Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • New Year |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Election : युती अन् आघाड्या पाहून कार्यकर्ते गोंधळले; निष्ठेबरोबर शत्रुत्वही पाण्यात

पुणे महापालिका निवडणुकीत होणाऱ्या युत्या आणि आघाड्या पाहून सर्वच पक्षाचे कार्यकर्ते गोंधळले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 30, 2025 | 12:57 PM
युती अन् आघाड्या पाहून कार्यकर्ते गोंधळले; निष्ठेबरोबर शत्रुत्वही पाण्यात

युती अन् आघाड्या पाहून कार्यकर्ते गोंधळले; निष्ठेबरोबर शत्रुत्वही पाण्यात

Follow Us
Close
Follow Us:
  • युती अन् आघाड्या पाहून कार्यकर्ते गोंधळले
  • निष्ठेबरोबर शत्रुत्वही पाण्यात
  • पुण्यात नेमकं काय घडतंय?
पुणे/दीपक मुनोत : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. पुणे महापालिका निवडणुकीत होणाऱ्या युत्या आणि आघाड्या पाहून सर्वच पक्षाचे कार्यकर्ते गोंधळले आहेत. पक्षाशी किंवा नेत्याशी निष्ठा ठेवून कार्यकर्त्यांनी भांडणे केली, कदाचित अन्य पक्षाशी शत्रुत्व घेतले. त्यांना सद्यस्थितीत पश्चाताप होत असेल.

अगदी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला गेला. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे दोन गट तयार झाले. कार्यकर्तेही दोन गटात विभागले गेले. स्वतंत्र सभा, बैठका झाल्या. त्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. पवारसाहेबांचे वय झाले आहे, आता त्यांनी थांबावे अशी भाषणे झाली. भाजप विचारधारेशी कधीच जमवून घेणार नाही असे शरद पवार म्हणाले. लोकसभा, विधानसभा निवडणुका एकमेकांविरुद्ध लढविल्या. आता वेगळे चित्र दिसू लागले. दोन्ही पवार पुण्यात एकत्र येत आहेत. या युतीला भाजपची संमती आहे, त्यामुळे भाजप कार्यकर्ते गोंधळलेले आहेत. सत्तेतील मित्र पक्षांच्या विरोधात भाजप उमेदवारांना लढायचे आहे.

सोलापूरमध्ये शिंदे आणि अजित पवार यांची युती झाली असून, भाजप त्यांच्या विरोधात आहे. मुंबईत भाजप आणि शिंदे एकत्र असून ते अजित पवार यांच्या विरोधात आहेत. मुंबईत शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे बंधूंबरोबर आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पवार एकत्र आणि त्यांची लढाई भाजपशी. महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्हीही विस्कळीत आहेत. प्रत्येक गावा-गावात वेगवेगळ्या पक्षांची युती किंवा आघाडी होताना दिसत आहे. त्यामुळे नेमकी कोणती विचारधारा स्वीकारायची याविषयी कार्यकर्तेच गोंधळलेले आहेत.

निवडणूक निकालानंतर महापालिकेत सत्तेसाठी भाजप, शिंदे, पवार एकत्र येणार आहेत आणि सत्तेची संधी मिळत असेल तर काँग्रेस, शरद पवार आणि ठाकरे एकत्र येण्यास तयार असतील. या सगळ्या साठमारीमुळे जे पराभूत होणार आहेत, ते आपल्या माणसांकडूनच पराभूत होणार आहेत आणि राजकारणातून बाद होणार आहेत.

या सर्व गोंधळात रवींद्र धंगेकर यांची कोंडी झाली, अशा बातम्या आहेत. शिवसेना, मनसे असे फिरत फिरत तीन वर्षांपूर्वी धंगेकर काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमधून नुकतेच ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. या सगळ्या राजकीय प्रवासात त्यांनी भाजपच्या काही नेत्यांना दुखावले. भाजप आणि शिवसेना यांच्या जागा वाटपाची बोलणी पुण्यात झाली. तेव्हा त्यातून धंगेकरांना दूर ठेवण्यात आले. दरम्यान धंगेकर यांच्या मुलाने निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आणि वेळप्रसंगी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे. एकूणच धंगेकरांची कोंडी झाली असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

Web Title: Pune municipal corporation elections have created an atmosphere of confusion among workers of all parties

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 12:57 PM

Topics:  

  • Election News
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यातून उच्चशिक्षित दांपत्य निवडणुकीच्या रिंगणात; ऐश्वर्या पठारे प्रभाग 3 तर सुरेंद्र पठारे प्रभाग 4 मधून मैदानात
1

पुण्यातून उच्चशिक्षित दांपत्य निवडणुकीच्या रिंगणात; ऐश्वर्या पठारे प्रभाग 3 तर सुरेंद्र पठारे प्रभाग 4 मधून मैदानात

पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक, 2 महिलांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर
2

पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक, 2 महिलांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर

Pune Election : भाजपकडून बहुतेक विद्यमानांना घरचा रस्ता; नवाेदित चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयाेग
3

Pune Election : भाजपकडून बहुतेक विद्यमानांना घरचा रस्ता; नवाेदित चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयाेग

Crime News : वर्षभरामध्ये ६५ गुन्ह्यात १२७ जेरबंद; ९३ लाखांचा अमलीपदार्थ साठा जप्त; शहर पोलिसांची मोठी कारवाई
4

Crime News : वर्षभरामध्ये ६५ गुन्ह्यात १२७ जेरबंद; ९३ लाखांचा अमलीपदार्थ साठा जप्त; शहर पोलिसांची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.