ईशा अंबानीने केले आयव्हीएफबाबत मत व्यक्त (फोटो सौजन्य - iStock)
ईशा अंबानीने तिचे आई-वडील मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्याप्रमाणेच उद्योग क्षेत्रामध्ये नाव कमावले आहे. तिच्या कौटुंबिक व्यवसायाला पुढे नेण्यात तिचे योगदान देत असून अधिकाधिक प्रगती करत आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, ईशाने आनंद पिरामलसोबत लग्न केले आहे आणि या जोडप्याला कृष्णा आणि आदिया जुळी मुले आहेत.
नुकत्याच एका मॅगझिनसाठी ईशाने कव्हर शूट केले आणि यावेळी आपल्या IVF प्रक्रियेबाबत ती मनमोकळेपणाने बोलली आहे. याबाबत बोलताना तिने आपल्या पॅरेंटिंग आणि आई होण्याच्या प्रवासाबाबत खुलासा केला आणि आपण कोणत्या दिव्यातून गेलो याबाबतही व्यक्ती झाली आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
काय म्हणाली ईशा
IVF बाबत ईशा झाली व्यक्त (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
IVF च्या माध्यमातून गर्भधारणा होण्याच्या तिच्या कठीण प्रवासाबद्दल ईशाने आपले मत व्यक्त केले. अलीकडेच, ‘वोग इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ईशा अंबानीने IVF द्वारे तिच्या जुळ्या मुलांना गर्भधारणेचा अनुभव सांगितला. ती म्हणाली की, “हा एक कठीण प्रवास होता. मला IVF द्वारे गर्भधारणा झाली हे सांगणे काही वेगळं नाही अत्यंत सामान्य आहे. या प्रक्रियेबद्दल कोणालाही लाजिरवाणे वाटू नये. ही शारीरिकदृष्ट्या एक कठीण प्रक्रिया असून जेव्हा तुम्ही त्यातून जात असाल तेव्हा तणावग्रस्त असता.”
IVF वर चर्चा करणे गरजेचे
ईशाने धैर्याने तिचा IVF प्रवास शेअर केला आहे आणि सांगितले की या विषयावर खुलेपणाने बोलले पाहिजे, त्याची चर्चा व्हायला हवी. त्यावर आपण जितकी जास्त चर्चा करू तितके लोकांपर्यंत याचे महत्त्व पोहचेल. “आज जगात आधुनिक तंत्रज्ञान आहे, तर त्याचा उपयोग मुलांना जन्म देण्यासाठी का करू नये? तुम्ही याबाबत उत्साही असलं पाहिजे, लाज वाटण्यासारखे यामध्ये काहीच नाही. तुम्हाला यासाठी एखादा हेल्पिंग ग्रुप सापडला अथवा दुसऱ्या महिलेने मदत केली तर त्यामध्ये वाईट काहीच नाही ही प्रक्रिया अधिक सोपी होते.”
आईपण केले व्यक्त
ईशाने मानले पती आनंदच्या पाठिंब्याचे आभार (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
या प्रवासात तिने पती आनंद पिरामल यांच्याकडून मिळालेल्या पाठिंब्याचादेखील उल्लेख केला आणि त्याचे आभार मानले. ती म्हणाली, “एका आईला खूप कष्ट सहन करावे लागतात कारण स्तनपानासारख्या काही गोष्टी फक्त तीच करू शकते, परंतु पालकत्वाच्या बाबतीत इतरही अनेक गोष्टी आहेत ज्या पती आणि पत्नी दोघांनीही केल्या पाहिजेत आणि त्या करायला हव्यात.
आनंद अतिशय प्रेमळ पिता असून मी त्याची खरंच आभारी. कारण, ते डायपर बदलतात आणि बाळांना खायलाही घालतात. ज्या रात्री मला उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबावं लागतं किंवा कामासाठी बाहेर जावं लागतं, तेव्हा तो मुलांजवळ राहील आणि आजूबाजूला राहील याची तो जबाबदारी घेतो जेणेकरून मला वाईट वाटू नये.”
तज्ज्ञांचे मत
आयव्हीएफ इतके अवघड वा गुंतागुंतीचे आहे का? असाही प्रश्न आहे. तर याबाबत डॉ. हेतल पारेख, सल्लागार प्रजनन विशेषज्ज्ञ आणि विभाग प्रमुख, IVF केंद्र, डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल, पवई यांनी सांगितले की, ‘टेस्ट ट्यूब बेबी उपचार ज्याला IVF म्हणून ओळखले जाते, वंध्यत्वाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती केल्यामुळे अतिशय चांगल्या यश दरासह एक सोपा आणि अधिक सुलभ उपचार बनला आहे. IVF फार वेदनादायक नाही.’