दादरमधील कबुतरखाना बंद केल्याने जैन समाजाकडून संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. या सगळ्यात आता जैन समाजानेही आता मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. जैन मुनींनी ‘शांतीदूत जनकल्याण’ पक्षाची घोषणा करत मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे. दादर येथे ‘कबूतर बचाओ’ धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. या धर्मसभेदरम्यान जैन मुनींनी पत्रकार परिषद घेऊन विविध सामाजिक आणि धार्मिक मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली.
आ बैल मुझे मार! पाकिस्तानचा सुपडा साफ होणार? ‘हा’ देश कोणत्याही क्षणी पाकड्यांवर डागणार क्षेपणास्त्र
पत्रकार परिषदेत बोलताना निलेश चंद्र मुनी म्हणाले की, “मी सरकारला कोणताही इशारा दिलेला नाही. सध्या कबुतरांचा विषय सुरु आहे. आम्ही महाराष्ट्रातील मराठी माणसांना विरोध करत नाही, राज्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. कुत्रा आणलं ते चाललं नाही, कबुतर आणणं चाललं नाही. मंगल प्रभात लोढा हे जैन समाजाचे नव्हे, तर मुंबई समाजाचे नेते आहेत. मला आता त्यांच्याबद्दल काही बोलायचे नाही. ते आपले कार्य करतील, मी माझं करीन.”
निलेशचंद्र मुनी म्हणाले, “कोण ती ताई, तिला मी ओळखत नाही. एकनाथ शिंदेंना एकच सांगतो. जे वेडे झालेत, त्यांना आधी आवरा, सांगतो, जे पागल झाले आहेत त्यांना आवरा. ठाण्यात आम्ही सपोर्ट केला आहे. जैन समाजाने आनंद दिघेंना मान दिला आहे. कबुतरांना विरोध करणाऱ्यांना नेत्यांना आवरा. तसेच, मी कोणत्याही पक्षाचा प्रचारक नाही, पण कबुतरखाने सुरु केल्याबद्दल मी मंगल प्रभात लोढा यांचे आभार मानतो.,”
‘ ज्या ताईंना हा वाद सुरू केला, त्या ताईंना म्हणाल्या की, आम्ही नागाला दूध पाजणं बंद केलं आहे. पण तू दूध पाजणं बंद केलं तो तुमचा प्रश्न आहे. पण आम्ही आमचा धर्म विसरू शकत तनाही. जैन समाज हा शांतताप्रिय आणि देशाच्या उन्नतीसाठी कार्य करणारा समाज आहे. आम्ही नेहमी सौहार्द आणि सद्भावनेचा संदेश देतो. शिवसेनेचे चिन्ह सिंह आहे, आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे तेच चिन्ह आजही दिसते,” असेही त्यांनी नमूद केले.
“आम्ही आज ‘शांतीदूत’ पक्षाची अधिकृत घोषणा करत आहोत. मारवाडी, गुजराती समाजाने एकत्र या बीएमसीमध्ये आमचे वाघ आम्ही उभे करू. येणार्या काळात कबुतर कोणाला बुडवते ते आपण पाहू. महाराष्ट्रात दिवंगत बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आम्ही मानतो; इतरांना आम्ही ओळखत नाही.”
तसेच, ‘शांतीदूत जणकल्याण पार्टी’बद्दल बोलताना ते म्हणाले की, हा पक्ष पशु-पक्ष्यांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी पुढे येईल. “दिवाळीपर्यंत अल्टीमेटम देण्यात आला आहे; त्यानंतर महाराष्ट्र सरकारला आम्ही निवेदन देणार आहोत.” असंही त्यांनी सांगितले.