Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kuwait Horror Story: जिन्नचं लग्न! “बोकडाचं पाय अन्…” मिळाली गाण्याची संधी, लाखोंची दौलत पण घडलं असं काही की…

१९९० च्या दशकात कुवेतमधील प्रसिद्ध गायिका नोरा अत्यंत व्यस्त होती, विशेषतः अरबी लग्नांमध्ये गाण्यासाठी. १९९७ मध्ये तिला एका अनोळखी व्यक्तीने तिच्या मुलीच्या लग्नात गाण्यासाठी मोठी रक्कम देण्याची ऑफर दिली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 04, 2026 | 09:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

१९९० च्या दशकात नोरा ही कुवेतमधील एक अत्यंत लोकप्रिय गायिका होती. तिचा स्वतःचा एक बँड होता आणि ती विशेषतः अरबी लग्नांमध्ये गाण्यासाठी प्रसिद्ध होती. अरेबिक संस्कृतीत लग्नात कोणत्या गायकाला बोलावले आहे, यावरून त्या कुटुंबाचा दर्जा (Status) ठरवला जात असे. त्यामुळे नोराचे शेड्युल नेहमीच व्यस्त असायचे.१९९७ च्या एका रात्री नोरा तिच्या हॉटेल रूममध्ये असताना तिला एका अनोळखी माणसाचा फोन आला. त्याने तिला त्याच्या मुलीच्या लग्नात गाण्यासाठी विचारले. नोराने आधी नकार दिला कारण ती खूप थकली होती, पण त्या माणसाने तिला तिच्या नियमित शुल्कापेक्षा १० ते ११ पट जास्त रक्कम देण्याचे कबूल केले. एवढी मोठी रक्कम पाहून नोराने जाण्याचे मान्य केले.

Horror Story: व्हिलात मज्जा करायला गेले, पण आयुष्यभराची भीती घेऊन परतले! अंगावर काटा आणणारा थरार

ठरल्याप्रमाणे काही गाड्या नोरा आणि तिच्या टीमला घेण्यासाठी आल्या. त्या गाड्या त्यांना शहरापासून दूर वाळवंटाच्या मध्यभागी घेऊन गेल्या. तिथे पोहोचल्यावर नोरा थक्क झाली; कारण तिथे एक अत्यंत विशाल आणि देदीप्यमान महाल उभा होता. नोराला आश्चर्य वाटले की, ती इतकी वर्षे कुवेतमध्ये राहूनही तिने वाळवंटात एवढा मोठा महाल कधीच पाहिला नव्हता. महालात शिरताच नोराला काहीतरी वेगळे जाणवू लागले. तिथली ऊर्जा नकारात्मक होती. तिथे उपस्थित असलेले लोक अतिशय जुन्या पद्धतीचे अरबी कपडे घालून होते आणि त्यांची भाषाही खूप जुनी (Ancient Arabic) होती.

जेव्हा लग्नात नाचायला सुरुवात झाली, तेव्हा नोराने नोटीस केले की ३००-४०० लोक एकाच वेळी, अगदी रोबोटसारख्या सिंक्रोनाइझ्ड हालचाली करत होते. जणू काही ते सर्व एकाच मेंदूने चालत असावेत. मध्यरात्री अचानक महालातील सर्व दिवे मालवले. काही सेकंदांसाठी पूर्ण अंधार झाला. जेव्हा पुन्हा प्रकाश आला, तेव्हा नोराच्या टीममधील ‘सलमा’ नावाच्या मुलीने जमिनीकडे पाहिले आणि ती ओरडली. नाचणाऱ्या लोकांचे पाय माणसांचे नसून बोकडाचे (Hooves of a goat) होते. इस्लामिक आणि मध्यपूर्वेतील लोककथांनुसार, माणसाचे रूप घेतलेल्या जिन्नची ओळख त्यांच्या पायांवरून पटते, कारण त्यांचे पाय बोकडासारखे असतात.

Horror Story: व्हिलात मज्जा करायला गेले, पण आयुष्यभराची भीती घेऊन परतले! अंगावर काटा आणणारा थरार

भीतीने थरथर कापणाऱ्या नोराने आणि तिच्या टीमने आपले वाद्य तिथेच सोडून बाहेरच्या दिशेने धाव घेतली. ते जिन्न त्यांच्या मागे धावू लागले. कसेबसे ते आपल्या गाडीत बसले आणि तिथून शहराच्या दिशेने पळाले.दुसऱ्या दिवशी नोरा पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी पोहोचली. पण तिथे ना कोणताही महाल होता, ना लोक. तिथे फक्त मैलोन्मैल पसरलेले वाळवंट होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जमिनीवर त्यांच्या गाडीच्या टायर्सचे निशाण होते, ज्यावरून हे सिद्ध होत होते की ते तिथे नक्कीच आले होते. महत्वाचे म्हणजे नोराला दिलेला तो शब्द की १० ते १२ पटीने पैसे मिळतील ते खरंच तिला मिळालेले असतात.

Web Title: Kuwait horror story of wedding of jinn and band of nora singer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 09:32 PM

Topics:  

  • horror story

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.