
महागड्या क्रीम लावण्याऐवजी स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा करा त्वचेसाठी वापर, चेहऱ्यावर येईल तेजस्वी ग्लो
सर्वच महिलांना आपली त्वचा कायमच सुंदर आणि चमकदार हवी असते. त्वचेच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी कायमच वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा आणि महागड्या गोष्टींचा वापर केला जातो. पण सतत वापरले जाणारे केमिकल युक्त स्किन प्रॉडक्ट कालांतराने त्वचेचे नुकसान करतात. धूळ, माती, प्रदूषण इत्यादींमुळे त्वचेवर घाण जमा होते. चेहऱ्यावर जमा झालेली धूळ माती योग्य वेळी स्वच्छ न केल्यास चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स किंवा मुरूम येण्याची जास्त शक्यता असते. त्वचेसंबंधित समस्या वाढण्यामागे केवळ स्किन केअर प्रॉडक्टच नाहीतर आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, पोषक घटकांचा अभाव, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी कारणामुळे सुद्धा चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात. वारंवार चेहऱ्यावरील एकाच भागात पिंपल्स येत असतील तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.(फोटो सौजन्य – istock)
व्हायरल चारकोल मास्क तुमच्या त्वचेसाठी घातक? तज्ज्ञांंचा इशारा
त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी महिला कायमच महागड्या क्रीम, फेसवॉश किंवा इतर वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर करतात. पण सतत केमिकल युक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचा निस्तेज होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. स्वयंपाक घरातील पदार्थ त्वचेवर नैसर्गिक ग्लो आणतात आणि त्वचा कायमच चमकदार ठेवण्यासाठी मदत करतात.
चेहऱ्यावर जमा झालेली घाण आणि धूळ माती स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही केमिकलयुक्त फेशवॉशचा वापर करण्याऐवजी दह्याचा वापर करावा. दही वापरून त्वचा स्वच्छ करावी. थोडस दही संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करून नंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्यावी. यामुळे चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या, टॅनिंग आणि त्वचेच्या सर्वच समस्यांपासून सुटका मिळेल. दही केवळ आरोग्यासाठीच नाहीतर संपूर्ण त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. दही शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. यामध्ये असलेले लॅक्टिक ऍसिड त्वचा एक्सफोलिएट करून चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन घालवण्यासाठी मदत करते. त्यामुळे दह्याचा वापर चेहरा स्वच्छ करण्यासाठी करावा.
चेहऱ्यावर वाढलेला कोरडेपणा घालवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा. खोबरेल तेलात असलेले गुणकारी घटक त्वचा आतून हायड्रेट ठेवते. त्यामुळे रात्री झोपण्याआधी खोबरेल तेल हातांवर घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावा. त्यानंतर हलक्या मसाज करून झाल्यानंतर शांत झोप लागेल. खोबरेल तेलाचा वापर त्वचा आणि केसांसाठी केला जातो. खोबरेल तेलाचा वापर केल्यामुळे त्वचा आतून हायड्रेट राहते.