उन्हामुळे त्वचा काळवंडली आहे? मग 'या' पदार्थाचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C सीरम, चेहऱ्यावर येईल ग्लो
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याचे ऊन पडले आहे. तीव्र उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचा खूप जास्त निस्तेज आणि काळवंडल्यासारखी वाटते. चेहऱ्यावरील ग्लो पूर्णपणे कमी होऊन जातो. तसेच त्वचेच्या ओपन पोर्समध्ये जमा झालेल्या घाणीमुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात आणि त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि पिंपल्स कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या विटामिन सीरम किंवा फेसपॅक, फेसमास्कचा वापर करतात. पण याचा फारसा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सवर हजारो रुपये खर्च केले जातात. पण यामुळे फारसा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही. त्वचेवर सतत केमिकल युक्त स्किन केअर प्रॉडक्ट लावल्यामुळे लालसरपणा, रॅश किंवा मुरूम येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे महागडे फेस सीरम वापरण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. चला तर जाणून घेऊया फेस सीरम बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)
बाजारात उपलब्ध असलेल्या फेस सीरममध्ये कृत्रिम रंग किंवा हानिकारक प्रिझर्व्हेटिव्ह्ज इत्यादी अनेक घटक असतात. त्यामुळे घरी तयार केलेले फेस सीरम त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर ठरेल. पिंपल्स, पिगमेंटेशन किंवा निस्तेज त्वचेमुळे त्रस्त असाल तर घरी तयार केलेले फेस सीरम लावावे. यामुळे आठवडाभरात चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत येईल आणि त्वचा उजळदार दिसेल. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर केल्यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.
फेस सीरम बनवण्यासाठी सर्वप्रथम, दोन संत्र्याच्या साली स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात. त्यानंतर गरम पाण्यात साल टाकून मऊ होईपर्यंत शिजवाव्या. थंड झालेला साली मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यांची बारीक पेस्ट तयार करून घ्यावी. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात गुलाबपाणी घालून व्यवस्थित मिक्स करा आणि गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या. त्यानंतर त्यात ग्लिसरीन आणि कोरफड जेल मिक्स करून त्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले विटामिन सी सीरम. तयार केलेले सीरम काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. रात्री झोपण्याआधी नियमित चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा.
घरी तयार केलेले सीरम २ आठवड्यांपर्यंत फ्रिजमध्ये व्यवस्थित टिकून राहते. चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी नियमित सीरम लावावे. यामुळे आठवडाभरात सुंदर ग्लो त्वचेवर येईल. घरी तयार केलेले सीरम १० ते १२ दिवसच वापरावे. जास्त दिवस वापरल्यास त्वचेवर कोणताही परिणाम दिसून येणार नाही. चेहऱ्यावर सीरम लावल्यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांमध्ये जाऊ नये. संत्र्याच्या सालीत असलेले विटामिन सी त्वचा उजळदार करते तर कोरफड जेलचा वापर केल्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.






