
उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरी रोजच्या जेवणात असतात हे पदार्थ
अंबानी कुटुंबीय घरातील शेफला देतात एवढा पगार?
अंबानी कुटुंबियांच्या घरात नेहमीच ४००० चपात्या का बनवल्या जातात?
अंबानी कुटुंबियांच्या जेवणातील मेन्यू?
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी संपूर्ण आशिया खंडातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्यांचे नावाची कीर्ती जगभरातील सर्वच देशांमध्ये पसरली आहे. मुकेश अंबानींचे घर अँटिलिया जगातील सर्वात महागड्या आणि आलिशान घरांपैकी एक आहे.अंबानी कुटुंब केवळ फॅशनसाठीच नाहीतर त्याच्या घरातील छोट्या मोठ्या पार्टी आणि त्यांच्या घरातील जेवणातील खास पदार्थांसाठी सुद्धा ओळखले जातात. अंबानी कुटुंबातील सर्वच खवय्ये आहे. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती शाहाकारी आहे. त्यामुळे जेवणात कायमच पौष्टिक, गरम आणि स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. घरात बनवल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थाची खूप जास्त काळजी घेतली जाते. आज आम्ही तुम्हाला उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरी रोजच्या जेवणात कोणते पदार्थ बनवले जातात? घरातील शेफला दर महिना किती पगार दिला जातो? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – pinterest)
अंबानी कुटुंबातील प्रत्येकालाच खूप साधे पदार्थ खायला आवडतात. मुकेश आणि नीता अंबानीसह संपूर्ण कुटुंब कडक शाकाहारी आहे. त्यामुळे घरात सात्विक आणि पौष्टिक अन्नपदार्थ बनवले जातात. सकाळी उठल्यानंतर मुकेश अंबानी पपईचा रस पितात आणि इडली सांबर नाश्त्यात खाल्ले जाते. तसेच नीता अंबानी ज्यूस आणि फळे, सुकामेवा इत्यादी पदार्थ खातात. दुपारच्या जेवणात शिजवलेली डाळ, भात, भाज्या, रोटी, सूप आणि सॅलड खाल्ले जाते. त्यांच्याकडे गुजराती पद्धतीने डाळ बनवली जाते. अंबानी कुटुंबीय रात्रीच्या जेवणात पचनास हलके आणि पौष्टिक पदार्थ खातात. त्यामध्ये नाचणी किंवा बाजरीची भाकरी, गुजराती शैलीतील भाजीपाला आणि सॅलडचा समावेश असतो.
नीता अंबानी त्यांच्या फिटनेसकडे खूप जास्त लक्ष देतात. फिट आणि कायमच हेल्दी राहण्यासाठी महिन्यातून एकदा अंबानी कुटुंब जंक फूडचे सेवन करते. आठवड्यातून एकदा त्यांच्या घरात शेवपुरी हा पदार्थ बनवला जातो. मुकेश अंबानींना शेवपुरी खायला खूप जास्त आवडते. तसेच आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे अंबानींनीच्या घरी तब्बल 4000 चपात्या रोज बनवल्या जातात. या चपात्या अंबानी हाऊसमध्ये काम करणाऱ्या सुमारे 600 कर्मचाऱ्यांसाठी बनवल्या जातात. यामध्ये त्यांच्या घरातील सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर, स्वयंपाकी, तंत्रज्ञ आणि वैयक्तिक सहाय्यक इत्यादी अनेकांचा समावेश आहे. सगळ्यांचं आहारात पौष्टिक पदार्थ खाण्यास दिले जातात.
मुकेश अंबानी यांच्या घरात चपाती बनवण्यासाठी मशीन बनवण्यात आली आहे. ही मशीन काही मिनिटांमध्ये शेकडो चपात्या बनवू शकते. पण चपातीचा दर्जा आणि चव व्यवस्थित टिकवून ठेवण्यासाठी कुशल शेफला नियुक्त करण्यात आले आहे. या शेफचा पगार लाखोंच्या घरात आहे. चपाती बनवणाऱ्या शेफला अंबानी कुटुंबीय २ लाख एवढा पगार दरमहिन्याला देतात. कारण शेफ केवळ चपत्याचं नाहीतर त्याचा आकार, कठोर परिश्रम आणि चव एकसारखी ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतात.