मनाचा ताण कमी करण्यासाठी कोणते योगा करावे (फोटो सौजन्य - iStock)
आपण अनेकदा मन अशांत असेल तर योगा करणे उत्तम मानतो. गेले अनेक वर्ष योगाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा कऱण्यात येतो. योगाला शांत आणि ध्यानस्थ मानले जाते. पण योगा म्हणजे त्याहूनही जास्त असल्याचे सांगण्यात येते. काही योगासने आहेत जी केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाहीत तर मनाला अधिक शांत आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी उद्युक्त करतात. ही जादू नाही तर हे शरीर आणि मनाचे विज्ञान आहे.
जेव्हा योग योग्यरित्या आणि नियमितपणे केला जातो तेव्हा ते चयापचय वाढवते, ताण कमी करते आणि मनाला चांगल्या स्थितीत आणते. जे वजन कमी करण्यासाठी आणि लक्ष वाढवण्यासाठी आवश्यक आहे. पण या कार्यासाठी कोणती आसनं अधिक फायदेशीर आहेत ते आपण या लेखातून जाणून घेऊया. आपण 5 योग आसनांबद्दल जाणून घेणार आहोत जे एकाच वेळी शरीरातील चरबी कमी करण्यास आणि मनाला तीक्ष्ण करण्यास मदत करतात. योग अभ्यासक द्रिती कनोजियाने याबाबत अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock)
उत्कटासन (Chair Pose)
नियमित उत्कटासन करावे
हे आसन दिसायला सोपे वाटेल, पण ते करणे कठीण आहे. खुर्चीशिवाय बसण्यासारखे हे आसन मांड्या, पाय आणि कंबरेचे मोठे स्नायू सक्रिय करते. त्यामुळे शरीर जास्त कॅलरीज बर्न करते. या आसनात संतुलन राखणे आणि श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मनदेखील एकाग्र होते. म्हणजेच, शरीरासोबतच मनालाही त्याचा फायदा होतो.
योगा से सब कुछ होगा! शरीराचे आणि खिशाचे, दोघांचे आरोग्य राहील उत्तम… Yoga मध्ये घडवा करिअर
अर्धमत्स्येंद्रासन (Ardha Matsyendrasana)
अर्ध मत्स्येंद्रनासन ठरेल उपयोगी
या आसनाची खास गोष्ट म्हणजे यात पोट ट्विस्ट करावे लागते. हे आसन पचनसंस्था सक्रिय करते आणि पोटाच्या अवयवांना हलकेच मालिश करते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. कंबर वळवताना, ध्यान आणि श्वासोच्छवासाचे समन्वय साधावा लागतो. यामुळे मानसिक शांती आणि विचारांमध्ये स्पष्टता येते. शरीर आणि मन दोन्हीवर जमा होणारा भार म्हणजेच दबाव कमी होण्यास मदत मिळते.
बकासन (Bakasana)
बकासन करणे सोपे
बकासनात तुम्हाला तुमच्या हातांवर संतुलन राखावे लागते. यामुळे तुमच्या हातांचे आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात. पण त्याचा खरा फायदा मानसिक शांती मिळवणे आहे. हे आसन करताना, तुम्हाला भीतीवर मात करावी लागेल आणि बाह्य विचलितता टाळावी लागेल. संपूर्ण लक्ष संतुलनावर केंद्रित या आसनात होते, ज्यामुळे मेंदूची शक्ती वाढते. यासोबतच, कोर स्नायूंनादेखील अधिक प्रशिक्षण मिळते, जे वजन कमी करण्यास आणि पोश्चर सुधारण्यास मदत करते.
नियमित योगा करताना चुकूनही करू नका ‘या’ चुका, संपूर्ण शरीरावर दिसून येतील गंभीर परिणाम
नौकासन (Naukasana)
नौकासनाने मिळवा मनःशांती
यामध्ये पोटाचे खोल स्नायू जसे की पेल्विक फ्लोअर आणि लोअर अॅब्स वापरात येतात. जे सामान्य व्यायामात अनेकदा वगळले जातात. संतुलन आणि खोल श्वासोच्छवासासह, हे आसन विश्रांती आणि पचन मोड सक्रिय करते. जे पचन आणि ताण कमी करण्यास मदत करते. म्हणजेच, पोट स्थिर राहते आणि मनदेखील शांत राहते.
त्राटक (Trataka)
हे केवळ शरीराची आसन करण्याची पद्धत नाही तर ध्यान करण्याची एक पद्धत आहे. यामध्ये, डोळे मिचकावल्याशिवाय एकाच बिंदूकडे (जळत्या मेणबत्तीप्रमाणे) पाहिले जाते. यामुळे एकाग्रता वाढते, चिंता कमी होते आणि मन स्थिर होते. योगानंतर त्राटक केल्याने शरीर आणि मन यांच्यात खोल संबंध निर्माण होतो. यामुळे एकाग्रता आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतो. ही प्रत्येक निरोगी जीवनशैलीची गरज आहे.
टीपः आपल्या योगा प्रशिक्षकाशी सल्लामसलत करूनच याचा उपोयग करावा. मनःशांती मिळवायची असेल तर या योगासनाचा तुम्ही वापर करून घेऊ शकता