Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

५ वर्षांपासून कानात येणाऱ्या ‘हृदयाच्या ठोक्यांसारख्या’ आवाजापासून मुक्ती; जसलोक हॉस्पिटलमध्ये २५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार

Pulsatile Tinnitus Treatment in Jaslok Hospital: जळगावमधील २५ वर्षीय महिलेला पाच वर्षांहून अधिक काळ कानात हृदयाच्या ठोक्यांशी जुळणारा ‘व्हूशिंग’ आवाज येत होता, मात्र जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये करण्यात आलेल्या मिनिमली इनव्हेसिव्ह प्रक्रियेनंतर तिला पूर्ण आराम मिळाला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 11, 2026 | 06:35 PM
Pulsatile Tinnitus Treatment

Pulsatile Tinnitus Treatment

Follow Us
Follow Us:
  • कानात सतत ‘व्हूशिंग’ आवाज
  • ५ वर्षांचा त्रास काही मिनिटांत संपला
  • जसलोकमध्ये उपचाराने मिळाली सुटका

मुंबई : महाराष्ट्रातील जळगावमधील एका २५ वर्षीय महिलेला गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून कानात हृदयाच्या ठोक्यांशी जुळणारा “व्हूशिंग” असा आवाज येत होता. जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे झालेल्या मिनिमली इनव्हेसिव्ह प्रक्रियेनंतर तिला या त्रासापासून पूर्णपणे आराम मिळाला आहे. या महिला रुग्णाच्या केसमधून निदर्शनास येते की, रक्तवाहिन्यांशी संबंधित मूळ कारण ओळखून अनेक वर्षांच्या अनिश्चिततेनंतर पल्साटाईल टिनिटसच्या रुग्णांवर प्रभावी उपचार केले जाऊ शकतात.

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

या महिला रुग्णाला हृदयाच्या ठोक्यांशी जुळणारा सतत व्हूशिंग आवाज येत होता. वर्षानुवर्षे अनेक डॉक्टरांचा सल्ला घेऊनही आणि विविध चाचण्या व उपचार करूनही तिला कायमस्वरूपी आराम न मिळता हा त्रास सहन करावा लागत होता. अखेर तिने मुंबईत येऊन जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये उपचार घेण्याचा निर्णय घेतला. जसलोक हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. फाली पोन्चा, एंडोव्हस्कुलर न्यूरोसर्जन डॉ. सुधीर आंबेकर आणि हेमॅटोलॉजिस्ट डॉ. समीर शाह यांच्या टीमने रुग्णाची एमआरआय व एमआरव्ही तपासणी केली. यामध्ये मेंदूतील मुख्य रक्तवाहिनी अरुंद झाल्याचे (‘व्हेनस सायनस स्टेनोसिस’) निदान झाले, ज्यामुळे रक्ताचा प्रवाह विस्कळीत होऊन कानात लयीत “व्हूशिंग” आवाज येत होता.

उपचार म्हणून रुग्णावर ‘मिनिमली इनव्हेसिव्ह व्हेनस सायनस स्टेंटिंग’ प्रक्रिया करून रक्तवाहिनीचा मार्ग रुंद करण्यात आला. स्टेंट बसवताच ५ वर्षांपासून असलेला पल्साटाईल टिनिटसचा त्रास तात्काळ दूर झाला. “या आजाराचे अनेकदा चुकीचे निदान केले जाते किंवा मानसिक ताण समजून दुर्लक्ष केले जाते. मात्र, योग्य निदानानंतर मांडीतील शिरेद्वारे मेंदूत कॅथेटर नेऊन स्टेंट बसवण्याच्या ‘मिनिमली इनव्हेसिव्ह’ प्रक्रियेमुळे लक्षणे त्वरित दूर होतात. कमी चिरफाड असणाऱ्या या उपचारांमुळे रुग्णाला अवघ्या दोन दिवसांत डिस्चार्ज देण्यात आला,” असे जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे एंडोव्हस्कुलर न्यूरोसर्जन डॉ. सुधीर आंबेकर म्हणाले.

पल्साटाईल टिनिटस हा एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे, ज्यामध्ये रुग्णाला कानात हृदयाच्या ठोक्यांच्या लयीत “व्हूशिंग” किंवा ठोक्यांसारखा आवाज ऐकू येतो. जगभरात १४.४% प्रौढांना टिनिटसचा त्रास असला, तरी पल्साटाईल टिनिटसचे प्रमाण एकूण केसेसमध्ये १०% पेक्षा कमी आहे. ऑटॉलॉजीच्या एका अभ्यासानुसार, नव्या रुग्णांपैकी केवळ ०.०९% लोकांमध्येच याचे निदान होते; तसेच तीव्र केसेसची वेगळी व्याख्या नसल्याने याच्या तीव्रतेबाबत अजूनही स्पष्ट आकडेवारी उपलब्ध नाही.

“पल्साटाईल टिनिटसकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याचे सखोल मूल्यमापन होणे गरजेचे आहे. ही केस आठवण करून देते की, सतत राहणाऱ्या आणि स्पष्ट न झालेल्या लक्षणांचे काही वेळेस उपचारायोग्य कारण असू शकते. त्यामुळे ‘काहीही बिघाड नाही’ असे ऐकल्यानंतर रुग्णांनी आशा सोडता कामा नये,” असे जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. फाली पोन्चा म्हणाले.

“अनेक वर्षांच्या त्रासानंतर रुग्ण पूर्णपणे लक्षणमुक्त होणे अत्यंत समाधानकारक आहे. ही केस रुग्णाच्या जीवनमानावर गंभीर परिणाम करणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी विशेष तज्ज्ञता आणि प्रगत ‘मिनिमली इनव्हेसिव्ह’ तंत्रज्ञानाचे महत्त्व दर्शवते. रुग्णाची स्थिती कितीही गुंतागुंतीची किंवा दुर्मिळ असली, तरी त्यांना योग्य निदान आणि सर्वोत्तम उपचार देणे हेच आमचे ध्येय आहे” असे जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे सीईओ श्री. जितेंद्र हरियाण म्हणाले.

हे यशस्वी उपचार दाखवून देतात की कानात सतत येणाऱ्या आणि हृदयाच्या ठोक्यांशी जुळणाऱ्या आवाजाकडे दुर्लक्ष न करता त्याचे योग्य वैद्यकीय मूल्यमापन करणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक उपचारांनंतरही अस्पष्ट राहिलेल्या पल्साटाईल टिनिटसचे मूळ कारण शोधणे हेच रुग्णाला योग्य उपचार आणि या त्रासापासून पूर्ण मुक्ती मिळवून देण्याचे सर्वात महत्त्वाचे पाऊल ठरते.

Health Tips: जेवल्यानंतर छातीत जळजळ अ‍ॅसिडिटीचा त्रास? करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय; मिळेल आराम

Web Title: Jalgaon woman pulsatile tinnitus treatment jaslok hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • ear infection
  • Jaslok Hospital

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.