महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी २० रुपयांचा 'हा' पदार्थ नक्की वापरा
सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची गुणवत्ताअतिशय खराब होऊन जाते. सतत उन्हात बाहेर फिरल्यामुळे त्वचा काळवंडणे किंवा त्वचेवर पिंपल्स येऊ लागतात. चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. अशावेळी महिला त्वचा सुंदर करण्यासाठी बाजरात उपलब्ध असलेल्या हानिकारक स्किन केअर प्रॉडक्ट किंवा क्रीमचा वापर करतात. मात्र कोणत्याही चुकीच्या प्रॉडक्टचा वापर केल्यास त्वचेची गुणवत्ता आणखीनच खराब होण्याची शक्यता असते. क्रीमचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात पण त्वचा अतिशय निस्तेज होते.(फोटो सौजन्य – iStock)
‘या’ कारणामुळे वाढत्या वयात महिलांच्या त्वचेवर पिगमेंटेशन! डाग घालवण्यासाठी करून पहा घरगुती उपाय
मागील अनेक वर्षांपासून त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी बेसनचा वापर केला जात आहे. बेसन त्वचेसाठी उत्तम मानले जाते. यामुळे चेहऱ्यावर आलेले डाग, मुरूम आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते. अनेक महिला त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवू लागल्यास बेसनाचा वापर करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला २० रुपयांच्या बेसनाचा कशा पद्धतीने वापर करावा? यामुळे त्वचेला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे त्वचा अधिक मऊ आणि चमकदार होईल.
त्वचेसंबंधित कोणतीही समस्या उद्भवू लागल्यानंतर बेसन लावण्याचा सल्ला सगळ्यात आधी दिला जातो. कारण यामुळे त्वचा स्वच्छ होते. बेसन नॅचरल क्लींजर म्हणून ओळखले जाते. बेसनाचा फेसपॅक त्वचेवर लावल्यास त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होईल आणि त्वचा अधिक सुंदर चमकदार दिसेल. त्वचा कायम फ्रेश ठेवण्यासाठी बेसनचा वापर करावा. बेसनातील अँटीऑक्सि़डेंट्स त्वचेतील टॉक्सिन्स नष्ट करून टाकतात. यामुळे त्वचेचे पोर्स टाईट होतात. मधामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा मुलायम आणि हाइयड्रेट होते. त्वचेवर वाढलेले इन्फेक्शन घालवण्यासाठी मधाचा वापर करावा.
सर्वप्रथम, वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात मध मिक्स करा. त्यानंतर त्यात गुलाबपाणी किंवा कच्चे दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर जाडसर पेस्ट तयार होईल. या मिश्रणात कोणताही पदार्थ जास्त टाकू नये. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवा. यामुळे त्वचा अधिक मुलायम आणि सुंदर होण्यास मदत होईल. १० मिनिटं ठेवल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय केल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
सिगारेट न पिता काळे झालेले ओठ सुधारण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा ट्राय, ओठ होतील गुलाबी
बेसनाचा वापर जेवणातील अनेक पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा अधिक सुंदर आणि मुलायम होते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी बेसन मधाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी मध अतिशय फायदेशीर आहे. मध त्वचा उजळदार करते. त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बेसन फेसपॅक प्रभावी आहे.