फेसवॉश त्वचेवर कसा वापरावा?
सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. बदलत्या ऋतूनुसार त्वचेमध्ये सुद्धा अनेक बदल होऊ लागतात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा अतिशय कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. कोरड्या त्वचेवर कितीही काही लावलं तरीसुद्धा त्वचा कोरडीच दिसते. त्यामुळे प्रत्येक ऋतूंनुसार स्किन केअर प्रॉडक्टमध्ये बदल करणे आवश्यक आहे. त्वचेसंबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक महिला दिवसभरातून ५ ते ६ वेळा चेहरा स्वच्छ करतात. मात्र सतत त्वचा धुतल्यामुळे त्वचेमध्ये असलेला ओलावा आणि नैसर्गिक तेल निघून जाते. त्यामुळे त्वचा सतत फेसवॉशने धुवू नये. फेसवॉशने त्वचा स्वच्छ केल्यास चेहऱ्यावर बसलेली घाण आणि धूळ स्वच्छ होते. मात्र सतत त्वचा धुवू नये.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
बाजारातून अनेकदा संत्री, लिंबू इत्यादी फळे आणली जातात. आरोग्याच्या दृष्टीने ही फाले अतिशय प्रभावी आहेत. लिंबू आणि संत्र्यांमध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे दैनंदिन आहारात तुम्ही संत्र्याचे सेवन करू शकता. शिवाय लिंबाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. त्वचा हायड्रेट आणि चमकदार राहते. संत्री घरी आणल्यानंतर संत्री खाऊन संत्र्याची साल फेकून दिली जाते. पण असे न करता तुम्ही संत्र्याच्या सालीपासून फेसवॉश बनवू शकता. चला तर जाणून घेऊया फेसवॉश बनवण्याची सोपी कृती.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
संत्री आणि लिंबाच्या सालीपासून तयार केलेला फेसवॉश तुम्ही फेसमास्कप्रमाणे त्वचेवर लावू शकता. लावून झाल्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील घाण, धूळ आणि माती स्वच्छ होईल. लिंबाची किंवा संत्र्याची साल फेकून न देता तुम्ही या प्रकारे सालींचा वापर करून फेसवॉश बनवू शकता.संत्रींमध्ये असलेले विटामिन सी त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे. यामुळे चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स, मुरूम इत्यादी समस्या कमी होण्यास मदत होते. घरी तयार केलेला फेसवॉश तुम्ही दिवसातून दोनदा किंवा तीनदा लावू शकता.