Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या ७० मध्ये हाड राहतील कायम मजबूत! उठल्यानंतर नियमित ‘या’ काळ्या दाण्यांच्या पाण्याचे सेवन , कधीच भासणार नाही रक्ताची कमतरता

काळे मनुके खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी काळ्या मनुक्यांचे पाणी प्यायल्यास रक्ताची निर्माण झालेली कमतरता भरून निघेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 03, 2025 | 05:30 AM
उठल्यानंतर नियमित 'या' काळ्या दाण्यांच्या पाण्याचे सेवन

उठल्यानंतर नियमित 'या' काळ्या दाण्यांच्या पाण्याचे सेवन

Follow Us
Follow Us:

शरीरात रक्ताची पातळी योग्य असणे आवश्यक आहे. अन्यथा शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. सतत जंक फूडचे सेवन, कामाचा तणाव, पाण्याची कमतरता, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे आणि पोषक घटकांचे सेवन करावे. पण काहीवेळा आजारांमुळे किंवा मानसिक तणावामुळे शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. शरीरात्र रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे थकवा जाणवणे,अशक्तपणा, सतत चक्कर येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात निर्माण झालेली रक्ताची भरून काढण्यासाठी नियमित भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन करावे. (फोटो सौजन्य – iStock)

अंघोळीसाठी साबण वापरत असाल तर थांबा! ‘या’ घरगुती पदार्थांचा वापर करून शरीर करा स्वच्छ, दुर्गंधी होईल कायमची गायब

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं ड्रायफ्रूट खायला खूप आवडता . घरात गोडाचे पदार्थ बनवल्या नंतर त्यात ड्रायफ्रूट टाकले जातात. दैनंदिन आहारात नियमित काळे मनुके खायल्यामुळे शरीरातील रक्ताच्या पातळीमध्ये वाढ होते. दातांपासून ते अगदी हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी काळ्या मनुक्यांचे सेवन करावे. यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि अँटिऑक्सिडंट आढळून येतात. शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काळ्या मनुक्यांचे सेवन करावे.

मुळव्याधावर गुणकारी उपाय:

अनेकदा आहारात तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे मूळव्याधीची समस्या उद्भवू लागते. मूळव्याध झाल्यानंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुळव्याधापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात काळ्या मनुक्यांचे सेवन करावे. यामुळे पोट स्वच्छ होते आणि पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता आणि मूळव्याधसारख्या गंभीर समस्या टाळण्यासाठी काळे मनुके खावेत.

वजन कमी होते:

वाढलेल्या वजनाच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते. अशावेळी वजन कमी करताना सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी काळ्या मनुक्यांचे सेवन करावे किंवा मनुक्यांच्या पाण्याचे सेवन करावे. मनुके खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही.

शरीरावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा लवंगचे सेवन, कायम दिसाल फिट आणि स्लिम

हाडे चांगली राहतात:

काळ्या मनुक्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले घटक हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक ठरतात. ऑस्टियोपोरोसिस सारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी काळे मनुके खावेत. शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काळे मनुके खावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Keep your bones strong at 70 drink this black seed water daily for better health and no anemia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Healthy life
  • Weight loss

संबंधित बातम्या

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल
1

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल

Health Update:मध्यम शहरांतही पोहोचली वेटलॉसची क्रेझ! महिलांमध्ये मेडिकल वेट मॅनेजमेंटची वाढती मागणी
2

Health Update:मध्यम शहरांतही पोहोचली वेटलॉसची क्रेझ! महिलांमध्ये मेडिकल वेट मॅनेजमेंटची वाढती मागणी

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
3

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
4

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.