट देतात आणि इथे आपल्या सुट्टीचा आनंद लुटतात. याच पार्शवभूमीवर आता थायलँडने भारतीयांना इथे न येण्याचे आवाहन केले आहे… मात्र असे का ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
पाकिस्तानच्या ‘या’ मुख्य शहरात भारतीय लष्कराने केला हल्ला; इथे आहे दहशतवादी संघटनांचे हेडकॉर्टर
काही आरोग्य सूचनांमुळे थायलँडमधील लोकांची आणि येथे येणाऱ्या पर्यटकांची चिंता वाढली आहे. तुम्हाला सांगतो की, ३० वर्षांत पहिल्यांदाच अँथ्रॅक्समुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, त्यानंतर आणखी अनेक प्रकरणांची सुनावणी सुरू आहे, त्यानंतर थायलंड सरकारने अलर्ट जारी केला आहे. टीओआयच्या वृत्तानुसार, दोन्ही घटना लाओस सीमेजवळील मुकदहान प्रांतात घडल्या. या प्रकरणांमध्ये संक्रमित गुरांच्या थेट संपर्कात आलेल्या लोकांचा समावेश होता. अँथ्रॅक्स हा एक प्रकारचा बॅक्टेरिया इन्फेक्शन आहे जो सहसा प्राण्यांमध्ये आढळून येतो मात्र आता तो मानवांसाठी देखील धोकादायक असू शकतो. त्याच्या लक्षणांमध्ये त्वचेवर घाव अथवा फोड येणे आणि सुजलेल्या लिम्फ नोड्सचा समावेश आहे. हा आजार सध्या थायलॅंडमध्ये वेगाने वाढतच चालला आहे ज्यामुळे तेथील सरकारने पर्यटकांना तेथे येण्यास मनाई केली आहे.
कच्चे मांस खाल्ल्याने या समस्या उद्भवू शकतात
या प्रकरणांपासून, थायलॅंडच्या आरोग्य संस्थांनी पाळत कडक केली आहे. कसाई आणि कच्चे मांस खाणाऱ्या लोकांना “धोकादायक गटात” सामील केले गेले आहे. यात सुमारे ६३८ लोकांची ओळख पटवण्यात आली आहे. त्या सर्वांवर लक्ष ठेवले जात आहे आणि त्यांना अँटीबायोटिक औषधे देखील दिली जात आहेत. प्रवाशांना, विशेषतः उत्तर-पूर्वेकडे राहणाऱ्या लोकांना, सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि त्यांना कच्चे किंवा कमी शिजवलेले मांस खाणे टाळण्यास सांगितले गेले आहे, कारण ते पारंपारिकपणे काही स्थानिक पदार्थांमध्ये फार आधीपासून खाल्ले जाते.
जाण्यापूर्वी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल
आरोग्यविषयक इशाऱ्यांव्यतिरिक्त, थायलँड आता सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणखी मजबूत करत आहे. १ मे २०२५ पासून, सर्व परदेशी प्रवाशांना देशात येण्यापूर्वी डिजिटल आगमन कार्ड (TDAC) भरणे आवश्यक असेल. पूर्वी उपलब्ध असलेला कागदी फॉर्म आता ऑनलाइन फॉर्मने बदलला जाईल जो थाई इमिग्रेशन ब्युरोच्या वेबसाइटवर भरता येईल. या नवीन नियमामुळे अधिकाऱ्यांना प्रवाशांची माहिती ट्रॅक करणे सोपे होईल. याव्यतिरिक्त, यामुळे देशात प्रवेश करण्याची प्रक्रिया देखील जलद आणि सोपी होईल.
या आहेत भारतातील 6 ऐतिहासिक गुफा ज्या आजही करतात भूतकाळाचे प्रतिनिधित्व; नक्की भेट द्या
प्रवासादरम्यान विशेष खबरदारी घ्या