Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

International Yoga Day: 10 सेकंदाचे भ्रामरी प्राणायम करून होतील मोठे आजार छुमंतर, मेडिटेशन कोचने दिला सल्ला

जर मन अस्वस्थ असून ताणतणाव असेल, तर भ्रामरी प्राणायामाने तुम्ही काही सेकंदात आराम मिळवू शकता. न्यूरोसायन्स संशोधन असेही मानते की हा प्राणायाम तुम्हाला कोणत्याही वयात पुढील स्तरावर घेऊन जातो.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 16, 2025 | 10:49 AM
भ्रामरी प्राणायमचे फायदे नक्की काय आहेत (फोटो सौजन्य - iStock)

भ्रामरी प्राणायमचे फायदे नक्की काय आहेत (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

दिवसभराच्या धावपळीमुळे, कामाच्या ताणामुळे तुम्हाला डोकेदुखी, तणाव, निद्रानाश आणि अस्वस्थता येत आहे का? जर तुमचे उत्तर हो असेल तर भ्रामरी प्राणायाम तुमच्यासाठी जादूसारखे काम करू शकते. भ्रामरी प्राणायम हे फक्त १० सेकंदात ताण कमी करते, मनाला आराम देते आणि मूड ताजातवाना करते. यामध्ये, तुम्हाला ध्यानासाठी तासनतास बसावे लागत नाही किंवा तुम्हाला कोणत्याही वेगळ्या ठिकाणी जावे लागत नाही. 

मानसिक आरोग्यासाठी प्राणायाम हा असा व्यायाम आहे जो तुम्ही कुठेही आणि कधीही करू शकता. इंस्टाग्रामच्या लोकप्रिय आरोग्य पेज Growin Within वर, लाइफ कोच विकास नागरु यांनी सार्थक रेवाला यांच्यासोबत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी ते सर्वांसाठी फायदेशीर असल्याचे या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. भ्रामरी प्राणायाम म्हणजे काय, ते करण्याची सोपी पद्धत आणि त्याचे फायदे नक्की काय आहेत जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock) 

भ्रामरी प्राणायम म्हणजे काय?

भ्रामरी हा शब्द ‘भ्रमर’ या शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ भुंगा असा आहे. जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा भुंग्यासारखा आवाज निर्माण होतो. एक संगीतासारखा आवाज जो आतून संपूर्ण मनाला आराम देतो. हा आवाज थेट तुमच्या मज्जासंस्थेवर कार्य करतो आणि त्वरीत विश्रांतीची भावना देतो. इंस्टाग्रामवरील पॉडकास्टमध्ये विकास नागरू म्हणाले, ‘न्यूरोलॉजिकल सायन्सच्या संशोधनानुसार, भ्रामरी प्राणायाम कोणत्याही वयात तुमचे मन समतोल करू शकतो. हा सराव मेंदूच्या त्या भागाला शांत करण्यास मदत करतो जो ताण, चिंता आणि राग नियंत्रित करतो.’

International Yoga Day 2025: मेंदूचा सारा ताण बाहेर फेकतील 5 योगासनं, जाणून घ्या फायदे

भ्रामरी प्राणायाम कसा करायचा

भ्रामरी प्राणायम करण्याच्या स्टेप्स

  • सर्वप्रथम जमिनीवर आरामात बसा आणि बसताना खाली योगा मॅट घ्या 
  • डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या
  • आता दोन्ही कान तुमच्या अंगठ्याने बंद करा आणि तुमचे डोळे आणि चेहरा तुमच्या उर्वरित बोटांनी झाका
  • आता श्वास सोडताना ‘हम्मम्म्…’ असा आवाज करा, जणू काही भुंग्याचाचा आवाज येत आहे असा आवाज तुम्हाला काढायचा आहे 
  • हे किमान ५-७ वेळा करा. यामुळे तुमचे मन शांत होईल आणि तुम्हाला शांती मिळेल, तुमच्या मनातील ताण आणि चिंता काढून टाकण्यास मदत मिळेल

भ्रामरी प्राणायामचे फायदे

  • मनाला तात्काळ आराम देते. सर्व चिंता, नैराश्य आणि ताण काढून टाकण्यास मदत मिळते 
  • भ्रामरी प्राणायममुळे झोप सुधारते आणि त्यामुळे शरीरालाही आराम मिळतो
  • रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो 
  • चिंता आणि पॅनिक अटॅकपासून त्वरित आराम मिळतो
  • मानसिक लक्ष केंद्रित करणे आणि स्मरणशक्ती वाढविण्यासाठी भ्रामरी प्राणायमचा उपयोग करून घेऊ शकता 
  • मुले, वृद्ध आणि काम करणाऱ्या लोकांसह सर्वांसाठी फायदेशीर असून विज्ञानदेखील त्याच्या परिणामावर विश्वास ठेवते

काय सांगतो रिसर्च 

रिसर्चमध्ये काय सांगतो अभ्यास

न्यूरोलॉजिकल रिसर्चमध्ये असे म्हटले आहे की जेव्हा तुम्ही ‘भ्रामरी’ चा प्रतिध्वनी आवाज काढता तेव्हा मेंदूचा अमिग्डाला सक्रिय होतो, ज्यामुळे ताण कमी होतो आणि मूड सुधारतो. म्हणूनच अनेक आरोग्य तज्ञ प्रत्येकाला दररोज ५ मिनिटे ते करण्याचा सल्ला देतात. भ्रामरी प्राणायाम कधी आणि किती वेळा करावा असा जर तुम्हाला प्रश्न असेल तर जाणून घ्या – 

  • सकाळी उठताच किंवा रात्री झोपण्यापूर्वी
  • दररोज ५ ते १० सेट्स करणे उत्तम 
  • ऑफिसमध्ये कामाच्या दरम्यानदेखील तुम्ही भ्रामरी प्राणायम करू शकता

योगा से होगा! ब्लड प्रेशरचा त्रास आहे? तर करा योगसाधना

भ्रामरी प्राणायामाद्वारे तुम्ही या गोष्टी करू शकता

जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी केले तर भ्रामरी प्राणायाम अधिक प्रभावी ठरू शकतो. यासाठी शांत जागा निवडण्याचा प्रयत्न करा, काही मिनिटे मोबाईल सायलेंट करा आणि फक्त तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. या प्राणायामासोबत, तुम्ही आणखी काही छोटे बदल करू शकता जसे की- दिवसातून एकदा कोमट पाणी प्या, जे शरीराला डिटॉक्स करते, सकाळी किंवा संध्याकाळी ५ मिनिटे मोकळ्या हवेत चालणे, मोबाईल डिटॉक्स करणे, दररोज काही मिनिटे फोनपासून दूर राहणे आणि रात्री झोपण्यापूर्वी २ मिनिटे ध्यान करण्याची सवय लावा. या छोट्या छोट्या गोष्टी तुमची मानसिक शांती एका महासत्तेसारखी मजबूत करतील. कारण भ्रामरी हा फक्त योग नाही तर मन आणि जीवनाचे ट्युनिंग आहे.

कोचने काय सांगितले

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: International yoga day bhramari pranayama benefits to get rid of stress how to do step by step information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 10:29 AM

Topics:  

  • Health Tips
  • world yoga day

संबंधित बातम्या

Baba Ramdev ने सांगितला रक्त वाढविण्याचा देशी जुगाड, बुलेट स्पीडने 7 दिवसात 7 पासून 14 पर्यंत जाईल Hemoglobin
1

Baba Ramdev ने सांगितला रक्त वाढविण्याचा देशी जुगाड, बुलेट स्पीडने 7 दिवसात 7 पासून 14 पर्यंत जाईल Hemoglobin

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठतेमुळे शौच होतेय कडक, ‘या’ भुशाचा करा वापर, पोटातील चिकटलेली घाण त्वरीत येईल बाहेर
2

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठतेमुळे शौच होतेय कडक, ‘या’ भुशाचा करा वापर, पोटातील चिकटलेली घाण त्वरीत येईल बाहेर

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा
3

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP
4

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.