मराठमोळा लुक करण्यासाठी सणावाराच्या दिवसांमध्ये महिला साडी किंवा ड्रेस घालतात. साडी नेसल्यानंतर लुक अधिकच खुलून आणि उठावदार दिसण्यासाठी साडीला मॅचिंग होतील, असे सुंदर सुंदर कानातले घातले जातात. कानातल्यांशिवाय साडी किंवा ड्रेसवरील लुक पूर्णच होत नाही. कोणतीही नऊवारी साडी, सहावारी साडी, पंजाबी ड्रेस घातल्यानंतर त्यावर सुंदर सुंदर दागिने घातले जातात. आज आम्ही तुम्हाला साडीवर लुक अधिकच खुलून दिसण्यासाठी काही सुंदर कानातल्यांच्या डिझाईन सांगणार आहोत. या डिझाईनचे कानातले तुमच्या लुकची शोभा वाढवतील. (फोटो सौजन्य – pinterest)
साडी- ड्रेसवर शोभून दिसतील 'या' डिझाईनचे सुंदर पारंपरिक कानातले
सोनं चांदी म्हणजे महिलांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय. सर्वच महिलांना सोन्याचे दागिने परिधान करायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे ट्रेडीशन ड्रेस घातला असेल तर तुम्ही टॉप्स कानातले घालू शकता.
लहान लहान खडे असलेले सुंदर कानातले साडीवर सुंदर दिसतात. लहान लटकन असलेले कानातले कोणत्याही लुकवर सुंदर दिसतात.
सर्वच महिलांना झुमके घालायला खूप जास्त आवडतात. सोन्याचे झुमके साडीवर सुंदर दिसतात. मोठ्या आकाराचे झुमके आणि त्यावर मोराची डिझाईन उठावदार दिसते.
हल्ली सोशल मीडियावर ट्रेंडिग असलेले कानातले म्हणजे इअरकफ. पैठणी साडी किंवा नऊवारी साडी नेसल्यानंतर त्यावर तुम्ही सुंदर सुंदर डिझाईन्सचे इअरकफ घालू शकता.
काहींना मोठे कानातले घालायला खूप जास्त आवडतात. गळ्यातील हारासोबत असलेले कानातले साडीवर सुंदर दिसतात. यामुळे तुमचा लुक पूर्ण होईल.