Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारंवार स्वयंपाकघरातील सिंक तुंबत आहे? मग ‘या’ सोप्या होम ट्रिक्सची मदत घ्या अन् काही मिनिटांत मिळवा क्लीन रिजल्ट

Sink Cleaning Tips : स्वयंपाकघरातील सिंक वारंवार तुंबत असल्यास ते केवळ त्रासदायक नसून आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते. पण काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही सिंकला काही मिनिटांतच कोणतीही मेहनत न घेता साफ करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 18, 2026 | 08:15 PM
वारंवार स्वयंपाकघरातील सिंक तुंबत आहे? मग 'या' सोप्या होम ट्रिक्सची मदत घ्या अन् काही मिनिटांत मिळवा क्लीन रिजल्ट

वारंवार स्वयंपाकघरातील सिंक तुंबत आहे? मग 'या' सोप्या होम ट्रिक्सची मदत घ्या अन् काही मिनिटांत मिळवा क्लीन रिजल्ट

Follow Us
Follow Us:
  • सिंक तुंबण्यामागे घाण, तेलकट थर आणि अन्नकण साचणे हे मुख्य कारण असते.
  • काही सोपे घरगुती उपाय वापरून हा प्रश्न कमी वेळात सोडवता येतो.
  • नियमित साफसफाई आणि योग्य काळजी घेतल्यास भविष्यातील अडथळे टाळता येतात.
आपल्या स्वयंपाकघरातील सींक क्लिन असणे फार गरजेचे असते. अन्यथा यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. वारंवार सिंकचा वापर केल्याने त्यात घाण, पाण्याचा गाळ साचू लागतो ज्यामुळे सिंकमधून खरकटं पाणी जाण्यास समस्या निर्माण होतात. अशावेळी जर त्याला साफ केले नाही तर त्या साचलेल्या घाण पाण्यातून स्वयंपाकघरात जंतू पसरण्याची शक्यता असते. तुम्हाला जर किचन सिंकमधील हा अडथळा दूर करायचा असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखात काही सोप्या घरगुती टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने फार सहजतेने तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील तुंबलेल्या सिंकला साफ करु शकता. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

उन्हामुळे त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C सीरम, चेहऱ्यावर येईल ग्लो

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर वापरा

तुंबलेले सिंक जर मोकळे आणि साफ करायचे असेल तर साधा आणि सोपा घरगुती पर्याय म्हणजे बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर. या दोन्ही घटकांमध्ये एँटी क्लिनिंग एजंट असतात जे सफाई करण्यात मदत करतात. आता यासाठी प्रथम सिंकमध्ये बेकिंग सोडा टाका आणि नंतर त्यावर थोडे व्हिनेगर घाला. आता याला काहीवेळ तसेच सोडून द्या. दोन्हींचा वापर एक रासायनिक अभिक्रिया करते ज्यामुळे पाईपमधील तेलकटपणा आणि घाणीचा थर विरघळून निघून जाण्यास मदत होते. यामुळे काही वेळातच तुमचा सिंक मोकळा होईल. काही वेळाने तुम्ही पाणी टाकू शकता.

गरम पाणी आणि डिटर्जंट

कपडे धुण्यासाठी वापरले जाणारे डिटर्जंट देखील या कामात तुमची मदत करतील. यासाठी सिंकमध्ये थोडे उकळते पाणी आणि मग डिटर्जंट पावडर टाका. काहीवेळ तसेच राहू द्या. यामुळे तेलकटपणा सैल होईल आणि पाणी सहजपणे वाहून जाईल.

लिंबू आणि बेकिंग सोडा वापरा

सिंक साफ करण्यासाठी हा एक नैसर्गिक, स्वस्त आणि प्रभावी घरगुती उपाय आहे. यासाठी प्रथम सिंकमध्ये बेकिंग सोडा घाला आणि मग त्यावर लिंबाचा रस घाला. काहीवेळ हे मिश्रण सिंकमध्ये तसेच राहू द्या आणि मग यावर पाणी टाका जेणेकरुन ते सिंकमधून निघून जाईल. याच्या एकत्रिकरणामुळे सिंकमधील सर्व घाण निघून जाईल आणि सिंकमधील दुर्गंधी नाहीशी होण्यास मदत होईल.

Summer Special Tips : फेकू नका, डोकं लावा! खतापासून मँगो टीपर्यंत आंब्याच्या सालीचा करता येतो अनेक प्रकारे वापर…

नियमितपणे क्लिन करा

जर तुम्ही तुमच्या घरातील सिंक नियमितपणे साफ केलीत तर हे अडथळे निर्माण होणार नाहीत. यामध्ये खरकटे अन्नपदार्थ कधीही टाकू नयेत. यासाठी तुम्ही एक जाळी सिंकवर एक जाळी बसवू शकता जेणकरुन चुकून जरी कोणते अन्नपदार्थ यात पडले तर ते पाईपाच्या आत न अडकता या जाळीत अडकतील. बाजारात तुम्हाला सहज ही जाळी उपलब्ध मिळेल.

प्लंबरला केव्हा बोलवावे?

या सर्व पद्धती करुनही जर तुमची समस्या दूर होत नसेल. सिंकमधून पाणी तुंबत असेल तर पाईपमध्य खोलवर अधिक घाण असण्याची शक्यता आहे. अशावेळी तुम्ही प्लंबरला बोलावणे शहाणपणाचे ठरेल.

Web Title: Kitchen sink cleaning tips home remedies to unclog and clean sink lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • cleaning tips
  • kitchen tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Salt Shaker Tips: मीठ वारंवार ओलसर होतंय? बरणीमध्ये मीठ ठेवताना अजिबात करू नका ‘ही’ चूक, अन्यथा मिठाचे होईल पाणी
1

Salt Shaker Tips: मीठ वारंवार ओलसर होतंय? बरणीमध्ये मीठ ठेवताना अजिबात करू नका ‘ही’ चूक, अन्यथा मिठाचे होईल पाणी

रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!
2

रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!

Japanese Bathing Culture: जपानी लोक रात्रीच आंघोळ का करतात? जाणून घ्या यामागील ‘ही’ काही खास कारणे
3

Japanese Bathing Culture: जपानी लोक रात्रीच आंघोळ का करतात? जाणून घ्या यामागील ‘ही’ काही खास कारणे

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!
4

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.