Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अचानक दोन भागांत विभागला जातो हा समुद्र, लोकांना जाण्यासाठी तयार करतो रस्ता; हैराण करते इथले दृष्य

Travel News : समुद्रकिनारा कुणाला आवडत नाही, इथे शांत आणि थंड वातावरणात वेळ खूप छान जातो. पण तुम्हाला माहिती आहे का? जगात असा एक अनोखा समुद्रकिनारा आहे जो काही वेळासाठी विभागून मधोमध सुंदर रस्ता तयार करतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 26, 2026 | 08:35 AM
अचानक दोन भागांत विभागला जातो हा समुद्र, जाण्यासाठी स्वत:च तयार करतो रस्ता; हैराण करते इथले दृष्य

अचानक दोन भागांत विभागला जातो हा समुद्र, जाण्यासाठी स्वत:च तयार करतो रस्ता; हैराण करते इथले दृष्य

Follow Us
Follow Us:
  • जिंदो आणि मोडो बेटांदरम्यान समुद्र ओसरल्यावर तात्पुरता चालण्याचा मार्ग तयार होतो.
  • हा मार्ग भरती-ओहोटीमुळे वर्षातून काही वेळाच दिसतो आणि काही तासांसाठीच खुला असतो.
  • या अनोख्या घटनेदरम्यान ‘जिंदो सी पार्टिंग फेस्टिव्हल’ साजरा केला जातो, ज्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.
समुद्रकिनारा नेहमीच मनाला वेगळीच शांतता देऊन जातो. सुट्टीचा वेळ कुठे घालवायचा असल्यास लोक अधिकतरवेळी समुद्रकिनाऱ्यांची निवड करतात. अशात आज आम्ही तुम्हाला जगातील एका अनोख्या समुद्रकिनाऱ्याची ओळख करुन देणार आहोत जो लोकांना पाण्यातून विहार करण्यासाठी स्वत:च विभाजित होतो. नैसर्गिकरित्या समुद्रात तयार झालेला हा मार्ग साहसाने भरलेला ठरतो आणि एक अद्भूत अनुभव देणारा ठरतो. बहुतेक लोकांना समुद्राच्या लाटांमध्ये पाय मोकळे करायला आणि समुद्रकिनाऱ्यावर विहार करयला आवडते पण विचार करा समुद्राच्या मधोमध चालत तुम्हाला जर जाण्याची संधी मिळाली तर तो अनुभव किती दुर्लभ ठरेल. हा अनोखा समुद्रकिनारा नक्की कुठे वसला आहे ते चला सविस्तर जाणून घेऊया.

Travel Tips : 30 ओलांडायच्या आत फिरून या ही सुंदर ठिकाणे, लाईफटाइम लक्षात राहील अनुभव

असं म्हणतात की, समुद्राची खोली कधीही मोजता येत नाही. पण पृथ्वीवर असे एक ठिकाण आहे जिथे लाटा ओसरल्यावर समुद्र दोन भागांमध्ये विभागला जातो आणि तिथे एक असा मार्ग तयार होतो जो पाहून असे वाटते जणू तिथे कधी पाण्याचे वास्तव नव्हतेच. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे ठिकाण भारतात नसून दक्षिण कोरियामध्ये वसले आहे. जर तुम्ही या ठिकाणाला भेट दिली तर इथे तुम्हाला नक्कीच एक वेगळा अनुभव घेता येईल. चला हे ठिकाण नक्की कुठे वसले आहे आणि दोन भागांमध्ये समुद्र कसा विभागला जातो यामागचं गूढ जाणून घ्या.

जिंदो ते मोडो बेट

दक्षिण कोरीयात अनोखे बेट आहे ज्याचे नाव आहे जिंदो बेट. हा बेट आपल्या रहस्यमय सागरी मार्गासाठी ओळखले जाते. याला चमत्कारी सागरी मार्ग म्हटले जाते. जिंदो आणि मोडो बेटांच्या दरम्यान तयार झालेला हा सागरी मार्ग लांब आणि रुंद आहे. हे एक असे अद्वतीय दृष्य आहे, जे कोणालाही चकित करु शकते, परंतु हा चमत्कार नसून एक नैसर्गिक घटना आहे.

समुद्रात तयार होणारा हा मार्ग बेटांमधील भरती-ओहोटीच्या प्रणालीमुळे तयार झालेला आहे. तुम्ही कदाचित याविषयी पुस्तकात वाचले असावे. याच समुद्राचे पाणी वर-खाली होत राहते. ही प्रकिया गुरुत्वाकर्षणामुळे घडत असते. भरती-ओहोटी म्हणजे एक अशी प्रक्रिया आहे ज्याच समुद्राचे पाणी वर येते म्हणजेच लाटा अधिक उंच होऊ लागतात. ओहोटीच्या वेळी पाणी खाली येते आणि याचवेळी पाणी मागे सरकू लागते. ही एक तात्पुरती प्रक्रिया असते, त्यामुळे समुद्रात तयार झालेला हा मार्ग कायमस्वरुपी नसून तो काही तासांसाठीच तयार होतो.

Travel Trend 2026 : महागडे स्पॉट सोडून आता स्वस्त ठिकाणांकडे अधिक वळू लागलेत पर्यटक, जाणून घ्या कारण

समुद्रात तयार होणारा हा मार्ग साधारणपणे वर्षातून दोनदा तयार होतो. हा मार्ग अंदाजे २.८ किलोमीटर लांब आणि ४० मीटर रुंद असल्याची माहिती आहे. लोक या मार्गावरुन चालत जाऊ शकतात. मात्र वेळेची जाणीव ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हा मार्ग फक्त एका तासासाठीच खुला असतो. कोरीयात जेव्हा हा समुद्र दोन भागांत विभागतो तेव्हा एक ‘जिंदो सी पार्टिंग फेस्टिव्हल’ देखील साजरा केला जातो. ही घटना अधिकतर वेळी एप्रिलच्या अखेरिस घडून येते. उत्सवादरम्यान लोकांची या ठिकाणी मोठी गर्दी जमते आणि शिंपले गोळा करणे, जिंदो अरिरांग (स्थानिक लोकगीते) आणि सांस्कृतिक कार्यक्रम सारखे विविध उपक्रम सादर केले जातात.

 

Web Title: Jindo sea parting south korea unique beach natural path travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • South korea
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Saudi Travel Advisory: येमेन सीमेवर ‘Level-4’ सुरक्षा अन् बंदी; सौदीतील अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नवे निर्बंध
1

Saudi Travel Advisory: येमेन सीमेवर ‘Level-4’ सुरक्षा अन् बंदी; सौदीतील अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नवे निर्बंध

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश
2

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide
3

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide

Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड
4

Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.