Oats-Palak Idli Recipe: नेहमीची इडली खाऊन कंटाळला असाल तर नाश्त्यासाठी ओट्स आणि पालकापासून बनवा मऊ, चविष्ट आणि पौष्टिक इडली, रेसिपी नोट करा.
Oats-Palak Idli Recipe
Follow Us:
Follow Us:
विस्तार
ओट्स आणि पालकाची हेल्दी इडली
नाश्त्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक पर्याय
अशी करा झटपट तयार
नाश्त्यामध्ये काहीतरी चविष्ट, हलके आणि आरोग्यदायी खायचे असेल तर इडली हा उत्तम पर्याय मानला जातो. परंतु, नेहमीची तांदूळ-उडदाची इडली करण्याऐवजी या डिश थोडा ट्विस्ट द्या. यामध्ये ओट्स आणि पालकाचा समावेश केला तर हा पदार्थ आणखी हेल्दी बनू शकतो. ओट्समध्ये फायबर असते, तर पालकामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि मिनरल्स आढळतात. त्यामुळे ओट्स-पालक इडली ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी परफेक्ट पर्याय ठरू शकते. याशिवाय ही रेसिपी, झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येते. चला तर, जाणून घेऊयात ओट्स-पालकची इडली रेसिपी.
सर्वप्रथम ओट्स मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर तयार करा. एका मोठ्या भांड्यात ओट्स पावडर, रवा, चिरलेला पालक किंवा पालकाची प्युरी आणि दही घाला. त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ मिसळा. आवश्यकतेनुसार पाणी घालून मध्यम घट्टअसे पीठ म्हणजेच बॅटर तयार करा. यानंतर थोडे तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि हिंग घालून फोडणी द्या. ही फोडणी इडलीच्या मिश्रणात मिसळा. पीठ काही मिनिटे झाकून ठेवल्यानंतर शेवटी इनो किंवा बेकिंग सोडा घालून हलक्या हाताने व्यवस्थित मिसळा. इडलीच्या साच्यांना थोडे तेल लावा आणि त्यात तयार केलेले मिश्रण भरा. यानंतर, इडलीच्या भांड्यात पाणी गरम करून साचे ठेवावेत. झाकण लावून इडल्या चांगले वाफेवर शिजू द्याव्यात. इडल्या चांगल्या फुलून मऊ झाल्या की त्या बाहेर काढा आणि नारळाची चटणी किंवा सांबारसोबत गरमागरम सर्व्ह करा.
या टिप्स लक्षात ठेवा
पालक ताजा वापरल्यास चव आणि रंग चांगला येतो.
पीठ खूप घट्ट ठेवू नका, नाहीतर इडली कडक होऊ शकते.
इनो किंवा सोडा घातल्यानंतर पीठ जास्त वेळ ठेवू नका.
इडल्या जास्त वेळ वाफवू नका
चव वाढवण्यासाठी थोडे आले किंवा कोथिंबीरही घालू शकता.