Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुडघ्याच्या दुखापतींचेही आहेत प्रकार, तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन; वेळीच द्या लक्ष

खेळात सर्वात जास्त होणाऱ्या दुखापती म्हणजे गुडघ्याच्या दुखापती. खेळताना तुमचा गुडघा वाकला किंवा अचानक मार बसल्यास गुडघ्याच्या दुखापती होतात. गुडघे हा शरीरातील सर्वात महत्त्वाच्या सांध्यांपैकी एक आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 29, 2025 | 12:00 PM
गुडघ्याच्या दुखापतींचे प्रकार (फोटो सौजन्य - iStock)

गुडघ्याच्या दुखापतींचे प्रकार (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

गुडघा तुम्हाला चालण्यास, धावण्यास, उडी मारण्यास, खाली बसण्यास तसेच खालून वर उठण्यास मदत करतात. तुमच्या गुडघ्यांच्या आत काही ऊती असतात ज्या एखाद्या धाग्यासारख्या मजबूत अशा जोडलेल्या असतात, त्यांना अस्थिबंधन म्हणतात. हे अस्थिबंधन गुडघ्यांच्या हाडांना एकत्र धरुन ठेवण्याचे काम करते आणि तुमचे सांधे स्थिर राखण्यास याची मदत होते. 

कधीकधी अचानक पडणे, पाय मुरगळणे, गुडघा वाकणे किंवा खेळाच्या दुखापतीमुळे तुमच्या अस्थिबंधनावर ताण येऊ शकतो किंवा ते फाटू शकतात. याला गुडघ्याच्या अस्थिबंधनाची दुखापत असे म्हणतात. या दुखापती अशा व्यक्तींमध्ये अधिक सामान्य आहेत जे अति व्यायाम करतात, मैदानी खेळ खेळतात किंवा धावताना अचानक दिशा बदलतात. डॉ. आशिष अरबट, पुण्यातील जहांगीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समधील ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे. 

गुडघ्याच्या अस्थिबंधनाच्या दुखापतींमुळे एखाद्याला तीव्र वेदना, सूज आणि हालचालींवर मर्यादा येऊ शकतात. जर दुर्लक्ष केले किंवा उपचार न केल्यास ते गुडघ्याच्या सांध्यांना कमकुवत करुन  दीर्घकालीन समस्यांना आमंत्रण देऊ शकतात. योग्य काळजी आणि विश्रांती घेतल्यास या दुखापती बऱ्या होण्यास मदत होऊ शकते आणि भविष्यातील समस्यादेखील टाळता येतात. गुडघ्याच्या अस्थिबंधनाच्या दुखापतींचे प्रकार जाणून घेऊया

गुडघा शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली, हे कसे ओळखाल?

एसीएल दुखापत (अँटीरियर क्रूसिएट लिगामेंट)

हा गुडघ्याच्या अस्थिबंधनाच्या दुखापतीचा सर्वात सामान्य प्रकार आहे, विशेषतः जे फुटबॉल, बास्केटबॉल किंवा जिम्नॅस्टिक्ससारखे खेळताना या प्रकारची दुखापत होऊ शकते. या प्रकारची दुखापत सहसा जेव्हा तुम्ही अचानक थांबता, उडी मारताना अनाठायीपणे उतरता किंवा तुमची दिशा लवकर बदलता तेव्हा होते. गुडघ्याला दुखापत झाल्यानंतर जर अँटीरियर क्रूसीएट लिगामेंट इजा (एसीएल) झाली असेल तर रुग्णाला वेदना, दुखापतीनंतर लगेच सूज येणे, वजन सहन न होणे आणि सांधे कडक होणे.

पीसीएल दुखापत (पोस्टरियर क्रूसिएट लिगामेंट)

गुडघ्यामध्ये या विशिष्ट प्रकारच्या अस्थिबंधनाच्या दुखापती गुडघ्याच्या पुढच्या बाजूला असलेल्या जोरदार आघातामुळे होतात, जसे की चारचाकी अपघात किंवा पडणे. पोस्टरियर क्रूसिएट लिगामेंट दुखापतीमुळे लगेचच तीक्ष्ण वेदना होऊ शकत नाहीत, परंतु कालांतराने ती आणखी बिकट होऊ शकते आणि चालण्यास त्रास होऊ शकतो

एमसीएल दुखापत (आतील बाजूच्या अस्थिबंधनास झालेली दुखापत)

ही दुखापत सहसा तेव्हा होते जेव्हा तुमचा गुडघा एका बाजूला खूप वाकतो. खेळादरम्यान हे अनेकदा घडू शकते. यामुळे, गुडघे सरळ ठेवणे किंवा वाकवणे देखील कठीण होऊ शकते.

एलसीएल दुखापत (बाह्य बाजूच्या अस्थिबंधनास झालेली दुखापत)

गुडघ्याच्या आतील बाजूस जास्त दाब पडल्याने बाहेरील भागावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे एलसीएल दुखापत होऊ शकते. प्रभावित भाग सुजू शकतो आणि चालताना किंवा गुडघे वाकवताना एखाद्याला त्रास होऊ शकतो.

गुडघ्याच्या संधिवाताचे व्यवस्थापन कसे कराल? किती आहेत टप्पे जाणून घ्या तज्ज्ञांकडून

कशी घ्यावी काळजी

रुग्णाला आर्थ्रोस्कोपिक पद्धतीने अस्थिबंधन दुरुस्तीचा सल्ला दिला जातो जो गुडघ्याची स्थिरता पुनर्संचयित करण्यासाठी आणि हालचालीची श्रेणी सुधारण्यासाठी एक कमीत कमी आक्रमक प्रक्रिया आहे. सांध्यातील दुरुस्तीचे मार्गदर्शन करण्यासाठी उपकरणे आणि कॅमेराच्या मदतीने फाटलेले किंवा खराब झालेले अस्थिबंधन दुरुस्त करण्यास मदत होते. 

ही प्रक्रिया जलद पुनर्प्राप्तीस मदत करते, सांध्याचा कडकपणा कमी करते, गुडघ्याच्या सांध्याची  हालचाल आणि कार्य  सामान्य राखण्यास मदत करते, जखमा आणि रक्तस्त्राव कमी होतो आणि संसर्गाचा धोका कमी होतो. प्रक्रियेनंतर रुग्ण त्यांची दैनंदिन दिनचर्या पूर्ववत सुरू करू शकतात.

Web Title: Knee injuries and types experts have given guidance pay attention on time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 12:00 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Poop Timing: शौचाला जायची योग्य वेळ कोणती सकाळ की संध्याकाळ? मेटाबॉलिज्मवर कसा होतो परिणाम
1

Poop Timing: शौचाला जायची योग्य वेळ कोणती सकाळ की संध्याकाळ? मेटाबॉलिज्मवर कसा होतो परिणाम

पृथ्वीचा सर्वात खालचा बिंदू आणि त्यातील जीवंत चमत्कार; वाचा का आहे जगाला ‘या’ महासागराचे इतके आकर्षण?
2

पृथ्वीचा सर्वात खालचा बिंदू आणि त्यातील जीवंत चमत्कार; वाचा का आहे जगाला ‘या’ महासागराचे इतके आकर्षण?

Immortal Jellyfish : ‘हा’ समुद्री जीव म्हणजे चक्क मृत्यूला आव्हान देणारा महासागरातील चमत्कार अन् एकमेव ‘बायोलॉजिकल रीसेट बटण’
3

Immortal Jellyfish : ‘हा’ समुद्री जीव म्हणजे चक्क मृत्यूला आव्हान देणारा महासागरातील चमत्कार अन् एकमेव ‘बायोलॉजिकल रीसेट बटण’

शर्लिन चोप्राने घेतला ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्याचा निर्णय! Breast Implants काढून टाकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ महाभयंकर
4

शर्लिन चोप्राने घेतला ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्याचा निर्णय! Breast Implants काढून टाकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ महाभयंकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.