
IRCTC Tour Package helicopter services booking fot chardham kedarnath yatra 2025
गढवाल हिमालयाच्या आश्चर्यकारक टेकड्यांमध्ये उत्तराखंडमधील रुद्रपयाग जिल्ह्यातील केदार मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार समुद्रसपाटीपासून 11 हजार 968 फूट उंचीवर असलेले हे मंदिर 2 मे 2025 पासून खुले होईल. हे मंदिर हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हे मंदिर चारधाम यात्रेचा एक भाग आहे. दरवर्षी लाखो भिवाक दर्शनासाछी केदारनाथला येतात. हे मंदिर वर्षातून फक्त सहा-सात महिन्यांसाठी खुले करण्यात येते.
सहसा एप्रिल-मे-ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत मंदिर खुले असते. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक केदारनाथचे मंदिर आहे. जर तुम्ही केदारनाथला कुटुंबासोबत, मित्रांसोबत आपल्या लाईफ पार्टनरसोबत दर्शनासाठी जाण्याचा विचार बऱ्याच काळापासून विचार करत असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. इंडियन रेल्वे कॅटरिं अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने एक पॅकेज तुमच्यासाठी आणले आहे. तुम्ही हवाई मार्गे केदारनाथला प्रवास करु शकता.
IRCTC च्या हे पॅकेज हवाई मार्गे असणार आहे. याची बुकिंग सेवा 8 एप्रिल 2025 पासून सुरु होत आहे. यासाठी तुम्ही IRCTC च्या अधिकृत हेलीयात्रा बेवसाईटवर (heliyatra.irctc.co.in ) वर भेट देऊ शकता. 2 मे ते 31 मे दरम्यानच्या प्रवासासाठी IRCTC ची ही सेवा उपल्बध राहिल.
दक्षिण मध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवायचा आहेत, मग ‘हे’ आहेत काही ठिकाण
यंदा हेलिकॉप्टरच्या भाड्यात 5% टक्क्याने वाढ झाली हे. अधिकृत माहितीनुसार प्रत्येक प्रवाशचे भाडे दर पुढील प्रमाणे असणार आहेत.
सिरसी ते केदारनाथचे भाडे 6 हजार 61 रुपये (दोन्ही मार्गे) असणार आहे., तर फाटा ते केदारनाथ 6 हजार 63 रुपये आणि गुप्तकाशी ते केदारनाथ 8 हजार 533 रुपये असणार आहे.
अधिकृत माहितीनुसार केदारनाथला जाणारी पहिली फ्लाइट फाटा येथून सकाळी 6:50 ला निघते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केदारनाथला 7 वाजता पोहोचते. परतीसाठी शेवटची फ्लाइट केदानाथमधून दुपारी 12:40 वाजता सुटते आणि 10 मिनिटांत हेलिकॉप्टरने फाटा पर्यंत अंतर पार करते. हवामानामुळे वेळेत बदल होण्याची शक्यता आहे.
हेलिकॉप्टर बुकिंग करण्याआधी केदारनाथ यात्रेसाठी काही महत्वपूर्ण नोदीं आव्शयक आहेत. यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण असे तर बुकिंग शक्य होई. यासाठी अधिकृत वेबसाईटवरुन registrationandtouristcare.uk.gov.in आधार कार्डच्या साहाय्याने तुम्ही बुकिंग करु शकता.
भारतातील “हे” ३ हिल्स स्टेशन देतात स्वर्गात असल्याचा अनुभव, काश्मीर पेक्षाही सुंदर