Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्दीपासून दूर करा गोकर्णाची सफर, मंदिर- बीच-शांतता… इथे घेता येईल सर्वांचाच आनंद

गर्दीपासून दूर शांत आणि सुंदर ठिकाणी फिरायचं असेल तर गोकर्ण हा एक परफेक्ट पर्याय आहे. कर्नाटकातील हे ठिकाण मंदिर, स्वच्छ बीच आणि रिलॅक्स वातावरणासाठी खूप प्रसिद्ध आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 03, 2026 | 08:49 AM
गर्दीपासून दूर करा गोकर्णाची सफर, मंदिर- बीच-शांतता... इथे घेता येईल सर्वांचाच आनंद

गर्दीपासून दूर करा गोकर्णाची सफर, मंदिर- बीच-शांतता... इथे घेता येईल सर्वांचाच आनंद

Follow Us
Follow Us:
  • गोकर्णात शांत आणि सुंदर समुद्रकिनारे पाहायला मिळतात.
  • येथे मंदिरासारखी पवित्र ठिकाणे आहेत, जिथे मनाला शांती मिळते.
  • सोलो ट्रिपसाठी गोकर्ण सुरक्षित, किफायतशीर आणि रिलॅक्स अनुभव देणारे ठिकाण आहे.
गर्दीपासून दूर कुठे फिरायला जायचा विचार करत असाल तर गोकर्ण तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. हे कर्नाटक राज्यातील एक पवित्र तीर्थस्थळ आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. रोजच्या तणावपूर्ण आयुष्यापासून दूर कुठे शांत वेळ घालवायचा असल्यास या ठिकाणाची निवड फायदेशीर ठरते. इथे पांढरेशुभ्र समुद्रकिनारे, कॅफे आणि मंदिरांना भेट देता येते. सूर्यास्तावेळी इथे तुम्हाला सुंदर फोटो देखील काढता येतील. येथे प्रवास करणे सुरक्षित, मैत्रीपूर्ण आणि किफायतशीर आहे. सोलो ट्रिपसाठी तर हे ठिकाण एक आयडीएल निवड आहे. गाईच्या कानासारखा आकार असल्यामुळे या ठिकाणाला गोकर्ण हे नाव पडले. चला इथे कोणकोणती ठिकाणे पाहण्यासारखी आहेत ते जाणून घेऊया.

देवाला दत्तक घेण्यासाठीची अनोखी ओढ! भगवंताचे आई-वडील होण्यासाठी इथे भक्त लावतात लाखोंची बोली

ओम बीच

ओम बीच हा गोकर्ण येथील एक प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. इथे शांत समुद्राचा आनंद घेता येतो. तसेच तुम्ही इथे बोटींगचीही मजा लुटु शकता. कड्यावरील कॅफेत आराम करत संध्याकाळी इथून सुंदर सूर्यास्ताचाही आनंद घेता येतो. नेहमीच्या ठिकाणांना भेट देण्याऐवजी या ठिकाणाची भेट तुम्हाला एक वेगळा आणि संस्मरणीय अनुभव देऊन जाईल. येथील झोपड्यांमध्ये चांगले जेवण, संगीत आणि गप्पागोष्टींची सोय असते.

हाफ मून बीच

ओम बीचपासून जवळच काही अंतरावर हाफ मून बीच वसले आहे. इथे पायी चालून लोक निवांत वेळ घालवतात. यासहच बोटींगचीही सुविधा इथे पुरवण्यात आली आहे. हे ठिकाण शांत, कमी गर्दीचे असल्यामुळे इथे चांगला वेळ घालवता येतो. झाडांनी वेढलेल्या या परिसरात वाचन, लेखन करणे किंवा स्वतःशी एकरूप होणे सोपे जाते.

पॅराडाईज बीच

नावाप्रमाणेच हे बीच दुर्गम आणि दिसायला फार सुंदर असे बीच आहे. इथे फक्त जंगल ट्रेक किंवा बोटीनेच पोहचता येते. येथील स्फटिकासारखे स्वच्छ पाणी आणि शांततामय वातावरण या ठिकाणाला आणखी खास बनवते. या ठिकाणी लोक पोहण्याचा आण कॅम्पिंगचा आनंद लुटु शकतात. तुम्हाला रोजच्या गजबटापासून दूर कुठे वेळ घालवायचा असल्यास हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम आहे.

कुडले बीच

आणखी एक सुंदर, शांत बीच. इथे कॅफे, योग केंद्रे आणि होमस्टे अशा अनेक सोईसुविधा पुरवण्यात आल्या आहेत ज्यामुळे इथे बरेच दिवस राहता येते. सकाळी नाश्ता करुन तुम्ही इथल्या सुंदर वातावरणात योगा करु शकता, दुपारी बीचवर वेळ घालवू शकता, आपले सुंदर फोटोज काढू शकता आणि रात्री इथल्या पारंपारिक चवदार पदार्थांवर ताव मारु शकता. इथे रात्री चांदण्यांच्या प्रकाशात वेळ काहीकाळ थांबल्यासारखे वाटते.

महाबळेश्वर मंदिर

गोकर्णाच्या मुख्य समुद्रकिनाऱ्याजवळ भगवान शिवाला समर्पित महाबळेश्वर मंदिर आहे. गोकर्णातील हे मंदिर पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. हे मंदिर फार जुने असून इथे शांत वातावरण केल्या जाणाऱ्या प्रार्थनेत दिव्य अनुभव घेता येतो. इथे जाऊन मनाला शांती आणि समाधान मिळते.

फ्लाइटमध्ये आता ‘सोफा कम्फर्ट’! नवीन सीट डिझाइनने प्रवास होणार अधिक आरामदायी

एकट्याने प्रवास करण्यासाठी टिप्स

गोकर्णा एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी सुरक्षित आहे, पण सावधगिरी बाळगणे आपली जबाबदारी आहे हे विसरु नका. कुडले किंवा ओम बीचजवळच्या चांगल्या हॉस्टेल किंवा होमस्टेमध्ये राहा. बहुतेक ठिकाणी पायी फिरणे सोपे आहे, पण जर तुम्हाला आजूबाजूचे समुद्रकिनारे फिरायचे असतील, तर स्कूटर भाड्याने घेणे जास्त सोयीचे ठरेल. डिजीटल पेमेंटच्या विश्वासात न राहता आपल्यासोबत थोडी कॅश देखील ठेवा कारण काही कॅफे आणि स्टॉल्सवर कार्ड स्वीकारले जात नाही.

Web Title: Karnataka gokarna trip guide peaceful beaches temple travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • Beach
  • Karnataka
  • places to visit
  • travel news

संबंधित बातम्या

भारताच्या या गावाला का म्हटलं जातं सायलंट व्हिलेज, कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल
1

भारताच्या या गावाला का म्हटलं जातं सायलंट व्हिलेज, कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल

Travel News : भारतीय रेल्वेचे शेवटचे स्टेशन… इथून काहीच पावलांवर सुरू होते दुसऱ्या देशाची वाट
2

Travel News : भारतीय रेल्वेचे शेवटचे स्टेशन… इथून काहीच पावलांवर सुरू होते दुसऱ्या देशाची वाट

Budget Travel : अंदमान-मनालीची मजा आता फक्त अर्ध्या खर्चात… हे 5 सिक्रेट स्पॉट आहेत फिरण्यासाठी परफेक्ट
3

Budget Travel : अंदमान-मनालीची मजा आता फक्त अर्ध्या खर्चात… हे 5 सिक्रेट स्पॉट आहेत फिरण्यासाठी परफेक्ट

Mumbai Trip : मुंबई दर्शन करायचंय? मग मायानगरीतील या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या
4

Mumbai Trip : मुंबई दर्शन करायचंय? मग मायानगरीतील या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.