
चेहऱ्यावर वाढलेले पिगमेंटेशन होईल कायमचे गायब! स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा वापर करून घरीच बनवा फेस क्रीम
धावपळीची जीवनशैली, मानसिक तणाव, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. रात्री जास्त वेळ जागरण केल्यामुळे डोळ्यांभोवती काळे डाग वाढतात. डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग त्वचेचे सौंदर्य पूर्णपणे खराब करून टाकतात. तरुण वयात त्वचेसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर लागतात. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट , महागडे स्किन केअर प्रॉडक्ट, स्किन ग्लोइंग इंजेक्शन इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण सतत कोणत्याही केमिकल युक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. यामुळे काही काळापुरती त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसते.(फोटो सौजन्य – istock)
वय वाढल्यानंतर त्वचेसाभेदित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. चेहऱ्यावर आलेले काळे डाग किंवा पिगमेंटेशन घालवण्यासाठी महिला खूप जास्त मेकअप करतात. सतत मेकअप केल्यामुळे चेहऱ्यावर बारीक बारीक सुरकुत्या दिसू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी घरातील पदार्थांचा वापर करून फेस क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
त्वचेची काळजी घेण्यासाठी कायमच केमिकल युक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरी बनवलेल्या फेस क्रीमचा वापर करावा. यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा खूप जास्त उजळदार दिसते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. फेस क्रीम बनवण्यासाठी ज्येष्ठमध, अनंतमूळ, शतावरी, अश्वगंधा, मंजिष्ठा, विटामिन ई २ कॅप्सूल, कोरफडीचा गर १ चमचा, गुलाब पाणी इत्यादी साहित्य फेस क्रीमसाठी लागेल.
फेस क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये ज्येष्ठमध, अनंतमूळ, शतावरी, अश्वगंधा, मंजिष्ठा एकत्र करून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात विटामिन ई कँप्सूल, कोरफड जेल आणि गुलाब पाणी मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काहीवेळ बाजूला ठेवा. त्यानंतर काहीवेळाने तयार केलेले क्रीम रात्री झोपण्याआधी संपूर्ण चेहऱ्यावर लावून रात्रभर तसेच ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा. ही क्रीम नियमित चेहऱ्यावर लावल्यास त्वचा खूप जास्त सुंदर आणि तेजस्वी होईल. चेहऱ्यावर आलेले पिगमेंटशन आणि डाग घालवण्यासाठी घरी तयार केलेली क्रीम खूप प्रभावी ठरेल.
त्वचेला डिटॉक्सिफाय करण्यासाठी आणि आतून त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ सीरम, क्रीमचा वापर न करता भरपूर पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे. पाण्याच्या सेवनामुळे शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि आतड्या स्वच्छ होतात. याशिवाय दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम त्वचेवर दिसून येतो. त्यामुळे नियमित ताज्या भाज्या आणि भरपूर फळांचे सेवन करावे. फळे खाल्ल्यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होते.