Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झोपेच्या कमतरेमुळे मेंदू आकुंचन पावत आहे! जाणून घ्या रोजच्या कोणकोणत्या सवयींमुळे ब्रेनवर होतो वाईट परिणाम

आजकाल अपुरी झोप, ताण आणि बदललेली जीवनशैली यामुळे मेंदूच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत. यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मेंदूची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 03, 2026 | 01:05 PM
झोपेच्या कमतरेमुळे मेंदू आकुंचन पावत आहे! जाणून घ्या रोजच्या कोणकोणत्या सवयींमुळे ब्रेनवर होतो वाईट परिणाम

झोपेच्या कमतरेमुळे मेंदू आकुंचन पावत आहे! जाणून घ्या रोजच्या कोणकोणत्या सवयींमुळे ब्रेनवर होतो वाईट परिणाम

Follow Us
Follow Us:
  • अपुऱ्या झोपेमुळे मेंदूचे काही भाग आकुंचन पावतात आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो.
  • तणाव आणि जास्त साखर यामुळे एकाग्रता कमी होते आणि निर्णय घेण्याची क्षमता घटते.
  • दीर्घकाळ असेच राहिल्यास मेंदू लवकर वृद्ध होतो आणि स्मृतिभ्रंशाचा धोका वाढतो.
आजकालच्या घाईगडबडीच्या जीवनशैलीत रात्रीची झोप लोकांची कमी झाली आहे. आपल्या शरीराला किमान ८ तास झोपेची नितांत गरज असते पण असे कितीतरी लोक आहेत ज्यांची ८ तासांची झोप पूर्ण होत नाही. याचे मूळ कारण म्हणजे उशीरा झोपण्याची सवय. अपूऱ्या झोपेमुळे आरोग्यावर याचा वाईट परिणाम होऊ लागतो. तुम्हाला माहिती आहे का? यामुळे संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूवरही चुकीचा परिणाम होऊ लागतो. यामुळे आपला मेंदू झपाट्याने वृद्ध होऊ लागतो इतकेच नाही तर त्याचा आकारही कमी होऊ लागतो.

प्रेमात गुपितपणा! ‘पॉकेटिंग डेटिंग’ ट्रेंड नक्की काय आहे? कमिटमेंट नाही, भांडण नाही… मग कसं टिकून राहत नातं?

अपुरी झोप, कामाचा तणाव आणि शरीरात वाढत असलेले साखरेचे प्रमाण आपली स्मरणशक्ती कमकुवत करतात आणि यामुळे आपल्याला एकाग्र राहण्यास अडथळे निर्माण होतात. मेंदूला तल्लख आणि निरोगी ठेवण्यासाठी काय करायला हवं यासाठी डाॅक्टर सूद यांनी आपल्या @doctorsoood इंस्टाग्राम अकाऊंटवर एक काही टिप्स शेअर केल्या आहेत. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

अपुऱ्या झोपेमुळे मेंदूचे भाग आकुंचन पावू शकतात

झोपेच्या कमतरतेमुळे ग्रे मॅटरचे प्रमाण कमी होते आणि हिप्पोकॅम्पसचा ऱ्हास होतो, जे स्मरणशक्ती वाढवण्यात महत्त्वाचे घटक मानले जातात. अगदी थोड्या काळासाठी झोप कमी झाल्यानेही मेंदूच्या रचनेत बदल होऊ शकतो. दीर्घकाळ अपुऱ्या झोपेमुळे न्यूरोजेनेसिसमध्ये अडथळा, सिनॅप्टिक व्यत्यय आणि बीटा-अमायलॉइड सारख्या टाकाऊ पदार्थांना शरीराबाहेर काढता येत नाही ज्यामुळे मेंदूचे वृद्धत्व वाढू शकते.

स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होते

दीर्घकाळ टिकणाऱ्या तणावामुळे शरीरातील कॉर्टिसोलची पातळी वाढते ज्याचा थेट परिणाम हिप्पोकॅम्पस आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्सवर होतो. कालांतराने यामुळे न्यूरोजेनेसिस कमी होतो, सिनॅप्टिक सिग्नलिंगमध्ये व्यत्यय येतो. यामुळे लक्ष, कार्यकारी स्मृती आणि निर्णयक्षमता कमी होते. दीर्घकालीन ताणामुळे न्यूरोइन्फ्लेमेशन आणि ऑक्सिडेटिव्ह नुकसान देखील वाढते.

उष्णता, मुरुमे आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय, उन्हाळ्यात फक्त 1 ग्लास हा ज्यूस प्या आणि कमाल पाहा; पैसे घालवण्याचीही गरज नाही

मेंदूचे वृद्धत्व वाढते

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की त्याचा परिणाम मेंदूवरही होऊ लागतो. दीर्घकालीन हायपरग्लायसेमियाचा संबंध बौद्धिक क्षमतेत वेगाने होणारी घट, मेंदूचा लहान आकार आणि मेंदूच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या दुखापतीशी आहे. यामागील यंत्रणांमध्ये ऑक्सिडेटिव्ह ताण, दाह, मेंदूतील इन्सुलिन प्रतिरोध आणि मेंदूच्या लहान रक्तवाहिन्यांचे नुकसान यांचा समावेश होतो. यामुळे रक्तप्रवास आणि नर्व्ह सेल्सच्या कार्यात अडथळा निर्माण होतो.

स्मृतिभ्रंशाचा धोका वाढतो

संशोधनानुसार, श्रवणशक्ती कमी होणे हे स्मृतिभ्रंशाच्या वाढत्या धोक्याशी संबंधित आहे. यामागे काही सोपी कारणं आहेत जसे की, मेंदूवर जास्त ताण येणं, आवाज कमी ऐकू आल्यामुळे मेंदूत होणारे बदल आणि लोकांपासून दूर राहिल्यामुळे विचार करण्याची क्षमता कमी होणे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Lack of sleep effects on brain memory concentration lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • brain
  • Health Tips
  • lifestyle news
  • sleep problems

संबंधित बातम्या

पावसाळ्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करावा? तज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत
1

पावसाळ्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करावा? तज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत

Health Tips: गाड्यावरचा चहा किती वेळाने प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी ठरू शकतो धोकादायक?
2

Health Tips: गाड्यावरचा चहा किती वेळाने प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी ठरू शकतो धोकादायक?

मेहंदी किंवा डाय न वापरता पांढरे केस काळे कसे करायचे? योगगुरू ‘नित्यानंदम श्री’ने शेअर केला नॅचरल उपाय
3

मेहंदी किंवा डाय न वापरता पांढरे केस काळे कसे करायचे? योगगुरू ‘नित्यानंदम श्री’ने शेअर केला नॅचरल उपाय

Lifestyle Tips : कपड्यांवरील पेनचे डाग चुटकीसरशी होतील गायब; फक्त वापरा ही सोपी घरगुती ट्रिक
4

Lifestyle Tips : कपड्यांवरील पेनचे डाग चुटकीसरशी होतील गायब; फक्त वापरा ही सोपी घरगुती ट्रिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.