
रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा 'हे' आयुर्वेदिक सीरम,
धावपळीची जीवनशैली, मानसिक तणाव, आहारात सतत होणारे बदल, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टीमुळे चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स, बारीक मुरूम, डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर बऱ्याचदा महिला दुर्लक्ष करतात. पण सतत दुर्लक्ष केल्यामुळे त्वचेच्या समस्या आणखीनच वाढतात आणि चेहरा पूर्णपणे खराब होऊन जातो. सुंदर दिसण्यासाठी महिला कायमच बाजरात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्ट आणि स्किन ट्रीटमेंट करून घेतात. पण सतत केलेल्या स्किन ट्रीटमेंट कालांतराने त्वचा खराब करून टाकतात. यामुळे चेहऱ्यावर उतार वयात सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी सतत मेकअप केला जातो.(फोटो सौजन्य – istock)
वारंवार मेकअप केल्यामुळे चेहऱ्यावरील डाग दिसेनासे होतात पण त्वचा खराब होऊन जाते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच महागडे फाऊंडेशन किंवा कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स इत्यादी अनेक गोष्टी वापरल्या जातात. पण कोणतेही स्किन केअर प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती सीरम वापरून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक फेस सीरम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. घरगुती उपाय त्वचेवर नैसर्गिक चमक वाढवतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर फेस सीरम लावावे. यासाठी ग्लिसरीन, गुलाबपाणी, कोरफड जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल या गोष्टींची आवश्यकता आहे. सीरम तयार करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये गुलाबजल, कोरफडीचा गर आणि विटामिन ई कॅप्सूल मिक्स करा. तयार केलेले सीरम व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काचेच्या डब्यात भरून ठेवा. तयार केलेले सीरम रात्री झोपण्याआधी सीरम लावून संपूर्ण चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे डोळ्यांभोवती आलेले काळे डाग, पिंपल्सचे डाग, बारीक बारीक मुरूम आणि फोड कमी होतील. हे उपाय करण्यासोबतच नियमित भरपूर पाणी, ताज्या फळांचा रस, पौष्टिक आहार इत्यादी अनेक गोष्टींचे सेवन केल्यास शरीर आणि त्वचेला भरमसाट फायदे होतील.
त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कायमच महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. कोरफड जेल त्वचा खूप जास्त हायड्रेट ठेवते आणि चेहरा फ्रेश राहतो. विटामिन ई कँप्सूलमध्ये असलेले घटक त्वचेवर चमकदार ग्लो आणतात. त्यामुळे रात्री झोपण्याआधी नियमित फेस सीरम लावावे.