भारताची ऑटो रिक्षा जगात लोकप्रिय!
सर्वच महिला, मुली बाहेर फिरायला जाताना हॅन्डबॅग, शोल्डरबॅग किंवा इतर वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेल्या बॅग वापरतात. बॅगचा वापर प्रामुख्याने बाहेर फिरायला जाताना त्यात सामान किंवा इतर महत्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी केला जातो. सोशल मीडियावर बॅगचे अनेक नवनवीन पार्टन, डिझाईन सगळ्यांचं पाहायला मिळत आहेत. मुलींसह मुलं देखील कामानिमित्त बाहेर जाताना शोल्डर बॅगचा वापर करतात. फ्रेंच लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनने त्यांच्या पुरुषांच्या स्प्रिंग समर 2026 कलेक्शनमध्ये एक अनोखी बॅग लाँच केली आहे, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.तयार करण्यात आलेली ही बॅग सामान्य नसून ती भारतीय ऑटो रिक्षाच्या आकारात आहे. या बॅगचे फोटो आणि व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावरील लोक हैराण झाले आणि त्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
कॉटनची साडी नेसताना फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, इतरांपेक्षा नेहमीच दिसाल सुंदर आणि आकर्षक
प्रसिद्ध संगीत कलाकार आणि डिझायनर फॅरेल विल्यम्स यांनी भारतीय ऑटो रिक्षाच्या आकारात बॅग तयार केली आहे. बॅग तयार करताना त्यांनी भारतातील रस्ते, त्यांची संस्कृती आणि स्थानिक कारागिरी यातून प्रेरणा घेतली आहे. ही ऑटो रिक्षा बॅग लुई व्हिटॉनच्या क्लासिक मोनोग्राम कॅनव्हासमध्ये बनवली आहे, ज्यामध्ये लहान चाके आणि उंटाच्या रंगाचे चामड्याचे हँडल देखील लावण्यात आले आहेत, जे त्याला आणखी वास्तविक स्वरूप देतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ऑटो रिक्षाच्या आकारातील बॅग भारतीय रिक्षासारखी तयार करण्यात आली आहे.
भारतीय ऑटो रिक्षाची प्रेरणा घेऊन तयार करण्यात आली बॅग सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आले. शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. फॅरेल विल्यम्स यांच्या नेतृत्वाखालील या कलेक्शनमध्ये भारताला केंद्रस्थानी ठेवण्यात आले. हा शोकेस भारतीय संस्कृतीला आदरांजली होती ज्यामध्ये देशातील स्वदेशी कारागिरीने प्रेरित डिझाइन्सचा समावेश होता. फ्रेंच लक्झरी फॅशन हाऊस ऑटोरिक्षासारख्या आकाराच्या त्याच्या अनोख्या हँडबॅगसाठी प्रसिद्धी मिळवत आहे. हे भारतीय स्ट्रीट संस्कृती आणि लक्झरी यांचे एक मिश्रण आहे.
साडी- ड्रेसवर शोभून दिसतील ‘या’ डिझाईनचे सुंदर पारंपरिक कानातले, चारचौघांमध्ये दिसाल आकर्षक
लुई व्हिटॉन ब्रॅंडने याआधी विमाने, डॉल्फिन आणि अगदी लॉबस्टरच्या आकारात सुद्धा बॅग तयार केल्या आहेत. तयार करण्यात आलेली ऑटोरिक्षा हँडबॅग भारतीय रस्त्यावरील संस्कृतीला एक खेळकर आवाज देत वेगळी दिसते. ही मजेदार निर्मिती ब्रँडकडून अशा किंमतीसह आणली जाण्याची अपेक्षा आहे की ज्यामुळे भावूक होऊन जाईल, परंतु त्याचे खरे मूल्य केवळ त्याच्या ब्रँड नावातच नाही तर त्याच्या संकल्पनेत आणि कारागिरीत देखील आहे. तयार करण्यात आलेल्या बॅगची किंमत जवळपास 35 लाख असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.