Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणी चवीचा पारंपरिक पदार्थ! कच्च्या कोवळ्या फसणापासून बनवा झणझणीत पूस भाजी, नोट करून घ्या रेसिपी

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर कोकणातील प्रत्येक घरात कच्च्या कोवळ्या फसणाची भाजी बनवली जाते. ही भाजी चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया पूस भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 09, 2026 | 10:16 AM
कोकणी चवीचा पारंपरिक पदार्थ! कच्च्या कोवळ्या फसणापासून बनवा झणझणीत पूस भाजी

कोकणी चवीचा पारंपरिक पदार्थ! कच्च्या कोवळ्या फसणापासून बनवा झणझणीत पूस भाजी

Follow Us
Follow Us:

कोकणात विविध भाज्या आणि फळांचा वापर करून अनेक चविष्ट पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ केवळ चवीसाठीच नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा पौष्टिक आहे. कोकणातील खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी जगभरातील लाखो पर्यटक सुट्टीच्या दिवसांमध्ये कोकणात दाखल होतात. पदार्थांची पारंपरिक चव मनाला शांतता देते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कच्च्या कोवळ्या फणसापासून पूस भाजी बनवली जाते. गरमागरम भाकरीसोबत फणसाची भाजी अतिशय चविष्ट लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये फणसाची पूस भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.ओलं खोबर, विविध मसाल्यांचा वापर करून बनवलेली भाजी चवीला अतिशय सुंदर लागते. पण बऱ्याचदा कोवळा फणस कापताना हातांना चीक लागतो. त्यामुळे भाजी बनवण्याचा अनेक लोक कंटाळा करतात. त्यामुळे फणस कापताना योग्य पद्धतीचा वापर करावा. यामुळे फणसाचा चीक हातांना लागणार नाही आणि भाजीची चव सुद्धा सुंदर लागेल. चला तर जाणून घेऊया पूस भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Recipe : नाश्ता होईल आणखी मजेदार, घरी बनवा कॅफे स्टाईल ‘वॉफल’, लहानच काय तर मोठेही होतील खुश

साहित्य:

  • कच्चा कोवळा फणस
  • तेलकूट
  • तेल
  • चवीनुसार मीठ
  • हळद
  • लाल तिखट
  • हिंग
  • कढीपत्त्याची पाने
  • लसूण
दिवसाची सुरुवात करा आणखीनच मजेदार! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पिझ्झा टोस्ट सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • कोवळ्या फणसाची पूस भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, फणस कापण्याआधी हातांना आणि सुरीला तेल लावून घ्यावे. यामुळे चीक लागणार नाही.
  • फणसाचे बारीक बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर कुकरच्या भांड्यात फसणाचे तुकडे, चवीनुसार मीठ आणि २ ग्लास पाणी घालून कुकरच्या ४ ते ५ शिट्ट्या काढा.
  • त्यानंतर फणस शिजल्यावर थंड करून घ्या. थंड झाल्यानंतर फणसाच्या तुकड्यांची साल काढून फणस खलबत्याच्या सहाय्याने बारीक करा.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात कढीपत्याची पाने, बारीक केलेला लसूण आणि हिंग घालून भाजा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा घालून चवीनुसार मीठ टाका. कांदा शिजल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, तेलकूट घालून मिक्स करा.
  • मसाले भाजल्यानंतर त्यात बारीक केलेली फणसाची भाजी घालून व्यवस्थित मिक्स करा आणि मंद आचेवर ठेवून द्या.
  • भाजी शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घालून मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली फसणाची पूस भाजी.

Web Title: How to make jackfruit bhaji at home simple food recipe kokan special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
3

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर
4

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.