सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा Pineapple French Toast
रविवार म्हणजे सगळ्यांसाठी सुट्टीचा दिवस. यादिवशी घरातील सर्वच कामे अगदी आरामात केली जातात. सकाळच्या नाश्त्यात विकतचे पदार्थ आणून खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही. मेदुवडा, मसाला डोसा, वडापाव, सामोसा इत्यादी विविध पदार्थ आणून खाल्ले जातात. पण सतत तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात कायमच घरी बनवलेले पदार्थ खावेत. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा पराठा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट अननस फ्रेंच टोस्ट बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. हिवाळ्यात बाजारात अननस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. अननस खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले वेगवेगळे विटामिन आणि इतर आवश्यक पोषक घटक शरीरासाठी फायदेशीर आहेत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






