Lifestyle News: आजकाल आपले जीवन इतके धावपळीचे झाले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण कामात असतो. दिवसभर आपले शेड्युल इतके व्यस्त असते की, आपल्याला व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. हल्लीच्या काळात अनेक जण वजन वाढण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. वजन वाढणे ही अनेकनासाठी गंभीर समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय आपण करत असतो. जेवण कमी करतो. जिम, डाएट असे अनेक उपाय करतो. मात्र वजन काही केल्या कमी होत नाही. आज आपण डाएट, व्यायाम याचसोबत आणखी एक उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला तुमचे वजन कमी करण्यासाठी मदत होईल.
आयुर्वेदात अशा काही गोष्टींचा समावेश आहे ज्यामुळे आपले पोट आणि मेटोबॉलिज्म यासाठी चांगले असते. याचे सेवन केल्यास तुम्ही खाल्लेले अन्न लवकर पचण्यास मदत होते. पचन नीट झाले आणि सकस आहार घेतला तर वजन वाढण्याची शक्यता कमी होते. आज पण असे एक ड्रिंक पाहणार आहोत, ज्यामुळे तुमच्या शरीरावर जमा झालेली अतिरिक चरबी कमी होण्यास मदत होईल.
वजन कमी करण्यासाठी मदत करेल ‘हे’ ड्रिंक
वजन कमी करण्यासाठी हिंग आणि ओवा याचे एक ड्रिंक तुम्ही तयार करू शकता. हे ड्रिंक तयार करण्यासाठी ओवा आणि हिंग तुम्हाला पाण्यात भिजवून ठेवायचे आहे. रात्रभर हे असेच भिजवून ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी जेवण केल्यानंतर तुम्ही हे पाणी प्यायचे आहे. यामुळे तुम्हाला तुमचे वजन कमी करण्यासाठी मदत मिळेल. हे ड्रिंक तुम्हीसकाळी उपाशीपोटी देखील पिऊ शकता.
कसा होतो फायदा?
हिंग आणि ओवा तुमच्या शरीरातील मेटोबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी मदत करते. ज्यामुळे तुम्ही अधिक कॅलरी बर्न करू शकतात. शरीरातील फॅट्स कमी करण्यासाठी मदत होते. हे ड्रिंक तुमच्या शरीरावर साचलेली थुलथुलीत चरबी कमी करण्यास मदत मिळते.
हिंग व ओव्याचे पाणी पिण्याचे फायदे
शरीरातील अतिरिक्त चरबी करणे होणे, याशिवाय देखील हिंग व ओव्याचे पाणी तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. याचे सेवन केल्यास तुमची पचनशक्ती मजबूत होते. कफ, गॅस, पित्त यापासून सुटका होते.