जेष्ठमधाचा वापर कसा करावा
सर्वच महिलांना सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. पण वयाच्या चाळिशीनंतर महिलांच्या त्वचेवर वांग, काळे डाग, सुरकुत्या, बारीक रेषा इत्यादी समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. या समस्या उद्भवू लगल्यानंतर त्वचा निस्तेज आणि रुक्ष होऊन जाते. महिलांच्या त्वचेवर वांग आल्यानंतर गालावर काळे डाग दिसण्यास सुरुवात होते. सुरुवातीच्या दिवसांमध्ये हे डाग कमी दिसतात, मात्र कालांतराने यात वाढ झाल्यानंतर चेहऱ्यावर आलेले डाग आणखीनच गडद होत जातात. त्यामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर योग्य वेळी लक्ष देऊन उपचार करावे. धावपळीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अपुरी झोप, पिग्मेंटेशन, टॅनिंग इत्यादी सामान्य समस्या असून या समस्या वाढू लागल्यानंतर त्वचा पूर्णपणे खराब होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेले पिग्मेंटेशन आणि वांग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय नक्की करून पहा.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
त्वचेवर पिग्मेंटेशन आल्यानंतर त्वचेचा रंग काळा आणि गडद होत जातो. ज्यामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसू लागते. मेलानिनच्या असंतुलनामुळे त्वचेचा रंग बदलण्यास सुरुवात होते.

जेष्ठमधाचा वापर कसा करावा
ज्येष्ठमध पावडर
मध
गुलाब पाणी
वांग घालवण्यासाठी सर्वप्रथम वाटीमध्ये जेष्ठमध पावडर घेऊन त्यात मध आणि गुलाब पाणी मिक्स करावे. यात सर्व साहित्य सम प्रमाणात घालावे. तयार केलेले मिश्रण संपूर्ण त्वचेवर व्यवस्थित लावून झाल्यानंतर २० मिनिटं ठेवून नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करावी. हा उपाय केल्यामुळे त्वचेवरील डाग निघून जाण्यास मदत होईल.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केमिकल उपाय करण्याऐवजी घरगुती उपाय करावे. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार होते. पण घरगुती उपाय करताना त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी. त्वचेला सूट न होणाऱ्या पदार्थांचा वापर करू नये. शिवाय कोणताही उपाय करताना सगळ्यात आधी पॅच टेस्ट करून पाहावी. यामुळे कोणता पदार्थ त्वचेला सूट होतो आणि नाही हे समजून येईल.






