बुलढाण्यातील गावांमध्ये विचित्र साथीचा कहर
कोरोना महामारीनंतर पुन्हा एकदा चीनमधील नव्या विषाणूने डोकं वर काढलं आहे. चीनमधून आलेल्या एचएमपीव्ही विषाणूचे रुग्ण जगभरात पसरू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. मात्र बुलढाण्यामध्ये एका विचित्र साथीमुळे अनेकांच्या डोक्यावर टक्कल पडले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामधील एका गावात पसरलेल्या साथीमुळे अनेकांच्या डोक्यावरचे केस मुळासहित हातामध्ये येत आहेत. या साथीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन दिवसांमध्ये डोक्यावरचे संपूर्ण केस निघून जाऊन टक्कल पडल्यामुळे अनेक नागरिक त्रस्त आहेत. चला तर जाणून घेऊया या साथीच्या आजाराबद्दल सविस्तर माहिती.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
बुलढाण्यात शेगाव तालुक्यात बोंडगाव, कालवड, हिंगणा येथील गावांमध्ये मागील तीन दिवसांपासून विचित्र साथ पसरली आहे. या साथीमुळे आत्तापर्यंत अनेकांच्या डोक्यावरचे केस जाऊन टक्कल पडले आहे. केस गळून टक्कल पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घडलेल्या या प्रकारामुळे आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र लोकांच्या डोक्यावरचे केस नेमके कशामुळे गळत आहेत, हे अजूनही स्प्ष्ट झालेले नाही.
शेगाव तालुक्यातील बोडगाव, कालवड, हिंगणा या गावांमध्ये पसरलेल्या गंभीर साथीमुळे आत्तापर्यंत अनेकांचे केस गळून टक्कल पडले आहे. केस गळतीच्या आजाराने गावात थैमान घातले आहे. डोक्यावरचे सर्वच केस गळून गेल्यामुळे अनेक नागरिक चिंतेत पडले आहेत. या आजाराची लागण अनेक कुटुंबातील सदस्यांना झाली आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर सगळ्यात आधी डोक्याला खाज येते, त्यानंतर दुसऱ्या दिवशी केस मूळांसकट हातामध्ये येतात आणि तिसऱ्या दिवशी डोक्यावर पूर्ण टक्कल पडते, इत्यादी गोष्टी घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील काही दिवसांपासून गावात घडत असलेल्या प्रकारामुळे शेकडो नागरिकांचे केस गळून टक्कल पडले आहे. शिवाय यामध्ये महिलांची संख्या देखील मोठी आहे. मात्र घडलेल्या या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे गावातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. शॅम्पू वापरून केस गळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र आयुष्यात कधीही शॅम्पू न वापरलेल्या लोकांचे सुद्धा केस गळत आहेत. मात्र अजूनही आरोग्य विभागाकडून कोणतीही दाखल घेण्यात आलेली नाही.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून भोन गावात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आत्तापर्यंत गावातील जणांना साथीच्या आजाराची लागण झाली आहे. यामुळे नागरिकांच्या डोक्यावरचे संपूर्ण केस गळून टक्कल पडले आहे. तसेच पुढील योजनांना आखण्यासाठी गावात आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले आहे. गावातील नागरिकांवर लक्षणे पाहून उपचार केले जात आहेत.