गुडघेदुखी आणि संधिवाताचा त्रास (फोटो सौजन्य - iStock)
आपले गुडघे हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचे सांधे असतात. आपल्या दैनंदिन जीवनात आपण गुडघ्यांचा खूप वापर करत असतो. आपले गुडघे आपल्या शरीराचा संपूर्ण भार सांभाळतात त्यामुळे गुडघे निरोगी राहणे अधिक गरजेचे आहे. गुडघ्याचा संधिवात ही एक सर्वसामान्यपणे आढळणारी समस्या आहे.
ही एखाद्याच्या गतिशीलतेवर आणि शारीरीक हालचालींवर परिणाम करते. गुडघ्याच्या संधिवाताने ग्रासलेल्या व्यक्तींकरिता डॉ. आशिष अरबट, पुण्यातील जहांगीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समधील ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन यांनी या लेखाच्या माध्यमातून काही टिप्स दिल्या आहेत.
कधी होतो संधिवात?
गुडघ्याच्या सांध्यातील कूर्चा कालांतराने कमी होतो तेव्हा गुडघ्याचा संधिवात होतो, ज्यामुळे वेदना होणे, सूज येणे आणि स्नायुंचा कडकपणा अशा समस्या उद्भवतात. गुडघ्याच्या संधिवाताचे मुख्य प्रकारांमध्ये ऑस्टियोआर्थरायटिस, संधिवात आणि पोस्ट-ट्रॉमॅटिक संधिवात यांचा समावेश आहे. गुडघ्याचा संधिवात हा वाढत्या वयानुसार, भूतकाळातील दुखापती किंवा सांध्यावर येणाऱ्या ताणामुळे उद्भवू शकतो. जोखीम घटकांमध्ये लठ्ठपणा, कौटुंबिक इतिहास आणि वाढते वय कारणीभूत ठरते. सांधेदुखी, हालचाल मंदावणे आणि चालण्यास त्रास होणे ही त्याची सामान्य लक्षणे आहेत.
मुलांमध्ये संधिवात लवकर सुरू होण्याची कारणे, घ्या जाणून
गुडघ्याच्या संधिवाताचे टप्पे
5 पदार्थ खाऊन करा आर्थरायटीसचा धोका कमी, हाडांसाठी ठरेल वरदान
उपचार कोणते