
बीट गाजर खाण्याचा कंटाळा येतो? मग झटपट घरी बनवा आंबट गोड गुलाबी जेली, लहान मुलंसुद्धा खातील आवडीने
Jelly Recipe: लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं जेली खायला खूप जास्त आवडते. गोड चवीची जेली पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. बाजारात वेगवेगळ्या फेव्हल्सरच्या जेली मिळतात. पण हानिकारक रसायनांचा वापर करून बनवलेली जेली शरीरासाठी अजिबात चांगली नाही. यामुळे अपचनाच्या समस्या किंवा गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारी बीट गाजर आणि आवळ्याची जेली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली जेली खाल्ल्यानंतर सगळेच तुमचं कौतुक करतील. घरातील लहान मुले आणि मोठेसुद्धा बीट, गाजर, आवळा कच्चा खाण्यास नकार देतात. अशावेळी विविध पदार्थ बनवून खाण्यास देऊ शकता. बीटच्या सेवनामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते आणि आवळा खाल्यामुळे शरीराला आणि केसांना आवश्यक पोषण मिळते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)