Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील एक असे हिल स्टेशन जिथे परदेशांना जाण्यास आहे मनाई, इथे जायचं असेल तर या गोष्टी ध्यानात ठेवा

उत्तराखंडमधील चकराता हे निसर्गरम्य आणि शांत हिल स्टेशन असले तरी येथे एक असा नियम आहे, जो अनेकांना माहीत नसतो. या ठिकाणी परदेशी नागरिकांना थेट प्रवेश दिला जात नाही. चकराता का इतके संवेदनशील मानले जाते आणि येथे जाण्यापूर्व

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 14, 2026 | 08:53 AM
भारतातील एक हिल स्टेशन जिथे परदेशांना जाण्यास आहे मनाई, इथे जायचं असेल तर या गोष्टी ध्यानात ठेवा

भारतातील एक हिल स्टेशन जिथे परदेशांना जाण्यास आहे मनाई, इथे जायचं असेल तर या गोष्टी ध्यानात ठेवा

Follow Us
Close
Follow Us:
  • उत्तर प्रदेशमध्ये वसलेले हे हिल स्टेशन परदेशीयांचे स्वागत करत नाही.
  • भारतीयांनाही इथे जाण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागते.
  • निसर्गसौंदर्याने नटलेल्या या ठिकाणाला कशी भेट द्यावी ते जाणून घ्या.
हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे. उत्तराखंडमधील निसर्गसौंदर्याने नटलेले आणि ऑफबीट हिल स्टेशन म्हणून ओळखले जाणारे चकराता येथे परदेशी नागरिकांना थेट प्रवेश दिला जात नाही. एखादा परदेशी पर्यटक चकरात्याकडे जाण्याचा प्रयत्न करत असल्यास, त्याला आधीच रस्त्यात अडवले जाऊ शकते.

भारतातील अनोखं रेल्वे स्टेशन जो रविवारी घेतो सुट्टी; ना हॉर्न, ना ट्रेन… जाणून घ्या नाव नसलेल्या या स्टेशनची कहाणी

चकरात्याकडे जाणाऱ्या मार्गांवर बॅरिकेड्स असतात, जिथे ओळखपत्रांची (ID) काटेकोर तपासणी केली जाते. कारण चकराता हे एक कॅन्टोनमेंट क्षेत्र आहे आणि येथे भारतीय लष्कराची मोठी उपस्थिती आहे. त्यामुळेच सुरक्षा कारणास्तव सरकारने परदेशी नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घातले आहेत. जर तुम्ही एखाद्या परदेशी मित्र किंवा जोडीदारासोबत चकरात्याचा प्लॅन करत असाल, तर ही माहिती आधीच जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. अन्यथा प्रवासात अडचणी येऊ शकतात.

चकरात्यामध्ये परदेशी नागरिकांना प्रवेश का नाही?

चकराता हे भारतातील अत्यंत संवेदनशील आणि सुरक्षित भागांपैकी एक मानले जाते. हा संपूर्ण परिसर कॅन्टोनमेंट झोनमध्ये येतो, त्यामुळे येथे ठिकठिकाणी भारतीय सैन्याचे जवान दिसतात. या भागात लष्कराच्या महत्त्वाच्या हालचाली सुरू असतात आणि गुप्तचर यंत्रणाही सक्रिय असते. याशिवाय चकराता हे उंच पर्वतीय भागात वसलेले असून भारत-चीन सीमेच्या तुलनेने जवळ आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर अतिशय महत्त्वाचा मानला जातो. याच कारणामुळे परदेशी नागरिकांना येथे येण्यासाठी गृह मंत्रालयाची विशेष परवानगी आवश्यक असते. परवानगीशिवाय प्रवेश दिला जात नाही.

चकरात्यामध्ये फिरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

चकरात्यामधील काही भागांत भारतीय नागरिकांनाही फोटो किंवा व्हिडीओ काढण्यास मनाई असते. अशा ठिकाणी स्पष्ट सूचना फलक लावलेले असतात. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास लष्करी अधिकारी संशय घेऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला थांबवले जाऊ शकते, चौकशी होऊ शकते आणि ओळखपत्र दाखवावे लागू शकते. त्यामुळे जिथे फोटो काढण्यास बंदी आहे, तिथे मोबाईल काढणे टाळा आणि नियमांचे पालन करा.

चकरात्याकडे जाताना रात्री ड्रायव्हिंग टाळा

चकरात्याकडे प्रवास करताना शक्यतो रात्री वाहन चालवू नये. हा संपूर्ण परिसर डोंगराळ असून रस्ते अरुंद आणि वळणावळणाचे आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर लाईट्स नसतात, त्यामुळे रात्री वाहन चालवणे धोकादायक ठरू शकते. अंधार पडण्यापूर्वीच हॉटेल किंवा रिसॉर्ट शोधून थांबणे अधिक सुरक्षित ठरते. चकरात्यामध्ये निवासाची ठिकाणे मर्यादित असल्याने, सुरक्षित जागा मिळाल्यास तिथेच मुक्काम करणे योग्य ठरते.

राष्ट्रपती भवन फिरण्याची इच्छा आहे? मग आजच नोट करा बुकिंगची संपूर्ण प्रोसेस

रात्री गाडी बिघडल्यास काय अडचणी येऊ शकतात?

जर रात्रीच्या वेळी गाडी बंद पडली किंवा टायर पंक्चर झाला, तर मदत मिळणे कठीण होऊ शकते. आसपास लांबपर्यंत डोंगर आणि जंगल असते, तसेच सुविधा सहज उपलब्ध नसतात. रात्री रस्त्यांवर वाहतूकही कमी असते, त्यामुळे मदतीची शक्यता कमी होते. याउलट दिवसा प्रवास केल्यास स्थानिक लोकांकडून मदत मिळणे सोपे जाते.

चकरात्याला कसे पोहोचाल?

चकरात्याला जाण्यासाठी रस्ता, रेल्वे आणि हवाई मार्ग उपलब्ध आहेत.

रस्त्याने : चकराता देहरादूनपासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर आहे. देहरादूनहून टॅक्सी किंवा बस सहज मिळते.

रेल्वेने : देहरादून हे जवळचे रेल्वे स्टेशन असून, देशातील अनेक मोठ्या शहरांमधून येथे गाड्या उपलब्ध आहेत.

हवाई मार्गाने : देहरादूनमधील जॉली ग्रांट विमानतळ सर्वात जवळ आहे. विमानतळावरून टॅक्सीने चकरात्याला जाता येते.

रस्ता डोंगराळ असल्याने प्रवासासाठी पुरेसा वेळ राखून ठेवा आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्या.

Web Title: Indian hill station where foreigners are not allowed travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • places to visit
  • travel news
  • travel tips
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

राष्ट्रपती भवन फिरण्याची इच्छा आहे? मग आजच नोट करा बुकिंगची संपूर्ण प्रोसेस
1

राष्ट्रपती भवन फिरण्याची इच्छा आहे? मग आजच नोट करा बुकिंगची संपूर्ण प्रोसेस

पुस्तकप्रेमींसाठी सुरू झाला आहे World Book Fair 2026; एंट्री आहे एकदम फ्री आणि अन्य डिटेल्स जाणून घ्या
2

पुस्तकप्रेमींसाठी सुरू झाला आहे World Book Fair 2026; एंट्री आहे एकदम फ्री आणि अन्य डिटेल्स जाणून घ्या

Winter Trekking Spots : कमी गर्दी, जास्त निसर्ग; हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ठिकाणे
3

Winter Trekking Spots : कमी गर्दी, जास्त निसर्ग; हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ठिकाणे

भारतातील अनोखं रेल्वे स्टेशन जो रविवारी घेतो सुट्टी; ना हॉर्न, ना ट्रेन… जाणून घ्या नाव नसलेल्या या स्टेशनची कहाणी
4

भारतातील अनोखं रेल्वे स्टेशन जो रविवारी घेतो सुट्टी; ना हॉर्न, ना ट्रेन… जाणून घ्या नाव नसलेल्या या स्टेशनची कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.