MP Sanjay Raut expressed confidence of Shiv Sena victory in BMC elections 2025
Sanjay Raut On BMC Elections 2025 : मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. मुंबई महापालिकेवर वर्चस्व कायम राखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. ठाकरे गटाने मोर्चेबांधणी सुरु केली असून युतीसाठी देखील चर्चा सुरु आहे. आगामी मुंबई पालिकेसाठी ठाकरे बंधूंची युती होण्याची शक्यता आहे. यामध्ये बीएमसीमध्ये आमचाच महापौर बसणार आहे, असा ठाम विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. खासदार राऊत यांनी आरक्षणावरुन मुख्यमंत्र्यांचे गोडवे गायले आहे. ते म्हणाले की, आरक्षण विषय हा फार ताणू नये. मुख्यमंत्री यांनी तोडगा काढला आणि मनोज जरांगे पाटील यांनी तो स्विकराला. मागण्या करणाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या. महाराष्ट्र शांत आहे मुंबई शांत आहे समाजात शांतता आहे. उद्धव ठाकरे यांच्या वतीने सांगायचं आहे कीं सरकार आणि आंदोलक यांच्या समेट झाला असेल तर तो चुकीचा आहे असा म्हणत काड्या करू नये, असे देखील स्पष्ट मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी आगामी मुंबई महापालिका आणि राज ठाकरे यांच्यासोबतची युती याबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, या सगळ्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत मैत्री केली होती ती फक्त दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून. पण आता दोन भाऊ एकत्र येत आहेत तर त्यांची मैत्री पातळ झाली आहे. त्यांना दोन भावाना एकत्र येऊ द्यायचं नव्हतं. आता दोन भाऊ एकत्र आले. अमित शाह जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा शिंदे शेपटी सारखे त्यांच्या मागे फिरत होते, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
आमचाचं महापौर बीएमसीमध्ये बसणार
पुढे त्यांनी मुंबई पालिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा महापौर होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, “मुंबईत आल्यावर शिंदे यांना अमित शाह यांनी सगळ्यांना सांगितलं मुंबई महापलिकेचा महापौर भाजपचा व्हायला पाहिजे. तेव्हा शिंदे का नाही म्हणाले? महापौर शिवसेनचा बसणार मराठी बसणार? काय उखडायचं ते उखडा सत्ता ठाकरे बंदूचीच येणार आमचा भगवा बीएमसीवर फडकणार आणि आमचाचं महापौर बीएमसीमध्ये बसणार. हे मी शिंदेना सुद्धा सांगतो आणि त्या भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांना पण सांगतो,” अशा कडक शब्दांत खासदार राऊत यांनी महायुतीला मुंबई पालिकेबाबत आव्हान दिले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रा लुटला
अजित पवार यांनी बेकायदेशीर वाळू उपसा रोखणाऱ्या महिला अधिकाऱ्याला दम दिला असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याबाबत त्यांच्यावर संपूर्ण राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे. यावर खासदार राऊत यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, “मिस्टर अजित पवार कुठे गेली तुमची शिस्त? तुम्ही म्हणतात ना बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. मग तुमच्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यासाठी तुम्ही यंग आयपीएस अधिकाऱ्याला कारवाई करण्यापासून रोखायला सांगता. हे दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रा लुटला आहे आणि आता त्यांचे हस्तक उरला सुरला महाराष्ट्र लुटत आहेत. मुरूम उपसण्याचे बेकायदेशीर काम सुरू होत आणि त्यावर कारवाई करत असताना तुम्ही आयपीएस अधिकाऱ्याला सांगता कारवाई करू नका? अजित पवारांचा पक्ष आणि शिंदे यांचा पक्ष यांच्या सगळ्यांकडे डाकू, लुटेरे असे सगळे आहेत शेळके यांच्या वेळी सुद्धा मी असंच प्रकरण बाहेर काढलं होतं,” अशी गंभीर टीका खासदार राऊत यांनी केली आहे.