
तुमचे लिव्हर सडले आहे का? शरीर देतो 'हे' संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष अन्यथा मृत्यू देईल भेट
आपल्या शरीरातील प्रत्येक पार्ट हा आपल्या शरीराचे कार्य सुरळीत करण्यासाठी मदत करत असतो. प्रत्येकाचे कार्य वेगळे असते आणि यातील एकही अवयव खराब झाल्यास आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. शरीरातील एक महत्त्वाचा अवयव म्हणजे लिव्हर, हे सतत कार्यरत असते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचे काम करत असते. हे एक नॅचरल फिल्टरप्रमाणे काम करते, ज्यात अन्नातून पोषक तत्वे शोषणे, हार्मोनल संतुलन राखणे, पचनास मदत करणे, रक्त शुद्ध करणे अशा कामांचा समावेश आहे.
अनेकदा शरीराच्या आत घडत असलेल्या गोष्टी आपल्या लवकर ध्यानात येत नाही ज्यामुळे आजार मोठ्या प्रमाणात वाढत जातो. आपले शरीर तर आपल्याला संकेत देत असतो पण या सामान्य संकतांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि इथेच आपली मोठी चूक घडून बसते. आपले लिव्हरही आतून खराब होत असते जे आपल्या ध्यानात येत नाही पण काही लक्षणांकडे विशेष लक्ष देऊन आपण याची खात्री करुन घेऊ शकतो. लिव्हर खराब होण्याची सुरवातीची लक्षणे कोणती आहेत ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
सतत थकवा आणि अशक्तपणा
जर तुम्हाला विनाकारण थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर हे लिव्हर खराूब होण्याचे लक्षण असू शकते. जेव्हा आपले लिव्हर योग्यरित्या काम करत नाही तेव्हा शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. हेच कारण आहे की, यामुळे आपल्या शरीरात उर्जेचा अभाव निर्माण होऊ लागतो ज्यामुळे शरीर थकू लागते आणि कमकुवतपणा जाणवू लागतो.
त्वचा आणि डोळे पिवळे पडणे
कावीळ हे लिव्हर खराब होण्याचे सर्वात सोपे ओळखले जाणारे लक्षण मानले जाते. जेव्हा यकृत बिलीरुबिन नावाच्या पिवळ्या पदार्थाचे योग्यरित्या प्रक्रिया करू शकत नाही तेव्हा हे लक्षण शरीरावर दिसून येऊ लागते. यामुळे त्वचा, डोळे, नखे पिवळ्या रंगाची दिसू लागतात. बऱ्याचदा त्वचेवरही पित्ताचे क्षार दिसून येतात जे लिव्हर खराब होण्याचे संकेत देत असते.
भूक न लागणे
लिव्हर खराब झाल्यामुळे याचा परीणाम पचन आणि मेटाबाॅलिजमवर झाल्याचेही दिसून येते. भूक न लागणे किंवा लवकर पोट भरल्यासारखे वाटण हे याचे लक्षण असू शकते. याचा परीणाम हळूहळू आपल्या वजनावरही झाल्याचेही दिसून येते.
पिवळ्या रंगाचे मूत्र
आपल्या लिव्हरने काम करणे बंद केले की लघवी किंवा विष्ठेच्या रंगातही बदल घडून येतात. शरीरात बिलीरुबिनची वाढ झाल्याने याचा रंग गडद पिवळा अथवा तपकिरी झाल्याचे दिसते. हे लक्षण लिव्हर खराब होण्याच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे.
रक्तस्त्राव होणे
आपले लिव्हर शरीरात रक्त गोठण्यास मदत करणारे प्रिथिने तयार करते. जेव्हा लिव्हर कमकुवत होते तेव्हा हे प्रथिने कमी प्रमाणात तयार होऊ लागतात, ज्यामुळे किरकोळ दुखापत होऊ शकते. लहान घटनांमुळेही तुम्हाला जखमा होऊ शकतात. लिव्हर खराब होत असल्यास आपल्या पायांमध्ये किंवा घोट्यांमध्ये सूजही येऊ शकते.
लिव्हरमधील अशुद्धता काढून टाकण्यासाठी उपाय
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.