Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • New Year |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : वर्षभरामध्ये ६५ गुन्ह्यात १२७ जेरबंद; ९३ लाखांचा अमलीपदार्थ साठा जप्त; शहर पोलिसांची मोठी कारवाई

नाताळ आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात ड्रग्जची आवक वाढत असल्याने पोलिसांच्या कारवाईलाही वेग आला आहे.याचदरम्यान वर्षभरामध्ये ६५ गुन्ह्यात १२७ जेरबंद करण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 30, 2025 | 12:40 PM
वर्षभरामध्ये ६५ गुन्ह्यात १२७ जेरबंद; ९३ लाखांचा अमलीपदार्थ साठा जप्त; शहर पोलिसांची मोठी कारवाई

वर्षभरामध्ये ६५ गुन्ह्यात १२७ जेरबंद; ९३ लाखांचा अमलीपदार्थ साठा जप्त; शहर पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Close
Follow Us:
  • वर्षभरामध्ये ६५ गुन्ह्यात १२७ जेरबंद
  • ९३ लाखांचा अमलीपदार्थ साठा जप्त
  • शहर पोलिसांची मोठी कारवाई
अमरावती : शहर पोलिसांनी २०२५ या वर्षात अमली पदार्थाविरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले आहे. गांजा, एमडी, चरससह विविध अमली पदार्थावर मोठ्या प्रमाणात कारवाई करत पोलिसांनी तब्बल ९३ लाख ७२ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. १२७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. शहराला ड्रग्जमुक्त करण्याच्या दिशेने ही कारवाई मैलाचा दगड ठरत आहे. शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत १ जानेवारी २०२५ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत अमली पदार्थांविरोधात राबविण्यात आलेल्या मोहिमेला लक्षणीय यश मिळाले आहे.

आई-वडिलांची क्रूरता! अक्कलकुव्यात नदीपात्रात 6–7 महिन्यांच्या अर्भकाचा मृतदेह आढळला

एनडीपीएस (नार्कोटिक ड्रग्ज अॅण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स) कायद्यांतर्गत एकूण ६५ गुन्हे उघडकीस आले. त्यामध्ये १२७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत गांजा, एमडी, चरस तसेच इतर अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत ६७ लाख ८ हजार १८०, तर इतर साहित्याची किंमत २६ लाख ६४ हजार ३३० इतकी आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ९३ लाख ७२ हजार ५१० रुपये आहे.

गांजाविरोधात १२ गुन्हे, २२ आरोपी अटकेत गुन्हे शाखेने गांजासंबंधी १२ गुन्हे दाखल करून २२ आरोपींना अटक केली. या प्रकरणात ८८ किलो ५५९ ग्रॅम गांजा जप्त केला. त्याची किंमत १६ लाख २७ हजार ५५० आहे. इतर साहित्याची किंमत ६ लाख ९६ हजार २५० आहे. गांजा प्रकरणामध्ये एकूण २३ लाख २३ हजार ८०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शून्य सहनशीलतेचे धोरण

शहरातील अमली पदार्थांची तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी पोलिसांनी शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे. अमरावती करण्यासाठी ही मोहीम भविष्यातही अधिक जोमाने सुरू राहणार आहे. तस्करांसह सेवन करणाऱ्यांविरुद्धही कारवाई केली जाईल.

चरसचे दोन गुन्हे, तीन आरोपी अटकेत

चरसशी संबंधित दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून तीन आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत १ किलो ४५० ग्रॅम चरस जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ३ लाख ५० हार आहे. इतर साहित्याची किंमत १५ हजार ५०० आहे. चरस प्रकरणांत एकूण ३ लाख ६५ हजार ५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गांजाच्या सेवनावरही कारवाई

ड्रग्जविरोधी मोहिमेचा भाग म्हणून गांजाचे सेवन करणाऱ्यांविरुद्धही कठोर पावले उचलण्यात आली. गांजाच्या सेवनाचे ३६ गुन्हे दाखल करून ३६ आरोपींवर खटले चालविण्यात आले. मात्र, या प्रकरणांत कोणताही अमली पदार्थ जप्त करण्यात आलेला नाही.

एमडी ड्रग्जविरोधातील सर्वात मोठी कारवाई

एमडी (ड्रग्ज) विरोधात गुन्हे शाखेने सर्वात मोठी कारवाई करत १५ गुन्हे दाखल केले. या कारवाईत ६६ आरोपींना अटक केली आहे. ७०५ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. या एमडीची किंमत ४७ लाख ३० हजार ६३० आहे. इतर तस्करीसाठी वापरलेले साहित्य १९ लाख ५२ हजार ५८० किमतीचे आहे. एमडी प्रकरणांत एकूण ६६ लाख ८३ हजार २१० किमतीचा मुद्देमाल जप्त झाला आहे.

Buldhana Crime : चारित्र्याच्या संशयाने घेतला जीव! पतीकडून पत्नी व 4 वर्षीय चिमुकल्याची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या

Web Title: 127 arrested in 65 cases over the year drugs worth 93 lakh seized major action by city police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 12:40 PM

Topics:  

  • crime
  • maharashtra
  • new year 2026
  • police

संबंधित बातम्या

31st December Celebration : थर्टी फर्स्टला रात्रभर परिवहनसेवा, बेस्टच्या २५ जादा बसेस धावणार
1

31st December Celebration : थर्टी फर्स्टला रात्रभर परिवहनसेवा, बेस्टच्या २५ जादा बसेस धावणार

Mumbai: माजी सरन्यायाधीश चंद्रचूड असल्याची बनावट ओळख; ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून वृद्ध महिलेची 3.71 कोटींची फसवणूक
2

Mumbai: माजी सरन्यायाधीश चंद्रचूड असल्याची बनावट ओळख; ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून वृद्ध महिलेची 3.71 कोटींची फसवणूक

Navi Mumbai Crime: अल्पवयीन मुलाचं अपहरण करून इन्स्टाग्रामवरून मागितली खंडणी २० लाखांची, चौघांना अटक
3

Navi Mumbai Crime: अल्पवयीन मुलाचं अपहरण करून इन्स्टाग्रामवरून मागितली खंडणी २० लाखांची, चौघांना अटक

पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक, 2 महिलांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर
4

पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक, 2 महिलांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.