सर्वच महिला सणावाराच्या दिवसांमध्ये साडी नेसण्यास प्राधान्य देतात. सिल्क साडी, कॉटन साडी, माहेश्वरी साडी, पैठणी साडी इत्यादी अनेक वेगवेगळ्या फॅब्रिकच्या साड्या बाजारात उपलब्ध आहेत. साडी मात्र बऱ्याचदा कॉटनची साडी नेसताना साडीचा गोळा होऊन साडी अंगावर व्यवस्थित बसत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कॉटनची साडी अंगावर व्यवस्थित चापून चोपून बसण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून साडी नेसल्यास चारचौघांमध्ये तुम्ही अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसाल. (फोटो सौजन्य – pinterest)
कॉटनची साडी नेसताना फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
ऑफिसला किंवा कामानिमित्त इतर वेळी बाहेर जाताना कॉटनची साडी नेसल्यास अतिशय हलकाया आणि अंगावर उठून दिसेल असा रंग निवडावा. यामुळे तुम्हाला जास्त फॉर्मल, प्रोफेशनल लूक मिळतो.
कलमकारी वर्क किंवा साधी डिझाईन असलेली कॉटनची साडी नेसल्यास त्यावर ऑक्सिडाईज दागिने घालावे. ऑक्सिडाईज दागिने कॉटनच्या साडीवर खूप उठावदार आणि सिंपल लुक देतो.
कॉटनची साडी तुम्ही कोणत्याही सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा कार्यक्रमात नेसू शकता. त्यामुळे साडीला शोभून दिसतील असे साधे दागिने निवडावे.
कॉटनच्या साडीवर नेमकी कशी हेअर स्टाईल करावी बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही पारंपरिक पद्धतीची किंवा मोकळ्या केसांची हेअर स्टाईल करू शकता.
कॉटनच्या साडीवर ब्लाऊज निवडताना नेहमीच सिव्हलेस किंवा बोटनेक असेलला ब्लाऊज निवडावा. यामुळे तुम्हाला लुक इतरांपेक्षा जास्त उठावदार दिसतो.