
'बंद पडली' अशी प्रतिमा... अन् थेट मेंदू शस्त्रक्रिया! महात्मा गांधी रुग्णालयाने घडवला इतिहास
कामगार रुग्णालये अजून सुरू आहेत का? असे प्रश्न अनेकदा उपस्थित केले जातात. वर्षानुवर्षे रेफरल सेंटरची प्रतिमा, बंद पडलेल्या ऑपरेशन थिएटर्स आणि मर्यादित सेवांमुळे दुर्लक्षित राहिलेल्या या रुग्णालयांनी आता नव्या युगात प्रवेश केल्याचे संकेत दिले आहेत. परळ येथील ईएसआयएस महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयात प्रथमच मेंदूवरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून, कामगार रुग्णालयांच्या पुनरागमनाची ही नांदी मानली जात आहे. दरम्यान या रुग्णालयात स्पाईन सर्जरी, इतर कुठल्याही रुग्णालयात न होणारी डोळ्यांची रिटायनल शस्त्रक्रिया देखील येथे होत आहेत.(फोटो सौजन्य – istock)
5 हजाराहून कमी पैशात भारताच्या स्कॉटलँडला भेट द्या, पावसाळ्यात प्लॅन करा 3 दिवसांची ट्रिप
कामगार रुग्णालयाच्या इतिहासात हे नव्या भरारीच मानलं जात आहे. १९ जून रोजी परळ येथील ईएसआयएस महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयात प्रथमच मेंदूवरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. फ्रंटो-टेम्पोरल कॅनिओटॉमी करून अत्याधुनिक मायक्रोस्कोपच्या सहाय्याने मेंदूतील मेटास्टॅटिक गाठ काढण्यात आली. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान कोणतीही गुंतागुंत झाली नाही. ही शस्त्रक्रिया न्यूरोसर्जन डॉ. सुचेता तिरपुडे यांनी केली. तर दुसऱ्या प्रकरणात ६२ वर्षीय फुलाबाई यांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होता.
अलीकडे त्यांना उजव्या बाजूचा अशक्तपणा, बोलण्यात अडथळा आणि आकडीचा त्रास सुरू झाला होता.तपासणीत मेंदूच्या डाव्या फ्रंटल भागात कर्करोगाची गाठ आढळून आल्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. काढलेली गाठ पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे.
गांधी कामगार रुग्णालय है एकेकाळी केवळ उपचारांचे नव्हे, तर प्रशिक्षणाचेही महत्त्वाचे केंद्र होते. जे. जे. आणि केईएमसारख्या रुग्णालयांतील डॉक्टर येथे प्रशिक्षणासाठी येत असत. नूतनीकरणाच्या कामात अनेक सेवा ठप्प झाल्या, मात्र आता रुग्णालय पुन्हा उभारी घेत आहे. जॉइंट रिप्लेसमेंट, स्पाईन सर्जरी आणि आता मेंदू शस्त्रक्रियेसारख्या गुंतागुंतीच्या सेवा सुरू झाल्या आहेत, असे मत डॉ. शंकर रेवणकर, उपवैद्यकीय अधीक्षक, म. गांधी मेमोरियल कामगार रुग्णालय, परळ यांनी व्यक्त केले आहे.
८ कामगार रुग्णालये पुस्ता मोदल राहिलेली नाहीत, अत्याधुनिक सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर आणि आधुनिक शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. जॉइंट रिप्लेसमेंट, स्पाईन सर्जरीनंतर आता मैदू शस्त्रक्रियाही यशस्वीपणे पार पडली आहे. आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांनाही येथे उपचार मिळत असल्याने सर्वसामान्यांसाठी दर्जेदार आरोग्यसेवेचे एक सक्षम पर्याय म्हणून हे रुग्णालय पुढे येत आहे.
Ans: मेंदूमधील गाठी, रक्तस्राव, काही न्यूरोलॉजिकल समस्या, इजा किंवा इतर गंभीर स्थितींवर उपचार करण्यासाठी मेंदू शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.
Ans: मेंदू हा शरीरातील अतिशय संवेदनशील अवयव असल्याने अशा शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक आणि तज्ज्ञ न्यूरोसर्जनच्या मार्गदर्शनाखाली केल्या जातात.
Ans: सतत डोकेदुखी, चक्कर येणे, स्मरणशक्तीमध्ये बदल, शरीराच्या एखाद्या भागात कमजोरी, बोलण्यात अडचण किंवा अचानक झटके येणे अशी लक्षणे दिसू शकतात.