Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारंवार ‘IUI Failure’ होत आहे; नेमके कारण काय? जाणून घ्या पुढील उपचारपद्धती

आई होणे ही खरंतर प्रत्येक स्त्री साठी एक वेगळी आनंदाची बाब आहे. मात्र नैसर्गिक प्रक्रियेने आई होता येत नसेल आणि सध्या IUI देखील अपयशी ठरत असेल तर त्याची काय कारणे आहेत ते आपण जाणून घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 19, 2025 | 04:51 PM
IUI उपाय नक्की काय आहेत आणि का अपयश येतंय (फोटो सौजन्य - iStock)

IUI उपाय नक्की काय आहेत आणि का अपयश येतंय (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

आई होणे जगातील सर्वात आनंददायी बाब. परंतु प्रिया (नाव बदलले आहे) या मातृत्वसुखापासून वंचित होती. ३१ वर्षांची प्रिया आठ वर्षांपासून गर्भधारणेसाठी प्रयत्‍न करीत होती. विविध उपचार केल्यानंतर मेडिकल हिस्‍ट्रीनुसार तिला लॅपरोस्कोपिक ओव्हेरियन ड्रिलिंग, मायोमेक्टोमी, सहा ओव्हुलेशन इंडक्शन सायकल आणि तीन अयशस्वी आययूआय यांचा सामना करावा लागला होता. अनेक अपचार आणि प्रक्रियांनंतर तिला शारीरिक त्रास होण्‍यासोबत ती मानसिकरीत्या खचून गेली होती. समाजाचा सामना करणे तिला कठीण झाले होते. प्रजनन उपचार घेत असलेली अनेक जोडपी अयशस्‍वी ठरूनही वारंवार आययूआय सायकल सुरू राहते. कारण यातून किमान मातृत्वाची एक आशा कायम असते. पण असे का घडते असा प्रश्न आपल्याला पडतो आणि हेच कारण आपण या लेखातून पाहूया (फोटो सौजन्य – iStock) 

या चक्राचे प्रमाण किती असावे?

वैद्यकीयदृष्‍ट्या तीन अयशस्‍वी आययूआय प्रयत्‍नांनंतर संपूर्ण पूनर्मूल्‍यांकनाची आवश्‍यकता असते. यानंतर प्रयत्‍न सुरू ठेवल्‍यास अधिक गुणकारी उपचार पर्यायांना विलंब होऊ शकतो. महिलेला पीसीओएस असेल तर वाढलेली एलएच पातळी ओव्हुलेशन बिघडू शकते किंवा अंडी खराब दर्जाची असणे हे कारण असू शकते. पुरुष जोडीदारामध्ये अनुकूल वीर्याची कमतरता गर्भधारणेवर परिणाम करू शकते. वेळेवर न केलेल्या प्रक्रिया, कमी लॅबोरेटरी क्वालिटी किंवा फायब्रॉइड्ससारखे अपरिचित अंतर्निहित गर्भाशयाची पॅथेलॉजी ही काही इतर कारणे असू शकतात.

IVF प्रक्रियेला घाबरुन जाऊ नका, तज्ज्ञांचा सल्ला

पुढील उपचार काय?

कसा करावा उपाय

वारंवार आययूआय अपेक्षित परिणाम देत नसतील तर सखोल मूल्यांकन अतिशय महत्त्वाचे आहे. गर्भाशयाच्या लिनिंगचे मूल्यांकन करण्यासाठी आणि एंडोमेट्रिटिस किंवा क्षयरोगाची शक्यता दूर करण्‍यासाठी ट्रान्सव्हॅजिनल सोनोग्राफी आणि डायग्नोस्टिक हिस्टेरोस्कोपी करणे गरजेचे आहे. गर्भाशयाच्या राखीव जागेची तपासणी करण्यासाठी एएमएच चाचणी. डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वीर्य विश्‍लेषण शुक्राणूंच्या गुणवत्तेसाठी डीएनए फ्रॅगमेंटेशन इंडेक्स (डीएफआय) तपासले पाहिजे. 

अनुवांशिक विसंगतीसाठी जोडप्याचे कॅरिओटाइपिंग

जर काही समस्या आढळल्या जसे अंडी खराब गुणवत्तेची किंवा जास्त डीएनए फ्रॅगमेंटेशन. जोडप्यासाठी वैयक्तिकृत प्रोटोकॉल आणि प्रगत शुक्राणू निवड तंत्रे (जसे मायक्रोफ्लुइडिक्स किंवा स्‍पर्म सॉर्टर) वापरून आयव्हीएफ मार्ग स्वीकारणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

Isha Ambani ने IVF प्रक्रियेबाबत केला खुलासा, पॅरेंटिंगबाबत मांडले मत

भावनिक, शारीरिकदृष्‍ट्या काय साह्यभूत ठरते?

नियमित प्रक्रियांऐवजी पुराव्यावर आधारित, धोरणात्मक काळजी घेण्‍याला प्राधान्‍य द्या. पारदर्शकता असलेले, व्यापक चाचणी देणारे आणि वैयक्तिक योजना विकसित करणारे क्लिनिक्‍स शोधा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक आरोग्‍य उत्तम राखण्‍याला प्राधान्य द्या, कारण आशेचा किरण त्रासदायक नाही तर सक्षम करणारा असला पाहिजे. 

प्रियाच्‍या केससंदर्भात त्यांनी आयव्हीएफ निवडला आणि हिस्टेरोस्कोपिक मायोमेक्टोमी व किमान उत्तेजना यांचा समावेश असलेल्‍या योग्‍य पूर्व-उपचार मिळाले. ज्‍यानंतर त्यांना पहिल्याच चक्रात गोड बातमी मिळाली. मनाने खचून जाण्‍यासह जेनेरिक उपचार प्रोटोकॉल्‍वर खर्च करण्‍यापेक्षा त्वरित हस्तक्षेप, वेळेवर वाढ आणि वैयक्तिक विचारांना प्राधान्य द्यावे.

Web Title: Iui failure is happening repeatedly what is the exact reason know the next treatment method

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 04:51 PM

Topics:  

  • Health Tips
  • pregnancy health
  • pregnancy tips

संबंधित बातम्या

संध्याकाळी 6.30-7 वाजताच सेलिब्रिटी करतात Dinner, लवकर जेवण्याचे अफलातून फायदे
1

संध्याकाळी 6.30-7 वाजताच सेलिब्रिटी करतात Dinner, लवकर जेवण्याचे अफलातून फायदे

रक्तदाब कमी करण्यासाठी सद्गुरुंनी सांगितले 5 सोपे घरगुती उपाय; यांचा अवलंब केल्यास आयुष्यात कधीही उद्भवणार नाही हार्ट अटॅकचा धोका
2

रक्तदाब कमी करण्यासाठी सद्गुरुंनी सांगितले 5 सोपे घरगुती उपाय; यांचा अवलंब केल्यास आयुष्यात कधीही उद्भवणार नाही हार्ट अटॅकचा धोका

Sperm Count: पुरुषांसाठी धोकादायक ठरतेय अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड, धाडकन कमी होतात शुक्राणू; अभ्यासात धक्कादायक खुलासा
3

Sperm Count: पुरुषांसाठी धोकादायक ठरतेय अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड, धाडकन कमी होतात शुक्राणू; अभ्यासात धक्कादायक खुलासा

खराब गट हेल्थमुळे येऊ शकतो Heart Attack, ‘या’ लक्षणांनी ओळखा बिघडलेल्या पचनचा धोका
4

खराब गट हेल्थमुळे येऊ शकतो Heart Attack, ‘या’ लक्षणांनी ओळखा बिघडलेल्या पचनचा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.